मुंबईतील लाॅकडाउन नियमावलीत बदल; BMC ने जारी केले ‘हे’ नवे निर्देश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रातील मुंबई शहरात झालेला आहे. येथे कोरोना-संक्रमित रुग्णांची संख्या ही ५० हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. त्याचबरोबर मृतांचा आकडा ही १७०० वर पोहोचला आहे. या व्हायरसला रोखण्यासाठी इथे लॉकडाऊन नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेने लॉकडाऊनशी संबंधित काही सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ज्यामध्ये लॉकडाऊनमध्ये घालण्यात आलेले निर्बंध कसे कमी केले जातील हे सांगण्यात आलेले आहे. तसेच ते टप्प्याटप्प्याने कसे उघडण्यात येतील हेही सांगण्यात आलेले आहे.

ही सुधारित मार्गदर्शक तत्त्वे खालीलप्रमाणे आहेत-

सर्व दुकाने त्यांच्या वेळेनुसार उघडली जातील. परंतु मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्सची दुकाने बंद राहतील.
रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांबाबतच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये असे म्हटले आहे की, ही दुकाने आळीपाळीने उघडली जातील. एका दिवशी एका बाजूची तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बाजूची दुकाने उघडली जातील.
सर्व दुकानांना सोमवार ते शनिवार या कामकाजाच्या वेळी उघडण्याची परवानगी दिलेली आहे मात्र ते रविवारी बंद राहतील.
खाजगी कार्यालयांमध्ये केवळ १०% कर्मचारीच काम करतील. म्हणजे फक्त १० लोक. उर्वरित लोकांना घरातूनच काम करावे लागेल.
ऑफिसमधील कर्मचार्‍यांच्या सॅनिटायजेशनची व्यवस्था करण्याची काळजी घ्यावी, जेणेकरुन संसर्ग त्यांच्या घरी पोहोचू नये.
वृत्तपत्रांच्या छपाई व वितरणाच्या संदर्भातही सूट देण्यात आली आहे. मात्र यादरम्यान, हे लक्षात घेतले पाहिजे की वृत्तपत्र घेणार्‍या आणि देणाऱ्यांना मास्क घालावे लागतील, तसेच आपले हात वारंवार स्वच्छ करावे लागतील आणि याबरोबरच सोशल डिस्टंसिंगची काळजीही घ्यावी लागेल.

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका संपूर्ण देशात वाढतो आहे. सर्वाधिक प्रभावित राज्य महाराष्ट्र आहे. आतापर्यंत येथे ८८,५२८ संक्रमित रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत ३१६९ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात ४०९७५ लोक या विषाणूपासून मुक्त झाले आहेत आणि घरी गेले आहेत. अद्यापही येथे ४४,३८४ सक्रिय प्रकरणे आहेत.

संपूर्ण देशाबद्दल बोलताना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मंगळवारी सकाळी सांगितले की, गेल्या २४ तासांत भारतात कोविड -१९ ची सुमारे ९९८७ प्रकरणे नोंदली गेली आहेत आणि त्यात ३३१ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या २,६६,५९८ इतकी आहे. यात १,२९,९१७ सक्रिय प्रकरणे, १,२९,२१५ बरे /डिस्चार्ज/ मायग्रेट आणि ७४६६ मृत्यूंचा समावेश आहे.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment