कोयना नदीमध्ये उडी घेऊन पोटच्या दोन मुलांसह आईची आत्महत्या

पोटच्या दोन मुलांसह एका महिलेने कोयना नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पाटण तालुक्यातील सांगवड येथे ही घटना घडली आहे. राधिका माने वय २७ असे या विवाहित महिलेचे नाव आहे. तर श्रावण वय ३ वर्षे आणि शिवराज वय ९ महिने अशी तिच्या मुलांची नावे आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एसटी चालकाची स्मशानभूमीत गळफास घेऊन आत्महत्या  

माण तालुक्यातील दहिवडी शहरात दहिवडी एसटी आगारामध्ये चालक म्हणून कार्यरत असणारे काशीनाथ अनंतराव वसव यांनी आज पहाटे माण नदीपात्रा नजीक असणाऱ्या स्मशानभूमीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून या बस चालकाने आत्महत्या केल्याचा बस चालकाच्या कुटुंबीयांनी केला आहे.

साताऱ्यामध्ये बांधकाम व्यवसायिकाने केली स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

साताऱ्यामध्ये स्वतःवरच गोळी झाडून घेत एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संतोष जयसिंग शिंदे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मृत शिंदे हे बांधकाम व्यावसायिक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली असून या घटनेमुळे शिवाजीनगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

कोपरगावमध्ये काॅलेज तरूणीची गळफास घेऊन आत्महत्या

जिल्ह्यात असणाऱ्या कोपरगाव तालुक्यात एका तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. या घटनेनं कोपरगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. पूजा संजय अरगडे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव आहे. या तरुणीनं नेमकी का आत्महत्या केली. हे अजून स्पष्ट झालं नाही.

धुळे – विहिरीत उडी मारुन नवविवाहितेची आत्महत्या

तालुक्यातील मोरशेवडी गावातील विहिरीत नवविवाहितेचा विवाहितेचा मृतदेह आढळल्याने गावात एकच खळबळ उडाली. विवाहिता सोमवार पासून दिसत नसल्याने नातेवाईकांनी सर्वञ शोध घेतला . परंतु ती सापडली नाही . मंगळवारी सकाळी गावाजवळील एका विहिरी जवळुन दुर्गधी येत आल्याने काही लोकांनी विहिरीत डोकावुन पाहिले असता , विवाहितेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला.

अहमदनगर : विहिरीत उडी मारून चिमुरडीसह आईची आत्महत्या …

नगर तालुक्यातील धनगरवाडी येथे मायलेकीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आई ने मुलीला सोबत घेऊन आत्महत्या का केली ? यामागचे कारणं अद्याप समजू शकले नाही . नीता उर्फ कविता सचिन कापडे (वय- 27) रा. धनगरवाडी तालुका नगर, व मुलगी प्रणाली सचिन कापडे (वय- 4) यांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला .

धक्कादायक! प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या

सोलापूर प्रतिनिधी | नऊ वर्षांच्या प्रेमसंबंधांनंतर प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीने राहत्या घरी गळफास घेतल्याची धक्कादायक घटना सोलापूर येथे घडली आहे. लग्नास नकार देऊन शारीरिक व मानसिक त्रास दिल्याच्या कारणावरून तरूणीने आत्महत्या केल्याप्रकरणी मोहोळ येथील शिवसेनेच्या माजी तालुका प्रमुखाचा मुलगा व शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविकेवर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिवरत्न दीपक गायकवाड, … Read more

ओल्या दुष्काळाने घेतला शेतकऱ्याचा बळी

परतीच्या पावसाने राज्यभरात थैमान घातले. या पावसाने शेतीमालाचे मोठे नुकसान केले. नुकसान झालेल्या शेतमालाचा दाह आता शेतकऱ्यांचे आयुष्य उध्वस्त करताना दिसत आहे. बीडमधील एका शेतकऱ्याने आपल्या मुलीचे लग्न कसे करावे या नैराश्येतून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली. 

बुलडाणा जिल्ह्यात माजी सैनिकाची २ मुलांसह आत्महत्या

जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी या गावत एका माजी सैनिकानं आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मृतक चराटे असं या माजी सैनिकाच नाव आहे.

‘मी राहुलभाऊ समर्थक’ लिहिलेले टी-शर्ट घालून युवकाची आत्महत्या

‘मी राहुलभाऊ समर्थक’ नावाचे टी-शर्ट घालून एका तरुणाने आत्महत्या केल्याने बुलडाणा सह राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धाड येथे ही घटना घडली असून सतीश मोरे (२१) असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. बुलडाणा जिल्ह्यातील राजकीय पक्षाचे टी-शर्ट घालून आत्महत्या करण्याची या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.