कराडला कोविड रूग्णांसाठी आठ दिवसांत नविन 50 बेड; जिल्हाधिकारी यांचा बैठकीत निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

येत्या आठ दिवसांत कोविड रूग्णांसाठी वेणूताई उपजिल्हा रूग्णालयात 50 बेड उपलब्ध करण्यात येणार आहे. गुरूवारी (दि. 20) जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी त्यासाठी पायाभूत सुविधा पुरविण्यावियषी प्रशासकीय अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली होती.

कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालय कोविडसाठी सुरू करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे प्रयत्नशील असल्याचे सांगितले होते. तसेच कोविड रूग्णांसाठी बेड कमी पडत असल्याने वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात बेडची उपलब्धता करण्याची मागणी होत होती. त्यामुळे गुरूवारी जिल्हाधिकारी यांनी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार अमरदिप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, डॉ.एस. ए. खैरमोडे, डॉ. दिपक कुर्‍हाडे, डॉ. ईस्माईल मुल्ला यांच्या उपस्थितीत बैठक केली. यावेळी कोविड रूग्णांसाठी बेड उपलब्ध करण्यासाठी येणार्‍या अडचणी जाणून त्या दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सांगण्यात आल्या. त्यामुळे आता लवकरच कराडला आणखी वाढीव 50 अतिरिक्त बेड मिळणार आहेत.

जिल्हाधिकारी यांनी कोविड रूग्णांसाठी बेड उपलब्धतेसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा केवळ आठ दिवस सांगितले आहेेत. कॉटेज रूग्णालयत ग्रांऊड फ्लोअरला असलेल्या वॉर्डमध्ये कोविड रूग्ण ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या सर्व विभागाची आज पाहणी करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकार्‍यांनी उपजिल्हा रूग्णांलयात रिक्त असलेली पदे भरण्याची मागणी केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.