हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने शुक्रवारी सांगितले की, बिल अँड मिलिंडा गेट्स फाऊंडेशन भारतात 10 कोटी कोविड -19 वॅक्सीन तयार करण्यासाठी 150 मिलियन डॉलर्सचे फंडिंग करतील. सीरम इन्स्टिट्यूट कोविड-19 ची लस तयार करण्यासाठी Astra Zeneca आणि Novavax समवेत काम करत आहे. या दोन्ही कंपन्यांसह झालेल्या करारानुसार, सीरम इन्स्टिट्यूट दोन कोविड -19 वॅक्सीनसाठी जास्तीत जास्त 3 डॉलर पर्यंत शुल्क आकारू शकते. जगातील सर्वात मोठी लस उत्पादकांपैकी एक असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटला आंतरराष्ट्रीय लस अलायन्स GAVI च्या माध्यमातून गेट्स फाऊंडेशनकडून हा निधी मिळू शकेल.
सीरम इन्स्टिट्यूटने शुक्रवारी याबाबतीत सांगितले की, ‘ कंपनी रिस्क मॅन्युफॅक्चरिंगला हे फंडिंग सपोर्ट देईल, जे Astra Zeneca आणि Novavax यांच्यासह भागीदारीत तयार केली जात आहे.’ जर या वॅक्सीनला सर्व प्रकारचे लायसन्स मिळाले आणि डब्ल्यूएचओ – जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व निकषांची पूर्तता केली तर ती खरेदीसाठी उपलब्ध करुन दिली जाईल. Novavax इंकने बुधवारी सांगितले की, संभाव्य कोविड -19 वॅक्सीनच्या डेवलपमेंट आणि कॉमर्शियलायझेशनसाठी सीरम इन्स्टिट्यूटबरोबर सप्लाय आणि लायसन्सचा करार झाला आहे.
सीरम ही सर्वात मोठी लस उत्पादक आहे
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असून सर्वात जास्त लस डोस तयार करण्याची क्षमता आहे. आता या कंपनीला भारतात लसीचे एक्सक्लूसिव राइट्स असतील. त्यात ‘महामारी कालावधी’साठी अन्य देशांसाठी एक नॉन-एक्सक्लूसिव डील देखील असेल. मात्र, यामध्ये ज्या देशांना जागतिक बँकेने अपर-मिडल क्लास किंवा उच्च-उत्पन्न देश म्हणून संबोधले आहे अशा देशांचा त्यात समावेश असणार नाही.
Novavax आहे वॅक्सीन तयार करण्याच्या तंत्रज्ञानामध्ये शक्तिशाली
मंगळवारी Novavax ने असा दावा केला की त्याच्या वॅक्सीनमुळे कोरोना विषाणूविरूद्ध पर्याप्त अॅटीबॉडी तयार होण्यास मदत झाली. मात्र, ही अगदी सुरुवातीची अवस्था क्लिनिकल चाचणी होती. कंपनीने म्हटले आहे की, सप्टेंबरच्या अखेरीस ते तिसर्या टप्प्यातील मोठ्या प्रमाणात क्लिनिकल चाचणी सुरू करू शकतात. सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला म्हणाले की Novavax बरोबर आम्ही मलेरियाची लस तयार केली आहे. आम्हाला माहित आहे की त्यांचे वॅक्सीन टेक्नोलॉजी किती शक्तिशाली आहे.
ऑक्सफोर्डची लस
यापूर्वी, सीरम इन्स्टिट्यूटने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वॅक्सीनसाठी यूके-स्वीडन कंपनी Astra Zeneca बरोबर भागीदारी केली. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) या वॅक्सीनच्या दुसर्या आणि तिसर्या टप्प्यातील चाचण्यांना मान्यता दिली आहे.
ऑक्सफर्डच्या कोविड -१९ वॅक्सीनचे आतापर्यंत सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. The Lancet नावाच्या वैद्यकीय जर्नलच्या अहवालात असे म्हटले गेले आहे की या वॅक्सीनने 18 ते 55 वर्षे वयोगटातील लोकांना डुअल इम्युन रिस्पॉन्स (Dual Immune Response) दिला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.