नवी दिल्ली । गेल्या अनेक महिन्यांपासून जीएसटी फ्रॉडच्या घटनांमध्ये वेगाने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत सरकारने ही बाब गांभीर्याने घेताना अशा फ्रॉड करणार्यांवर कारवाई सुरू केली आहे. गेल्या तीन आठवड्यांत जीएसटी इंटेलिजेंसच्या महासंचालनालयाने देशभरात टॅक्स क्रेडिट घोटाळ्याची 1161 प्रकरणे पकडली. त्याच वेळी या प्रकरणांमध्ये 104 लोकांना अटक करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त DGGI ने देशभरात जीएसटी रजिस्ट्रेशन असणाऱ्या 3479 बनावट कंपन्यांचा शोध लावला आहे.
520 कोटी बनावट पावत्या घोटाळा
या कारवाई दरम्यान, DGGI ने 520 कोटी रुपयांच्या बनावट इनव्हॉइस घोटाळ्याच्या आरोपाखाली महाराष्ट्रातील आमदार सुनील गुट्टे याला अटक केली. या एका प्रकरणातून तुम्ही अंदाज लावू शकता की, जीएसटी फ्रॉडच्या 1161 प्रकरणात सरकारचे किती नुकसान झाले असेल. लीगल सपोर्ट असूनही सुनील गुट्टे यांना अद्याप जामीन मिळू शकलेला नाही.
व्यवसायाशिवाय बनावट पावत्या तयार
मीडिया रिपोर्टनुसार शुक्रवारी DGGI ने जीएसटी फ्रॉडच्या प्रकरणात 8 जणांना अटक केली. ही लोकं बनावट कंपन्यांच्या माध्यमातून सर्कुलर ट्रेडिंग करायचे. या व्यतिरिक्त या आरोपींनी बर्याच कंपन्यांसाठी बनावट पावत्याही दिल्या, तर काही वेळा त्याच कंपन्यांसाठी अनेक पावत्याही दिल्या. हे इनव्हॉइस कोणत्याही वस्तू किंवा सेवांचा पुरवठा न करता जारी केले गेले. म्हणजेच संपूर्ण व्यवसाय फक्त कागदावरच चालला होता.
38 शहरांमध्ये केली गेली कारवाई
या संपूर्ण कारवाईदरम्यान DGGI ने मेट्रो शहरांसह देशभरातील 38 शहरांमध्ये शोध घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, कर चुकवल्याच्या एक्झॅट अमाउंटचा शोधण्यासाठी बनावट पावत्या घेणाऱ्या लोकांची धरपकड सुरु असून त्यांच्या संपूर्ण नेटवर्कचा मागोवा घेतला जाईल. जीएसटी कमी संकलनामुळे जीएसटी प्राधिकरणाने यंत्रणेतील फसवणूक शोधण्याचा निर्णय घेतला. महसूल गळतीचे सर्वात मोठे कारण म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट आउटफ्लो.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.