खासगी सावकारास अटक : शेतकऱ्यास 50 हजाराच्या बदली 16 लाखाची मागणी

Phaltan Police

फलटण | निंबळक येथील एका शेतकऱ्याला व्याजाने दिलेल्या पन्नास हजार रुपयांचे 3 लाख 50 हजार घेऊनही 16 लाख रुपयांची मागणी करण्यात येत होती. पैसे न दिल्यास तारण जमिनीची विक्री करण्याची धमकी देत शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या एका खासगी सावकाराच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितास अटक केलेली असून न्यायालयात हजर केले … Read more

किरपेत बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद : वनविभागाने गुपचूप हलविला

कराड | तालुक्यातील किरपे येथे आज बुधवारी दि. 26 जानेवारी रोजी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात सापडला आहे. ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारची माहिती न होता, वनविभागाने हा बिबट्या किरपे गावातून अन्य ठिकाणी नेला आहे. कराड तालुक्यातील येणके येथे बिबट्या दोन महिन्यांपूर्वी पिंजऱ्यात अडकला होता. त्यानंतर आज 26 जानेवारी रोजी दुसरा बिबट्या पिंजऱ्यात अडकला. मात्र, किरपे, … Read more

किरपेत बिबट्याने पुन्हा पाडला शेळीचा फडशा, एकाचवेळी दोन बिबट्याचे दर्शन

Bibatya

कराड | कराड तालुक्यातील किरपे येथे गेल्या काही दिवसात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात परिसरातील पाळीव कुत्रे तसेच शेळ्यावर मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. तर शेतात जाणाऱ्या लोकांच्यात भीतीचे वातावरण वाढत चालले आहे. मंगळावारी दि. 25 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शेळीवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे. किरपे येथे गेल्या … Read more

पुन्हा दर्शन : किरपेत ऊसात बिबट्या… बांधावर मजूर अन् वनविभाग झोपेत

कराड | कराड तालुक्यातील किरपे येथे दोन दिवसापूर्वी 5 वर्षाच्या मुलावर जीवघेणा हल्ला बिबट्याने केला होता. त्यानंतर या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. परिसरातील लोकांना व ऊसतोड मजूरांना बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. मात्र वनविभागाला बिबट्याचा मागमूस लागत नसल्याने मजूरांसह नागरिकांच्यात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे सुस्त वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी कधी जागे होणार आणि बिबट्याचा … Read more

कराडला शुक्रवारी शेतकरी संघटनाचा वीज वितरणवर आक्रोश मोर्चा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी वीज वितरण विरोधात सर्व शेतकरी संघटना एकवटल्या असून शुक्रवार दि. 28 रोजी विविध मागण्यांसाठी वीज वितरणच्या कराड शहर कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. शेती पंपांना मोफत वीज द्या व थकीत बिलापोटी शेती पंपाची तोडलेली वीज तात्काळ जोडा, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा … Read more

Budget 2022: कृषी क्षेत्राला मिळणार भेट,वाढू शकेल PM किसान सन्मान निधीची रक्कम

PM Kisan

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला मोठी भेट देऊ शकतात. अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान सन्मान निधी वार्षिक 6,000 वरून 8,000 रुपयांपर्यंत वाढवता येऊ शकते. याशिवाय मागणीवर आधारित शेतीला चालना देण्यासाठी सरकार प्रगतीशील शेतकऱ्यांना कर्ज देण्याबरोबरच इतर सुविधा देण्याचीही घोषणा करू शकते. अर्थसंकल्पात सर्व पिकांसाठी MSP वर पॅनेल तयार करण्याची घोषणा देखील केली … Read more

वडीलांना शेतात मदत करत होता 5 वर्षांचा मुलगा; अचानक झुडपातून बिबट्यानं झडप मारली अन्..

कराड | वडीलांना शेतातील कामात मदत करत असलेल्या एका पाच वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. कराड तालुक्यातील किरपे या गावात सदर घटना घडली. गेल्या काही दिवसापूर्वी किरपे गावाशेजारील येणके येथे बिबट्याने पाच वर्षाच्या मुलावर हल्ला करून ठार केले होते. आता पुन्हा याच परिसरात बिबट्याने हल्ला केल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. … Read more

एफआरपी फरकाचे 16 कोटी शेतकर्‍यांना परत मिळणार, साखर सहसंचालकांचे जिल्ह्यातील कारखान्यांना आदेश

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे गत हंगामात शासन नियमापेक्षा तोडणी वाहतुकीसह इतर खर्च ज्यादा लावल्याने ऊसाला द्यायच्या एफआरपीमध्ये मोठी घट झाली होती. त्यामुळे कारखानदारांनी शेतकर्‍यांची कोट्यवधी रुपयांची लूट केली होती, याविरोधात शेतकरी संघटनांनी आवाज उठवल्यानंतर सांगली जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सुमारे 16 कोटी 17 लाख 44 हजार तर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सुमारे 25 कोटी रुपये वाढीव एफआरपीची … Read more

कौतुकास्पद ! इस्लामपुरातील तरुणाने बनवली शेतीसाठीपूरक चारचाकी गाडी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे इस्लामपूर येथील कुमार पाटील या तरुणाने फॅब्रिकेशन व्यवसायातील अनुभव कौशल्य वापरून शेतीपूरक चारचाकी गाडी तयार केली आहे. दुचाकीच्या इंजिनचा वापर करत तयार केलेली चारचाकी गाडी शेतकऱ्यांना वरदा आहेत मशागतीची कामे या चारचाकी गाडीने सहज करता येत आहेत. एक वर्षाच्या मेहनतीने आलेल्या गाडीची अंतिम चाचणी आज यशस्वी झाली. तेव्हा कुमार पाटील … Read more

Budget 2022 : ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सरकार वाढवू शकते पीएम किसानची रक्कम

PM Kisan

नवी दिल्ली । कोरोना महामारीच्या काळात सरकारचा पूर्ण भर आगामी अर्थसंकल्प 2022 मध्ये अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर असू शकतो. यामध्येही विशेषतः ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेबाबत. याअंतर्गत सरकार 2022 च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अनेक घोषणा करू शकते. यामध्ये पीएम किसान सन्मान निधीच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की,”पीएम किसान अंतर्गत रक्कम 6,000 … Read more