सातारा जिल्ह्यात आज 11 नवे कोरोनाग्रस्त तर दोघांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

काल रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 2, प्रवास करुन आलेले 3, सारीचे 5 व आरोग्य कर्मचारी 1 असे एकूण 11 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. तसचे माण तालुक्यातील कन्नडवाडी व सातारा तालुक्यातील जिहे येथील बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

यामध्ये सातारा तालुक्यातील फडतरवाडी येथील 23 वर्षीय पुरुष, धनगरवाडी, कोडोली येथील 48 वर्षीय पुरुष, करंडी येथील 59 वर्षीय पुरुष, कारंडवाडी येथील 30 वर्षीय पुरुष, क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 42 वर्षीय पुरुष आरोग्य कर्मचारी, जावळी तालुक्यतील कुसुंबी येथील 35 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील सुभाषनगर येथील 75 वर्षीय पुरुष, खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील 42 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 60 वर्षीय पुरुष, पारगाव येथील 50 वर्षीय पुरुष, फलटण येथील 34 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे रात्री उशिरा कन्नडवाडी ता. माण येथील 75 वर्षीय पुरुष व जिहे ता. सातारा येथील 58 वर्षीय पुरुष या दोन कारोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.