हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याची जीभच घसरली. मात्र त्यानंतर लगेच गौतम गंभीर आणि हरभजन सिंग यांनी त्याची चांगलीच शाळा घेतली. इंडिया टुडेशी बोलताना हरभजनसिंग म्हणाला की,” या शाहिद आफ्रिदीने आपल्या देशाबद्दल आणि पंतप्रधानांबद्दल जे काही म्हंटले आहे ते स्वीकारण्यासारखे नाहीये. यावेळी आफ्रिदीने आपली सीमा ओलांडली आहे.
वास्तविक आफ्रिदी काश्मीर प्रश्नावर बोलताना पंतप्रधान मोदींवर सतत आपला निशाणा साधत आहे. अलीकडेच त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो मोदींवर आक्षेपार्ह कमेंट देताना दिसत आहेत. त्याच्या या विधानानंतर गंभीर आणि हरभजन यांनी त्याला योग्य उत्तर दिले. आफ्रिदी म्हणाला होता की,” कोरोनापेक्षाही मोठा आजार पीएम मोदींच्या मनात आहे आणि ते धर्मांधतेने आजारी आहेत.
हरभजन सहित गौतम गंभीरनेही आफ्रिदीला उत्तर देताना लिहिले की.” आफ्रिदी , इम्रान खान आणि बाजवा यांसारखे जोकर लोक पाकिस्तानी लोकांना मूर्ख बनवण्यासाठी भारत आणि आमच्या पंतप्रधानांविरूद्ध विष पेरू शकतात, पण जजमेंट डेपर्यंत तुम्हांला काश्मीर मिळणार नाही. गंभीर पुढे म्हणाला की, शाहिद आफ्रिदी या १६ वर्षाच्या व्यक्तीचे म्हणणे आहे की,” सात लाख पाकिस्तानी सैन्याच्या मागे २० करोड लोक उभे आहेत, तरीही ७० वर्षांपासून ते काश्मीरसाठी भीक मागत आहेत. गंभीरने शाहिद आफ्रिदीला प्रत्युत्तर म्हणून बांगलादेशची आठवण करुन दिली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.