हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या गणेशोत्सव कार्यक्रमांना कोरोनाच्या संकटामुळे कोणतीही परवानगी मिळाली नाही. तसेच या वर्षी चा गणेशोत्सव खूप साध्या पद्धतीने साजरा करा. असे आवाहन राज्य सरकारने अनेक गणेशोत्सव मंडळांना दिले आहे. अनेक मंडळांनी राज्य सरकारच्या निर्णयाला मान देऊन आणि यंदाचे देशावर असलेले संकट पाहता. अनेकांनी हा सण साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच माध्यमातून गो ग्रीन हि संकल्पना राबवली गेली आहे. मुंबईतील एका महिला पर्यावरण प्रेमी ने हि संकल्पना ला सुरुवात केली आहे. आणि त्या अनुषंगाने तिला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमामध्ये गणपतीच्या मूर्ती सोबत एक मास्क आणि एक सानिडायझर ची बाटली गिफ्ट दिली जाणार आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव सुद्धा होऊ शकतो. तसेच आरोग्य बाबत जनजागृती सुद्धा होऊ शकते.
गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्व भक्तानी अगदी घरगुती गणपती सुद्धा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक ठिकाणी ऑर्डर प्रमाणे मूर्ती बनवण्याचे काम सुरु आहे. तसेच या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये जास्त प्रमाणात इको फ्रेंडली गणपतीच्या मूर्तीना जास्त प्राधान्य दिले जात आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस पेक्षा मातीच्या गणपतीची मूर्ती घेण्याकडे सर्वसामन्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा कल आहे. पर्यावरनाचे महत्व लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वाना आहे.
मातीच्या मूर्तीचे संकल्पनाकार ठाण्यातील पर्यावरण स्नेही कुंभार यांनी दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा गणेश मूर्ती सोबत जास्वदांचे आणि बेलाचे रोप हे मुंबई, नवी मुंबई, ठाणे या भागात घरपोहच सेवा देण्याचे काम सुरु आहे. तसेच त्या मूर्ती सोबत यावर्षी प्रत्येक कुटुंबाला एक मास्क आणि सॅनिटायझर देण्यात येणार आहे. या संकल्पनेला दरवर्षी पेक्षा जास्त मागणी या वर्षी मिळाली आहे. या वर्षी नेहमी पेक्षा जास्त बुकिंग आले आहेत. यावर्षी भक्तांना मूर्ती घेण्यासाठी बाहेर जावे लागणार नाही तसेच मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी सुद्धा बाहेर जायचे नाही घरातल्या घरात सुद्धा विसर्जन करू शकता. यावर्षी गो ग्रीन बाप्पा मुंबई महापरिसरात मिळणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.