अनेक प्रार्थनांनंतर झाला होता सुशांतचा जन्म पण… 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी १४ जून रोजी सापडला होता. त्याने आत्महत्या केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंब तसेच चाहत्यांना धक्का बसला आहे. आता पहिल्यांदाच त्याच्या वडिलांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. त्यांनी अनेक प्रार्थना केल्यानंतर सुशांतचा जन्म झाला होता अशा भावना व्यक्त केल्या आहेत. वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी त्याने या जगाचा निरोप घेतल्याने त्याचे आप्तस्वकीय अद्याप या वेदनेतून सावरू शकले नाही आहेत.

सुशांतचा मृत्यूनंतर १२ दिवसांनी त्याचा वडिलांनी प्रतिक्रिया दिली. “सुशांत खूप खास मुलगा होता. ३४ वर्षांत त्याने खूप यश संपादन केलं”,  असं त्याचे वडील के. के. सिंह म्हणाले.“अनेक प्रार्थना केल्यानंतर सुशांतचा जन्म झाला होता. मन्नत से जो मांगा जाता है, वो ऐसा ही होता है (नवस करून जे मागितलं जातं ते असंच असतं.) तो विशेष आत्मा होता. काही वर्षांतच त्याने खूप काही कमावलं होतं. एवढं यश संपादन करण्यासाठी लोकांचं अख्खं आयुष्य निघून जातं”, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. अगदी मोजक्याच सिनेमांमध्ये काम केले असले तरी त्याच्या उत्कृष्ट अभिनयामुळे तो नेहमीच लक्षात राहिला आहे.

अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी सुशांत त्याच्या वडिलांना न सांगता मुंबईत आला होता. याविषयी ते पुढे म्हणाले, “मला न सांगताच तो मुंबईला निघून गेला. मोठी बहीण नीतूला त्याने सगळं काही सांगितलं होतं आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो मुंबईला होता. त्याला शिक्षण पूर्ण करण्यास सांगेन म्हणून तो मला सांगायला घाबरला होता. पण त्यानंतर लगेच त्याला मालिकेत काम करण्याची ऑफर मिळाली होती. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या सुशांतने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. धोनीच्या आयुष्यावरील एम.एस.धोनी या सिनेमात त्याच्या कामाचे सर्व स्तरातून कौतुक केले होते. करिअर सुरळीत चालू असताना सुशांतने इतकं टोकाचं पाऊल का उचललं असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.