देशातील लॉकडाऊन वाढण्या आधी बच्चू कडूंकडून अकोल्यात संचारबंदी जाहीर

अकोला । देशव्यापी संचारबंदीचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपत आहे. आता राज्यात संचारबंदी चालू राहणार की नियम शिथिल केले जाणार? असे काही प्रश्न असतानाच विदर्भातील अकोला जिल्ह्यात संचारबंदी वाढविण्यात आली आहे. अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्ह्यातील वाढते रुग्ण लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. सध्या विदर्भातील अकोला जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण सापडले आहे. राज्यसरकारने … Read more

अकोला-पातूर मार्गावर बोलेरो पिकपची दुचाकीला धडक; एक जागीच जण ठार

अकोला प्रतिनिधी । अकोला-पातुर रोडवरील लाखनवाडा येथे पातुरकडून अकोल्याकडे जाणारी बोलेरो पिकपला भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या दुचाकीला पिकअप धडकल्यानं या अपघातात एक जण ठार झाला आहे. पातुरकडून अकोलाकडे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकप क्रमांक MH30 BD 0439 भरधाव वेगात दुसर्‍या गाडीला ओहरटॅक करतांना समोरून येणाऱ्या प्रभू हिरासीया वय 50 राहणार अकोला यांच्या … Read more

न्याय! मूकबधिर विद्यार्थ्यांकडून पाय चेपून घेणाऱ्या शिक्षिकेला ५ वर्षांची कडक शिक्षा

शासकीय मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून पाय चेपून घेतानाचा शिक्षिका शितल अवचार हिचा विडिओ झाला होता.  त्यानुसार या घटनेबाबत पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली होती. या प्रकरणावर आता जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी शिक्षिकेला दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा आणि ३० हजार रुपयांच्या दंड ठोठावला आहे. पोस्को कायद्यान्वये महिलेला शिक्षा ठोठावण्याचा अलीकडच्या काळातील हा पहिलाच खटला आहे.

अकोला जिल्हयात ३ वाजेपर्यँत ४२.६ टक्के मतदान

जिल्ह्यातील अकोला पूर्व, अकोला पश्चिम, अकोट, बाळापूर व मुर्तीजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांमधील १७०३ मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजता पासून मतदानास सुरुवात झाली. ढगाळ वातावरण असतानाही मतदारांमध्ये उत्साह दिसून येत असून, सकाळी अकरा वाजेपर्यंत पाचही मतदारसंघांमध्ये सरासरी तीन वाजेपर्यंत जिल्ह्यातील पाच मतदारसंघात सरासरी ४२.६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. अकोट- ४५. ४१ टक्के, २९-बाळापूर टक्के, ४६.६३ टक्के, अकोला पश्चिम- ३७.८६ टक्के, अकोला पूर्व- ४०.७१ टक्के, मूर्तिजापूर- ४०.६९ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

भाजप उमेदवाराचा गृहराज्यमंत्र्याना घरचा आहेर

अकोला जिल्ह्याताल मुर्तिजापूरचे भाजप आमदार आणि उमेदवार हरिश पिंपळे यांचं एक भाषण सध्या चांगलंच गाजत आहे. तसंही आमदार पिंपळेंची भाषा वऱ्हाडी अन बोलणंही अघळपघळ. त्यामुळे पिंगळे यांचं भाषण म्हणजे नेहमी चर्चेचा विषय. मात्र, मुर्तिजापुरात आपल्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनावेळी पिंगळे यांनी केलेलं ताज भाषण जिल्हा भाजपातील गटबाजी कोणत्या थराला गेली आहे याचेच संकेत देणारे आहे.

धक्कादायक!! स्वतःच्या किडनीच्या सौद्यात फसगत झाल्याने युवकाने केली आत्महत्या  

अकोला प्रतिनिधी। आपल्या स्वतःच्या किडनीचा सौदा केल्यांनतर संबंधित डॉक्टर कडून फसवणूक झाल्याच्या दडपणात येऊन एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. किडनी प्रत्यारोपणापूर्वीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी डेव्हीड नामक डॉक्टरने या युवकाला २ लाख रुपयांनी फसवले होते. त्याच तणावात युवकाने आत्महत्या केल्याची माहिती सुरुवातीला कळाली आहे. अतुल अजाबराव मोहोड असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून … Read more

अकोल्यात आशा स्वयंसेविकांचे तोंडाला पट्टी बांधून आंदोलन

अकोला प्रतिनिधी | आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तोंडाला काळी पट्टी बांधून आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक आंदोलन करण्यात आले. राज्यातील इतर जिल्ह्यातही आशा स्वयंसेविकांनी आंदोलन छेडले आहे. आशा स्वयंसेविकांना लसीकरण, सर्व्हे, आरोग्यविषयक प्रबोधन यासह विविध ७३ प्रकारची काम करावी लागत असून, कामांच्या तुलनेत … Read more