हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना लसीच्या शोधात भारतासह जगातील बरीच देश हे अहोरात्र झटत आहेत. या देशांनी आपली सर्व शक्ती या लसीच्या शोधात लावली आहे. असे असूनही या लसीची चाचणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. मात्र, या लसीची चाचणी ही अंतिम टप्प्यात आहे असा दावा बरेच देश करीत आहेत. जगातील 11 कंपन्या या ही लस तयार करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत. मानवी चाचणीच्या टप्प्यात पोहोचलेल्या या 11 कंपन्यांपैकी दोन कंपन्या या भारतीय आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या सहकार्याने भारत बायोटेक आणि झेडस कॅडिला यांनी आणखी एक लस तयार केली असून ती अद्याप लाँन्च केलेली नाही आहे. या दोन भारतीय कंपन्या हा लस बनवण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.
दोन दिवसांपूर्वीच आयसीएमआरने असा दावा केला होता की कोरोनाची लस 15 ऑगस्टपर्यंत तयार केली जाईल. तज्ञांसह, भारत सरकारच्या विज्ञान मंत्रालयानेही आयसीएमआरच्या या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तज्ञ याबाबत असे म्हणतात की, इतक्या कमी वेळात हे शक्य नाही. अशा परिस्थितीत, प्रश्न हा आहे की विज्ञान मंत्रालय आणि आयसीएमआर यांचे भारतातही कोविड -१९ च्या लसीबाबत वेगवेगळे दावे का आहेत? अखेर, आयसीएमआरची मुदत 15 ऑगस्टपर्यंत का झाली?
विज्ञान मंत्रालय आणि आयसीएमआरने स्वतंत्रपणे दावा केला
रविवारी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे की जगात तयार करण्यात आलेल्या 140 पैकी 11 ह्यूमन ट्रायल फेजच्या टप्प्यात पोहोचलेल्या आहेत, मात्र त्यापैकी २०२२ पूर्वी कोणतीच लस ही सामूहिक वापरासाठी तयार होण्याची शक्यता नाही. 2 जुलै रोजी, आयसीएमआरने या लसीच्या चाचणीसाठी निवडलेल्या 12 क्लिनिकल साइट्सच्या प्रमुखांना पत्र लिहून 15 ऑगस्टपूर्वी या लसीची चाचणी पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले होते. आयसीएमआरच्या या पत्रावरून देशात वादंग निर्माण झाला.
आयसीएमआरच्या या पत्रावर आरोग्य तज्ञ आणि संशोधकांनी गंभीर चिंता व्यक्त करत सांगितले की, ही लस सुरू करण्याच्या घाईत या लसीच्या गुणवत्तेशी तडजोड केली जाऊ नये. अशा अंतिम मुदतीत काम करून, ही लस अपूर्ण डेटासह लाँच केली जाईल.
आयसीएमआर दाव्यावर तज्ञांनी उपस्थित केले प्रश्न
डॉ. प्रभात रंजन डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटरचे प्रमुख डॉ. प्रभात कुमार म्हणालेत कि, ‘ आतापर्यंतच्या चाचणीमध्ये अशा कोणत्याही लसीने संसर्ग रोखला नाही. ऑक्सफोर्ड किंवा अमेरिकेतही एका विशिष्ट पातळीनंतर ही लस अपयशी ठरत आहे. आतापर्यंत आम्ही केवळ प्राणी मॉडेल म्हणून वापरत आहोत, मात्र तेही अपयशी ठरत आहे. प्राण्या नंतर ह्यूमन मॉडल येईल. पहा, कोणतीही लस विकसित करण्याची प्रक्रिया ही किमान दीड वर्षांची असते. अपयशाची तक्रार नसतानाही ते घडते. जगातील कुठल्याही कोरोना लसीचा प्रयत्न आजपर्यंत कोणत्याही मनुष्यावर झाला नाही. जरी प्रयत्न झाला तरी तो अयशस्वी झाला आहे.
डॉ. प्रभात कुमार म्हणतात, ‘लस बनवल्यानंतर ती काम करते की नाही हे पाहिले जाते. पहिले ती प्राण्यांवर वापरली जाते. जर हा प्रयोग प्राण्यांमध्ये यशस्वी झाला तरच तो मानवी शरीरात वापरला जातो. ही लस संक्रमित आणि संक्रमित नसलेल्या दोहोंवर वापरली जाते. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर तीन वेळा वापरला जातो. जर हा प्रयोग कोणत्याही एका स्टेपमध्ये अयशस्वी ठरला तर पुन्हा पहिल्या टप्प्यातून कार्य सुरू करावे लागते.
एकंदरीत, आम्हाला कोरोना लससाठी आणखी काही महिने थांबावेच लागेल. तथापि, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय यांच्यात समन्वयाचा अभाव आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे. अलीकडेच विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने हे स्पष्टपणे सांगितले होते की, जगभरातील एकूण लस उत्पादकांपैकी 140 पैकी 11 निर्माते हे मानवी चाचणीच्या टप्प्यात आले आहेत. मात्र , यापैकी कोणत्याही कंपन्या या 2021 पूर्वी यावरील लस बनवण्याची शक्यता नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.