हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । युरोपियन कमिशनने शुक्रवारी म्हटले आहे की कोविड -१९ च्या गंभीर रूग्णांसाठी अँटीव्हायरल ड्रग रेमडेसिवीरला मान्यता देण्यात आली आहे. यासह, युरोपियन प्रदेशात कोविड -१९ च्या उपचारांसाठी मंजूर होणारे हे पहिले औषध ठरले आहे. सुमारे एका आठवड्यापूर्वीच, युरोपियन मेडिसीन एजन्सीने (EMA- युरोपियन मेडिसीन एजन्सी) 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या किशोरवयीन मुलांसाठी गिलियड सायन्सेस या औषधाचा मार्ग मोकळा केला. हे औषध केवळ न्यूमोनिया ग्रस्त आणि ऑक्सिजनचा सपोर्ट असलेल्या रूग्णांसाठीच वापरले जाईल.
सुमारे दोन दिवसांपूर्वी, कंपनीने पुढील तीन महिन्यांकरिता आपला संपूर्ण पुरवठा अमेरिकेसाठी उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेतील गंभीर परिस्थिती लक्षात घेता त्यांनी हा निर्णय घेतल्याचे कंपनीने म्हटले आहे. मात्र, पुढील तीन महिन्यांपर्यंत, या औषधाच्या इतरत्र होणाऱ्या पुरवठ्याबद्दल चिंता वाढत आहे.
युरोपियन युनियनच्या आरोग्य आणि अन्न सुरक्षा आयुक्त, स्टेला कायरियाकिड्स यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे, “कोरोना व्हायरस संसर्गाची लस आणि त्यावरील शक्य ते उपचार देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.”
27 युरोपियन देशांसाठी रेमडेसिवीरची मागणी
बुधवारी आयोगाने म्हटले आहे की 27 युरोपियन देशांसाठी रेमडेसिवीर घेण्याबाबत गिलियड सायन्सेसशी चर्चा सुरू आहे. आयोग म्हणाले, ‘सशर्त मार्केटिंग प्राधिकरण आमच्या नियामक प्रक्रियेअंतर्गत आणले गेले आहे जेणेकरून आम्हाला लवकरात लवकर हे औषध आम्हांला मिळू शकेल आणि सद्यस्थितीची आवश्यकता पूर्ण होऊ शकेल. सध्याच्या या साथीच्या काळात सार्वजनिक आरोग्यास होणार्या धोक्याशी सामना करण्याची तयारीचाही यात समावेष आहे. ‘
जसजशी याबद्दलची आकडेवारी उघड होते, तसतशी ही एजन्सी त्यांचे विश्लेषण करते. ईएमएने एप्रिलच्या उत्तरार्धात ही प्रक्रिया सुरू केली.
कोरोनासाठी सर्वात प्रभावी औषध म्हणजे रेमडेसिवीर
वैद्यकीय तपासणीनंतर, रेमडेसिवीरची मागणी वेगाने वाढली आहे. हे इंट्रावेनस किंवा अँटीवायरल औषध आहे जे रुग्णांच्या नसामध्ये दिले जाते. असे मानले जात आहे की कोविड -१९ च्या संसर्ग ग्रस्त रूग्णांसाठी हे सर्वात प्रभावी औषध आहे. हे डेक्सामेथासोनपेक्षा अधिक प्रभावी असल्याचे मानले जाते आहे.
कोरोना विषाणूच्या रूग्णांना 5 दिवसांसाठी रेमडेसिवीरचा डोस दिला जातो. हे औषध फक्त त्या रूग्णांवरच वापरले जाते जे रूग्णालयात दाखल आहेत आणि गंभीर अवस्थेत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.