कुठपर्यंत आला आहे कोरोना लसीचा शोध, कोणत्या टप्प्यावर आहे ह्यूमन ट्रायल, आपल्यापर्यंत कधी पोहोचणार? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. या धोकादायक विषाणूमुळे आतापर्यंत 6 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे, तर जगभरात एक कोटी 40 लाख लोकं या आजारामध्ये अडकले आहेत. अमेरिकेत दररोज नवीन रूग्णांची नोंद होत आहे, तर भारतात रूग्णांची संख्या ही 10 लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोना विषाणूने सुमारे 9 महिन्यांपूर्वी जगभरात प्रवेश केला. परंतु आतापर्यंत या विषाणूशी लढण्यासाठी कोणतेही ठोस असे औषध तयार झालेले नाही. म्हणूनच प्रत्येकाचे डोळे कोरोनाच्या लसीकडे लागले आहेत. आपण जगभरात किती लसींवर काम चालू आहे आणि आपल्याला त्या मिळण्यास किती काळ लगेल याकडे एक नजर टाकूयात.

140 लसींवर काम सुरु
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) च्या मते, जगभरात सध्या 140 लसींवर काम सुरू आहे. यापैकी 23 लसी अशा आहेत ज्यांच्या क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. कोणत्याही रोगावरती लस तयार करण्यास वर्षानुवर्षे लागतात, परंतु कोरोनासारख्या साथीच्या रोगाशी लढा देण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ या दिवसांत युद्धपातळीवर काम करत आहेत. अशा परिस्थितीत, अशी अपेक्षा आहे की या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरूवातीस यावरील लसीचा शोध पूर्ण होईल. दरम्यान, संपूर्ण जग हे चार लसींकडे लक्ष देऊन आहेत. या लसी आहेत ज्यांच्या मानवी चाचण्या सुरु आहेत.

मॉडर्ना
>> या अमेरिकन कंपनीने सर्वात प्रथम कोरोनाच्या लसीवर काम सुरू केले.
>> या कंपनीने केवळ 42 दिवसातच एमआरएनए -1273 या लसीचा पहिला डोस तयार केला. यानंतर हे चाचणीसाठी अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थांकडे पाठविण्यात आले.
>> आतापर्यंतच्या अहवालानुसार पहिल्या दोन टप्प्यांतील क्लिनिकल चाचण्यांचा चांगला परिणाम मिळाला आहे. या लसीचा सर्वात अवघड आणि तिसरा टप्पा हा 27 जुलैपासून सुरू होईल. या दरम्यान सुमारे 30,000 लोकांवर याची चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीनंतर ही लस मानवी शरीर कोविड -१९ मधून खरोखर वाचवू शकते की नाही हे स्पष्ट होईल.
>> यापूर्वी या टप्प्यातील चाचणी 16 मार्च रोजी सुरू झाली. यावेळी 18 ते 55 वर्षे वयोगटातील 45 लोकांवर याची चाचणी घेण्यात आली. त्याचा अहवालही प्रकाशित केला गेला आहे आणि चांगले परिणामही मिळालेले आहेत.

ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या अ‍ॅस्ट्रा झेनेका
>> संपूर्ण जगाला ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या लसीकडून जास्त अपेक्षा आहेत. त्याच्याही क्लिनिकल चाचण्या या वेगवेगळ्या देशांमध्ये सुरू आहेत.
>> सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देखील या ऑक्सफोर्ड प्रकल्पात भागीदार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वाधिक लस तयार करण्यासाठी ओळखली जाते.
>> एप्रिलमध्ये याच्या मानवीय चाचण्यांचा पहिला टप्पा सुरू झाला. या दरम्यान, सुमारे 1112 लोकांवर त्याची चाचणी घेण्यात आली.
>> सध्या या लसीच्या तिसर्‍या टप्प्याची चाचणी दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये सुरु आहे.
>> याच्या मानवी चाचणीचे निकाल अद्यापही अधिकृतपणे जाहीर झालेले नाहीत. येत्या दोन दिवसांत याची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी अपेक्षा आहे.
>> ऑक्सफोर्ड विद्यापीठाने असा दावा केला आहे की, या चाचणीत सामील झालेल्यांमध्ये अ‍ॅन्टीबॉडीज आणि व्हाइट रक्त पेशी (टी-सेल्स) विकसित झाल्या आहेत. त्यांच्या मदतीने, मानवी शरीर या संक्रमणास लढण्यासाठी तयार असू शकते.
>> सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर्श पूनावाला यांच्यानुसार, ऑगस्टमध्ये भारतातही या लसीची मानवी चाचणी होणार आहे. कंपनी या लसीचा डोस तयार करण्यास आधीच तयार आहे.
>> सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार हिमाचल प्रदेशातील कसौलीच्या सरकारी प्रयोगशाळेत या लसीची नमुना चाचणी सुरू आहे.

भारत बायोटेक
>> भारत बायोटेकने कोरोना लसीची मानवी चाचणी सुरू केली आहे. कंपनीने चाचणी सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. कंपनीने याबाबत म्हटले आहे की, या लसीची मानवी क्लिनिकल चाचणी करण्याचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. ही रँडमाइज्ड आणि डबल ब्लाइंड ट्रायल असेल.
>> पहिल्या टप्प्यात 375 वॉलंटियर सहभागी होत आहेत. त्याची चाचणी देशातील वेगवेगळ्या एम्समध्ये सुरू आहे.
>> भारत बायोटेक कंपनीने यापूर्वी पोलिओ, रेबीज, चिकनगुनिया, जपानी एन्सेफलायटीस, रोटाव्हायरस आणि झिका यावरील विषाणूची लसदेखील तयार केलेली आहे.

झायडस कॅडिला
>> गुजरातस्थित झेडस कॅडिला हेल्थ केअर लिमिटेडने 15 जुलैपासून कोविड -१९ या लसीची क्लिनिकल चाचणी सुरू केली आहे.
>> झायडस कॅडिलाचे अध्यक्ष आणि एमडी पंकज आर. पटेल यांच्या मते, कोविड -१९ ची संभाव्य लस ‘ZyCoV-D’ ची क्लिनिकल चाचणी सात महिन्यांत पूर्ण होईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment