मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हल्ली गुन्हेगारीचे वाढते प्रमाण सर्वांनाच आश्चर्यचकित करत आहेत. अशा वेळी जे प्रकरण समोर आले आहे ते महाराष्ट्रातील आहे. महाराष्ट्रात सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाची झपाट्याने वाढ होते आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील परिस्थितीही चिंताजनकच आहे. खरं तर, मोठ्या संख्येने रुग्ण मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये राहत आहेत आणि आता या क्वारंटाईन सेंटरमध्येही गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. सोमवारी मुंबईतील मलाडमध्ये असलेल्या क्वारंटाइन सेंटर मध्येही अशीच घटना घडली आहे. येथे दोन जणांनी एका महिलेचा विनयभंग केला आहे.

मालाडच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये झालेल्या विनयभंगाच्या या घटनेची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल शिंदे यांनी दिली. त्याचबरोबर ते म्हणाले की, या महिलेचा विनयभंग केल्याबद्दल दोन जणांविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाविषयी बोलताना ते म्हणाले की, यामध्ये एका आरोपीलाही अटक केली गेली आहे. याशिवाय अटक केलेले इतर आरोपी हे बीएमसी मधील कंत्राटी कामगार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तो एका महिलेला जबरदस्तीने आई लव यू बोलण्यासाठी भाग पाडत होता.

याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत, परंतु अजूनही ही महिला क्वारंटाइन सेंटरमध्ये काम करत आहे की तिथं तिला रूग्ण म्हणून दाखल केले गेले हे कळू शकलेले नाही. सोमवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 3721 नवीन प्रकरणे उघडकीस आली आहेत. तसेच 62 लोक मरण पावले आहेत. त्याचबरोबर राज्यात एकूण कोरोनाची प्रकरणे वाढून 1,35,796 वर गेली आहेत. एवढेच नव्हे तर 6283 लोकांनी आपला जीव गमावला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.