राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेतेपदी जयंत पाटील, अजित पवारांचे सर्वाधिकार राष्ट्रवादीने काढले

पक्षांतर्गत बंडाळी करून पक्षाला फुकटचा शहाणपणा करणाऱ्या अजित पवार यांना राष्ट्रवादीने घरचा रस्ता दाखवला आहे. राष्ट्रवादी पक्षात अजित पवार यांना असलेले सर्व अधिकार काढुन घेण्यासोबत त्यांची विधिमंडळ नेतेपदावरून हकालपट्टी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ कमिटीने केली आहे. शनिवारी सायंकाळी याबाबतचा अधिकृत निर्णय घेण्यात आला.

विधिमंडळ पक्षनेते पदावरून अजित पवार यांची राष्ट्रवादीने केली हकालपट्टी!

अजित पवार यांच्या बंडानंतर आता राष्ट्रवादीकडून अजित पवार यांची विधिमंडळ पक्षनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. वाय.बी चव्हाण सेंटर येथे शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते आणि आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती मिळत आहे. पदावरून अजित पवार यांची हकालपट्टी झाल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या फुटलेल्या आमदारांना परत आणण्यासाठी सेनेने लावला जोर! ‘सर्च ऑपरेशन’ सुरु

राष्ट्रवादी काँग्रेसकडून फुटलेल्या आमदारांना परत आणण्यासाठी आता खुद्द शिवसेनेनं पुढाकार घेतलेला आहे. त्याचंच भाग म्हणून राष्ट्रवादीचे उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांना नाट्यमयरित्या वाय.बी चव्हाण सेंटर येथे आणण्यात शिवसेनेला यश मिळालं आहे. बनसोडे यांना आणतांना शिवसेनेचे एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर यांनी भूमिका बजावली. आपल्या गाडीत बनसोडे बसवून आणत त्यांना आमदारांच्या बैठक सुरु असलेल्या ठिकाणी आणले गेलं. मिळालेल्या माहितीनुसार बनसोडे हे मुंबई विमानतळा जवळील सहार हॉटेलमध्ये नजरकैदेत होते.

वारं फिरलं! राष्ट्रवादीचे ७ आमदार पुन्हा घरी परतले

मुंबई प्रतिनिधी । आज सकाळी राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी किमान १५ आमदारांना सोबत घेत धक्कादायकरित्या भाजपाला पाठिंबा दिला. या पाठिंब्यामुळं दवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर अजित यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या बंडामुळं राष्ट्रवादीला खिंडार पडले कि काय असा सवाल उपस्थित झाला असता आता वारं पुन्हा एकदा फिरलं आहे. … Read more

अजित पवार देखील परत येतील – संजय राऊत

शनिवारी सकाळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली . तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली . या राजकीय पालटवारने महाराष्ट्रात एकच खळबळ माजवली . गेले २८ दिवस शिवसेना ,राष्ट्रवादी ,काँग्रेस यांनी अनेक बैठका घेतल्या. एकीकडे अवकाळी पाऊस आणि शेतकरी प्रचंड संकटात असताना सत्ता स्थापनेचा तिढा सुटता सुटेना . शुक्रवारी हा तिढा अखेर सुटेल आणि शनिवारी शिवसेनेची तोफ धडाडेल असं महाराष्ट्राला पटवून देण्यात आले होते . आणि शनिवारी जे घडले ते पाहून महाराष्ट्र हादरला . राजकारणात काहीही होऊ शकत हे महाराष्ट्राने याची देही याची डोळा पाहिल …

अजित पवारांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला – गिरिश बापट

शनिवारी सकाळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली . तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली . या राजकीय पालटवारने महाराष्ट्रात एकच खळबळ माजवली . भाजपने सत्ता स्थापन केल्या नंतर पुण्यातखासदार गिरीश बापट आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भारावून जल्लोष साजरा केला .

शरद पवारांनी पत्रकार परिषदेत अजित पवारांवर केला ‘हा’ आरोप

मुंबई प्रतिनिधी | अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाशी राष्ट्रवादी पक्षाचा काहीही संबंध नसून राष्ट्रवादीचा खरा कार्यकर्ता भाजपसोबत हातमिळवणी करणार नाही असं विधान शरद पवार यांनी शिवसेनेसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांचं एकूण संख्याबळ १७० च्या आसपास असून पक्षांतरबंदी कायदा लागू केल्यानंतर फडणवीस सरकार कोसळणार असल्याचा विश्वास आपल्याला असल्याचंही शरद पवार … Read more

धनंजय मुंडे सकाळपासून नॉट रिचेबल, अजित पवारांना बळ धनंजय मुंडेंचंच?

मुंबई प्रतिनिधी | राज्याच्या राजकारणाची दशा आणि दिशा मागील महिनाभरात महाराष्ट्रातील जनतेने अनुभवली. निवडणूक प्रचारावेळी तुम्ही कुणाच्याही नादाला लागा पण शरद पवारांच्या नादाला लागू नका असं सांगणाऱ्या धनंजय मुंडे यांनीसुद्धा शनिवारी सकाळी अजित पवारांसोबत शपथविधी कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवारांची विधिमंडळ नेतेपदावरून हकालपट्टी केल्यामुळे आता अजित पवार आणि धनंजय … Read more

आम्हाला ‘हे’ आधीच माहिती होतं, शिवेंद्रराजेंची अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर प्रतिक्रीया

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

महाराष्ट्राच्या सत्ताकारणात आज शनिवारी मोठा राजकीय भूकंप झालाय. एकीकडे महाविकास आघाडीची टप्प्यात येऊन आज मुख्यमंत्री जाहीर होणार असल्याच्या बातम्या सर्वत्र पाहायला मिळत असतानाच, राज्यपालांनी सकाळी ८ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना मुख्यमंत्री पदाची तर अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदाची शपत दिलीये. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडालीय.

परंतु या घटनेची पूर्व कल्पना भाजपच्या अनेक नेतेमंडळींना होती. असे संकेत मिळत आहेत. राज्यात झालेल्या सत्ताकरणासंदर्भात प्रतिक्रिया देताना
सातारा जावळी मतदार संघाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितलं कि, मुख्यमंत्री आणि चंद्रकांत दादा पाटलांनी आम्हाला विश्वास दिला होता की, काहीही झालं तरी सरकार भाजपचेच येणार आहे. आणि आता झाले असून देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत.

सत्ता स्थापनेवर शिवेंद्रराजे भोसलेंची प्रतिक्रिया, भाजपचेच सरकार येणार हे माहित होतं

इतर महत्वाच्या बातम्या –

लाज वाटावी असं राजकारण!

अहमदनगर प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी आज भाजप सोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांतून या निर्णयांवर उलटसुलट चर्चा सुरु आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी लाज वाटावी असे राजकारण … Read more