नवी दिल्ली । कोरोना लस (Covid-19 Vaccine) कडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. जगभरातील लोक आतुरतेने या लसीची वाट पाहत आहेत. Moderna आणि Pfizer यासारख्या प्रमुख औषध कंपन्यांना आशा आहे की, कोरोनाव्हायरसच्या ज्या लसीवर ते काम करत आहेत त्याचा चांगला परिणाम होणार आहे. परंतु ही लस सर्वसामान्यांना उपलब्ध होणार आहे की नाही, तसेच याची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहील की नाही याबद्दल चिंताही आहे.
कोरोना लस मोफत देण्यासाठी समर्थन
दरम्यान, इन्फोसिसचे सह-संस्थापक एन.आर. नारायण मूर्ती (NR Narayana Murthy) यांनी म्हटले आहे की, एकदा कोरोनाची लस बाजारात उपलब्ध झाली, तर देशातील प्रत्येकाला ती लस विनामूल्य दिली जावी, यासाठी कोणाकडूनही पैसे आकारले जाऊ नये. ते म्हणाले की कॉर्पोरेट जगावर टॅक्स लावला गेला असला तरी चालेल मात्र सर्वसामान्यांना ही लस विनामूल्य मिळायला हवी. कोरोना संकटाच्या वेळी नारायण मूर्ती यांचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आहे.
बिहार निवडणुकीत भाजपाच्या जाहीरनाम्यात मोफत कोरोना लसीचा समावेश आहे
नुकत्याच पार पडलेल्या बिहार निवडणुकीच्या वेळी भाजपाने आपला जाहीरनामा जाहीर केला होता, त्याअंतर्गत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कोविड -१९ ची लस सर्वांना मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. त्या म्हणाल्या की, ज्या कंपन्यांना औषधाची किंमत परवडेल, त्यांनी नि: शुल्क औषध बनवून लोकांना द्यावे आणि त्यांची सामाजिक जबाबदारी पार पाडावी.
यानंतर नारायण मूर्ती यांचे वक्तव्य अशा वेळी आले जेव्हा Moderna आणि Pfizer सारख्या कंपन्या त्यांची दोन डोसची औषधे बाजारात सादर करणार आहेत. आकडेवारीनुसार, देशातील संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण करण्यासाठी सरकारला सुमारे 3 अब्ज डोसची आवश्यकता असेल. मंगळवारी कोरोनाची दैनंदिन प्रकरणे 38000 वर गेली होती जी एक दिवस आधी 30 हजारांच्या खाली गेली, परंतु आता बर्याच राज्यांत कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या भीतीने राज्य सरकारांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.