‘राहुल गांधींसोबत केलेली वर्तणूक म्हणजे लोकशाहीचा गँगरेप’- संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई । हाथरस पीडितेच्या कुटुंबाला भेटायला जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांकडून काँग्रेस खासदार यांना राहुल गांधींना धक्काबुक्की झाली. यानंतर देशभरात काँग्रेस आणि सहयोगी पक्षांकडून या घटनेचा निषेध होत आहे. दरम्यान, राहुल गांधींसोबत केलेली वर्तणूक म्हणजे लोकशाहीचा गँगरेप असल्याची संतप्त प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. काल जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे. … Read more

डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण; पत्नी मेलानियादेखील कोरोनाबाधित

वॉशिंग्टन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची खासगी सल्लागार होप हिक्स यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोनाबाधित झाल्याने त्यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. कोरोनाची लागण झाल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: ला क्वारंटाइन … Read more

पुण्यात खळबळ! युवासेनेच्या पदाधिकाऱ्याचा कोयत्याने खून

Deepak Maratkar

पुणे प्रतिनिधी । पुण्यात युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याचा कोयत्याने खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी पहाटे १ वाजेच्या दरम्यान हि घटना घडली आहे. दीपक विजय मारटकर Deepak Maratkar (वय ३६) असे खून झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांचे ते चिरंजीव होते. Vijay Maratkar Death हाती आलेल्या माहितीनुसार, ही घटना … Read more

खळबळजनक! पुण्यात युवा सेना पदाधिकाऱ्याची सपासप वार करून निर्घृण हत्या

पुणे । पुण्यात युवा सेना पदाधिकाऱ्याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेने शहरात एकच खळबळजनक उडाली आहे. दीपक मारटकर (वय ३६) असे या युवा नेत्याचे नाव आहे. दीपक हा शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय मारटकर यांचा मुलगा होता. ही घटना शुक्रवारी पहाटे एकच्या सुमारास गवळी अळी शुक्रवारपेठ परिसरात घडली. रात्री १ वाजता घराबाहेर … Read more

Breaking | राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून अटक

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली असल्याचं समजत आहे. कलम १८८ अंतर्गत पोलिसांकडून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेसकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला … Read more

संतापजनक! यूपीत आणखी एक सामूहिक बलात्कार; रेप करून दलित मुलीचे पाय तोडले

Balrampur Rape Victim

बलरामपूर । उत्तर प्रदेशातील हाथरस येथील घटना ताजी असताना आता यूपीत आणखी एक बलात्काराची घटना घडली आहे. दलित मुलीवरील सामूहिक बलात्कार करून तिचे पाय तोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. उत्तर प्रदेशातील बलरामपूरमध्ये एका २२ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे. Balrampur Rape Victim हाती आलेल्या माहितीनुसार, दोन मित्रांनी … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! रेस्टॉरंट व बिअर बार सुरू करण्यास दिली परवानगी

मुंबई । राज्यात पाचव्या अनलॉकसाठी राज्य सरकारकडून गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी लॉकडाउन शिथिल करण्याच्या दिशेनं राज्य सरकारनं मोठं पाऊल टाकलं आहे. अनेक दिवसांपासून मागणी होत असल्याने सरकारनं रेस्टॉरंट व बिअर बार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. येत्या 5 ऑक्टोबरपासून 50% क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्स सुरु करता येणार … Read more

श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मालकीसंदर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली; अयोध्येनंतर मथुरेत संघर्ष सुरु होण्याची शक्यता तूर्तास मावळली

मथुरा । श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मालकीसंदर्भात दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळली आहे. सोमवारी या याचिकेवर सुनावणी करण्यात येणार होती. परंतु, याचिकाकर्ते सुनावणीसाठी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर मथुरेत मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याचिकाकर्ते सुप्रीम कोर्टात अपील करण्याची शक्यता आहे. दरम्यान, अयोध्येनंतर मथुरेत नवा संघर्ष सुरु होण्याची शक्यता … Read more

बेल एअर चा भोंगळ कारभार उघडकीस : उपसभापती संजुबाबा गायकवाड यांचा आरोग्य केंद्राचा अचानक भेटीने यत्रणेचे पोस्टमार्टम

महाबळेश्वर प्रतिनिधी । बेल एअर संस्थेने महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र तळदेव, तापोळा ही आरोग्य सेवा शासनाकडून चालविणेस घेतली आहेत. या बाबत कांदाटी, कोयना, सोळशी विभागात प्रचंड नाराजी असून आरोग्य सेवा व्यवस्थित मिळत नसलेबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. नुकत्याच झालेल्या पंचायत समितीमध्ये बेल एअर च्या कामाचे वाभाडे काढले असून देखील त्यांच्या … Read more

हाथरस प्रकरणात कारवाईसाठी योगीजी १५ दिवस पंतप्रधानांच्या फोनची वाट पाहत होते का? प्रियांका गांधींचा सवाल

नवी दिल्ली । हाथरस गँगरेप प्रकरणात कुटुंबाऐवजी पोलिसांनीच बळजबरीने पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याचं समोर आल्यानंतर सर्व स्तरांतून उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींनीही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर प्रकरणातील कारवाईबाबत दिरंगाईबाबद्दल प्रश्नाच्या फैरी झाडल्या आहेत. पीडितेवर अत्याचाराची घटना १४ तारखेला घटना घडली असताना या प्रकरणात कारवाई करण्यासाठी योगी आदित्यनाथ १५ … Read more