नागरिकत्व सुधारणा विधेयक पारित होणं हा भारतासाठी ऐतिहासिक क्षण – नरेंद्र मोदी

नागरिकत्व सुधारणा विधेयक बुधवारी राज्यसभेतही आठ तासांच्या चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने १२५ तर, विरोधात १०५ मते पडली. विधेयकावरून घूमजाव करणाऱ्या शिवसेनेने राज्यसभेत सभात्याग केला. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल. सध्या या विधेयकाला बऱ्याच ठिकाणाहून तीव्र विरोध होत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर ट्विट करत आपला आनंद व्यक्त केला आहे. ”भारतासाठी हा ऐतिहासिक दिवस असल्या”चे त्यांनी ट्विट मध्ये म्हणले आहे.

जेष्ठ नागरिकांच्या कायद्याचे नवे विधेयक लोकसभेत सादर

जेष्ठ नागरिकांना वय झाल्यानंतर कौटुंबिक कलहामुळे बऱ्याच वेळा आपले राहते घर सोडून जावे लागते. स्वतःच्या मुलांकडून होत असलेल्या त्रासामुळे त्यांना त्यांच्या उतारवायामध्ये वणवण भटकावे लागते. त्यांच्या सोबत बऱ्याच वेळा गैरव्यवहार झाल्याचे देखील पाहण्यात येते. मात्र आता यावर आता सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केलेली आहेत. मुलांसमवेत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांबरोबर किंवा पालकांबरोबर हेतुत: गैरव्यवहार करणाऱ्यांना किंवा त्यांना सोडून देणाऱ्यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास किंवा दहा हजार रुपयांचा दंड किंवा या दोन्ही शिक्षा लागू होतील, असे विधेयक लोकसभेत बुधवारी सादर करण्यात आले. या विधेयकामुळे ‘ज्येष्ठ नागरिक आणि पालक कल्याणकारी कायदा, २००७’मध्ये सुधारणा केली जाणार आहे.

नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

हे विधेयक लोकसभेत मांडल्यापासूनच ईशान्य भारत धुमसत आहे. मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर उतरून या विधेयकाचा विरोध करत आहेत. तसेच मुस्लिम समाजामधून देखील नाराजी व्यक्त होत असल्याने, या विधेयकाला विरोध करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

म्हणून शिवसेनेनं केला सभा त्याग; राऊतांचे स्पष्टीकरण

व्होट बँक मजबूत करण्यासाठी भाजप सरकार हा प्रयत्न करत आहे. शरणार्थी लोकांना मतदानाचा अधिकार देऊ नये, अशी शिवसेनेची भूमिका आहे. तामिळ हिंदू सुद्धा श्रीलंकेमध्ये अत्याचार सहन करत आहेत.

पंतप्रधान मोदींनी दिल्या शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

दिल्ली | पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवार यांना दिर्घायुष्य लाभो आणि आरोग्यमय आयुष्य लाभो यासाठी मोदी यांनी प्रार्थना केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज ट्विट करुन पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त देशभरातून पवार … Read more

गुवाहाटीत अनिश्चित काळासाठी कर्फ्यू जाहीर; कॅब विरोधात संपूर्ण आसाममध्ये आंदोलन तीव्र

आसाम राज्यात नागरिकत्व सुधारणा विधेयकाला (कॅब) तेथील जनता तीव्र विरोध दर्शवत रस्त्यावर उतरली आहे. त्यामुळं कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने गुवाहाटीत आज संध्याकाळी ६.१५ मि.पासून अनिश्चित काळासाठी कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. याबाबत गुवाहाटीचे पोलीस आयुक्त दीपक कुमार यांनी माध्यमांना माहिती दिली आहे. जोपर्यंत संपूर्ण परिस्थिती पूर्वीसारखी शांत होत नाही तोपर्यंत कर्फ्यू लागू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

१ कोटी ३७ लाखांचे बक्षिस अंगावर असणार्‍या बड्या मावोवादी नेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

जगदलपूर | बंदी घातलेल्या माकपचे ज्येष्ठ नेते रघुला श्रीनिवास उर्फ रमन्ना यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. रमन्ना यांच्यावर संयुक्तपणे १ कोटी ३७ लाख रुपयांचे बक्षिस असून हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा ७ डिसेंबर रोजी मृत्यू झाल्याचा संशय आहे. त्यांच्यावर सुरक्षा कर्मचार्‍यामधील उच्च मृत्यू असलेल्या अनेक हल्ल्यांचे सूत्रसंचालन केल्याचा आरोप आहे. IG Bastar P … Read more

अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांना नोबेल पुरस्कार प्रदान

भारतीय वंशाचे अर्थशास्त्रज्ञ अभिजित विनायक बॅनर्जी , त्यांची पत्नी एस्तेर दुफलो आणि सहकारी मायकेल क्रेमर यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार काल प्रदान करण्यात आला. “जागतिक दारिद्र्य निर्मूलनासाठी प्रायोगिक दृष्टीकोन” या विषयावरील सविस्तर संशोधनासाठी या तिघांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. यावेळी तिन्ही अर्थशास्त्रज्ञांना नोबेल पदके प्रदान करण्यात आली असून त्यांना बक्षीसाचे वाटप हि करण्यात आले.

..तर शिवसेना नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत राज्यसभेत वेगळी भूमिका घेईल- संजय राऊत

‘आमच्या पक्षाध्यक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास शिवसेना नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत राज्यसभेत वेगळी भूमिका घेईल’ असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज बुधवारी माध्यमांशी बोलताना केलं. ‘या विधेयकासंबंधी आमच्या मनात काही शंका आहेत, त्या दूर कारण्यासंदर्भांत समाधानकारक ऊत्तरे नाही मिळाल्यास आम्ही राज्यसभेत थेट लोकसभेत घेतलेल्या भूमिके विरुद्ध भूमिका घेऊ’ असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी माध्यमांसमोर दिले.

नागरिकत्व सुधारणा विधेयक: आसाममध्ये आंदोलकांवर पोलिसांचा गोळीबार

गुवाहाटी | नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन ईशान्य भारत धुमसत आहे. बुधवारी आसाममध्ये निदर्शने होत असताना पोलिस आणि आंदोलकांतमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. पोलिसांनी सांगितले की परिस्थितीवर मात करण्यासाठी डिब्रूगडमधील पोलिसांनी आंदोलकांवर रबर गोळ्या झाडल्या आणि लाठीचार्जही केला. त्याच वेळी, गुवाहाटीमधील विद्यार्थ्यांनी मुख्य जीएस मार्ग बंद केला, त्यानंतर सचिवालयाजवळ पोलिसांशी चकमकी झाल्याचे वृत्त आहे. Assam: Protest being held … Read more