मराठा आरक्षणप्रश्नी पंतप्रधान मोदींना आतापर्यंत 3 पत्रे लिहिली, भेटीसाठी वेळही मागितली, परंतु..

मुंबई । मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा खासदार संभाजीराजे भोसले लावून धरला आहे. सरकार मराठा आरक्षण प्रश्नाबाबत गंभीर नसल्याचा आरोप याचिकाकर्ते विनोद पाटील आणि विरोधकांकडून होत आहे. यासंदर्भात खासदार संभाजीराजे भोसले यांनीही सरकारच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींशी काय पत्रव्यवहार झाला, भेटीची वेळ मागितली होती का? असा प्रश्न … Read more

‘पंकजा चांगले काम करतेय’; कौतुकाच्या ट्विटवर शरद पवारांचा स्ट्रेट ड्राईव्ह, तर्कवितर्कांना उधाण

नाशिक । पुण्यात राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक मंगळवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक पार पडली. या बैठकीला पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि शरद पवार होते. या बैठकीत शरद पवारांच्या उपस्थितीत यशस्वी तोडगा काढत कामगारांना १४ टक्क्यांची दरवाढ देण्याचा निर्णय झाला. या बैठकीनंतर पंकजा यांनी एक ट्विट केले. यामध्ये त्यांनी … Read more

एसटी महामंडळाकडून प्रवाशांना दिवाळीचा बोनस; सणासुदीत तब्बल 1 हजार विशेष जादा फेऱ्या सोडणार

मुंबई । राज्यात सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या एसटी महामंडळाकडून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची संख्या, गर्दी वाढण्याचे संकेत आहेत. त्यानुसार वाढती मागणी लक्षात घेऊन, एसटी महामंडळानं ११ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत दररोज सुमारे १ हजार विशेष जादा फेऱ्यांचं नियोजन केलं आहे. या जादा फेऱ्या राज्यभरातील प्रमुख बसस्थानकांवरून सुटणार आहेत. सध्या … Read more

‘कोरोना गो’चा ज्याने घेतला वसा, ग्रासले त्याच कविमित्र रामदासा, गृहमंत्र्यांकडून आठवले स्टाईल सदिच्छा

मुंबई । ‘गो कोरोना कोरोना गो’ असा नारा देणारे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे. यमक अंदाजात प्रत्येक गोष्टीवर कोटी करणाऱ्या आठवलेंना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही हलक्या फुलक्या पद्धतीने काव्यात्मक सदिच्छा दिल्या आहेत. ‘‘कोरोना-गो’चा घेतला ज्याने वसा, ग्रासले त्याच कविमित्र रामदासा, धीर नका सोडू प्रसंग जरी आला बाका, कोरोनात नाही दम इतका … Read more

राशीदचा ‘तो’ भन्नाट स्पेल पाहून हरभजन झाला वेडा, म्हणाला..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्लीविरूद्धच्या सामन्यात हैदराबादच्या संघाने ८८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. हैदराबादच्या या विजयात राशिद खानने मोलाचा वाटा उचलला. त्याने ४ षटकात तब्बल १७ निर्धाव चेंडू टाकले. त्याच्या स्पेलमध्ये त्याने केवळ ७ धावा दिल्या आणि त्या बदल्यात ३ बळी टिपले. महत्त्वाची बाब म्हणजे त्याच्या गोलंदाजीवर मिळालेल्या सातही धावा या एकेरी धाव काढून मिळवलेल्या … Read more

कांदा व्यापाऱ्यांवर धाडी या केंद्राच्या सांगण्यावरून, राज्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही- शरद पवार

नाशिक । राज्यात कांदा व्यापाऱ्यांवर केंद्राच्या सांगण्यावरून धाडी टाकण्यात येत आहेत. राज्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी निर्यातबंदी आणि आयातीचा निर्णय केंद्रीय पातळीवरच होत असल्याचंही निदर्शनास आणून दिलं. शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी शेतकरी आणि कांदा व्यापाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांना पत्रकार परिषद घेऊन … Read more

कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये, सर्व काही केंद्राच्या हाती- शरद पवार

नाशिक । कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये; असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे. कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत व्यापारी, शेतकरी यांच्या बैठका सुरु आहेत. बाजारातील चढ-उतार याची सर्वाधिक झळ कांद्याला बसते. दोन व्यापारी प्रतिनिधी, दोन शेतकरी प्रतिनिधी यांना घेऊन केंद्रातल्या संबंधित मंत्र्यांशी चर्चा करणार … Read more

विधान परिषदेची जागा देण्याचा शब्द साहेबांनी बारामती भेटीत दिला होता, पण अजून एक निरोप नाही; राजू शेट्टी अस्वस्थ

पुणे  । विधान परिषदेच्या जागेसंदर्भात माझी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाली होती. विधान परिषदेची एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात येईल, असा शब्द शरद पवार यांनी दिला होता, असा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. मात्र तीन महिने झाल्यानंतरही राष्ट्रवादीकडून कुठलाही निरोप नसल्याचं राजू शेट्टी यांनी माध्यमांशी बोलताना … Read more

आरक्षणाबाबत खंबीर मराठा, राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही; खासदार उदयनराजेंचा इशारा

सातारा। मराठा आरक्षणाच्या स्थगितीवरील सुनावणी न्यायालयाने चार आठवडयांसाठी लांबणीवर टाकल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. आरक्षणाबाबत खंबीर मराठा, राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत उदयनराजे भोसले यांनी टीकास्त्र सोडले आहे. काय म्हणाले उदयनराजे? मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान, महाराष्ट्र सरकारचा वकील उपस्थित … Read more

राज्यपाल नियुक्त जागेसाठी राष्ट्रवादीची यादी तयार; खडसे, आनंद शिंदेंना तिकीट देत सोशल इंजिनीअरिंगचा प्रयत्न?

मुंबई । राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची विधान परिषदेवर लवकरच नियुक्ती होणार आहे. त्यामुळे शिवसेना, काँग्रेससह राष्ट्रवादीनेही आपल्या सदस्यांची यादी तयार केली आहे. ही यादी तयार करताना राष्ट्रवादीने सामाजिक समीकरणाची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, आनंद शिंदे, आदिती नलावडे आणि शिवाजी गर्जे या चार जणांना विधान परिषदेवर पाठवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. … Read more