हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सध्या सुरु असणाऱ्या कोरोना महामारीमुळे लोक घाबरलेले आहेत. कोरोना रुग्णांच्या मृतदेहांची खूप वाईट अवस्था होते आहे. काहीजणांचे नातेवाईकही मृतदेहाची जबाबदारी घेण्यास घाबरत असल्याचे दृश्य आहेत. यामुळेच एका महिलेला आपल्या पतीचा मृतदेह स्वतःच घेऊन जाऊन त्यावर अंत्यसंस्कार करावे लागले आहेत. रात्री झोपेत त्यांचे मृत्युमुखी पडले. अंत्यसंस्कार करण्यासाठी शेजारी,नातेवाईक यांनी पाठ फिरवली. शेवटी पत्नीने हातगाडीतून आपल्या पतीचा मृतदेह एकटीने नेला. ही दुर्दैवी घटना बेळगावातील अथणी गावात शुक्रवारी पाहायला घडली आहे.
कोरोनामुळे माणुसकी केव्हाच मागे पडली आहे. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी चार जण लागतात पण चार लोक देखील कोरोनाच्या दहशतीमुळे येत नाहीत. अथणी येथील सदाशिव हिरट्टी (५५) याचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला. सदाशिव मृत झाल्याची घटना शेजारी ,नातेवाईक यांना समजली. शेजारी,नातेवाईक आले पण कोरोनामुळे मृत्यू झाला असेल म्हणून सगळ्यांनी दुरून अंत्यदर्शन घेतले आणि निघून गेले.
मृतदेह तिथेच राहिला. शेवटी सदाशिवच्या पत्नीने निर्धार केला आणि पतीचा मृतदेह कापडात गुंडाळला. मृतदेह कापडात गुंडाळून हातगाडी आणली. हातगाडीत त्या दुःखी पत्नीने मृतदेह उचलून ठेवला. नंतर गावातील रस्त्यावरून हातगाडी घेऊन पत्नीने स्मशानात मृतदेह नेला. सगळे बघत राहिले पण एकही त्या पती गमावलेल्या महिलेच्या मदतीला आला नाही. शेवटी स्मशानात देखील पत्नीनेच पतीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. कोरोनामुळे सर्वत्रच दहशत पसरली आहे. अशा अनेक घटना या काळात घडल्या आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.