आदित्य ठाकरेंच्या राजतिलकाची शिवसेनेने केली तयारी

गुरुवारी राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. या निकालात मतदार राजाने कुठल्याच एका पक्षाला बहुमत दिले नसल्याचे पाहायला मिळतय. एक हाती सत्ता स्थापनक करणाऱ्या भाजपला जनतेने चांगलाच धडा शिकवलाय. भाजप सेनेचे युती असल्याने ते एकत्र येत सत्ता स्थापन करणार असल्याची शक्यता आहे. परंतु आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो मुख्यमंत्री कोण होणार. या बद्दल काही निर्णय होण्याचं आधीच वारली मतदार संघातील कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे हेच भावी मुख्यमंत्री असणार अशा आशयाचे बॅनर लावले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

बावनकुळेंचा पत्ता कट करणे भाजपाला पडले महागात

विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल काल लागला. अपेक्षेप्रमाणे महायूतीला जोरदार यश मिळाले. पण स्वतः मुख्यमंत्री नेतृत्व करत असलेल्या नागपूर मध्ये ‘भाजपा’ला मोठा फटका बसला. दरम्यान ‘भाजपा’चे वरिष्ठ नेते आणि उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट कापल्यामुळे विदर्भात भाजपला मोठा फटका बसला आहे, अशी चर्चा सध्या विदर्भात सुरु आहे. बावनकुळे हे नितीन गडकरी गटातले असल्यामुळे त्यांचा पत्ता कट झाला असल्याचेही मतही काही राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे. विदर्भ हा भाजपचा गड म्हणून ओळखला जातो. विदर्भात भाजपचा मोठ्या प्रमाणात मतदार आहे. गेल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीतही भाजपने सर्वाधिक 40 जागांवर विजय मिळवला होता. मात्र तेली समाजाची मतं फिरल्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला फक्त 30 जागांवर विजय मिळवता आला आहे. विशेष म्हणजे भाजपचा गड आणि आरएसएस मुख्यालय असेलल्या नागपुरात भाजपच्या सहा जागांवर पराभव झाला आहे.

तर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेतेपदी

महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट होऊन २४ तासही झालेले नसताना राज्यात सरकार कोण स्थापणार याविषयी वेगवेगळे तर्क लावले जाऊ लागले आहेत. शिवसेनेसोबत बोलणी फसली तर देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षाचा नेता म्हणून काम करावं लागण्याची नवी शक्यता समोर आली आहे. या परिस्थितीत शिवसेना राष्ट्रवादीच्या थेट तर काँग्रेसच्या बाहेरून पाठिंब्यावर सरकार स्थापनेवर दावा करू शकते. भाजप-शिवसेना महायुतीचं एकूण बळ १५९ आमदारांचं आहे तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आणि काही अपक्ष मिळून हे संख्याबळ १७० पर्यंत पोहचत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचं ‘मी पुन्हा येणार’ हे वक्तव्य ‘विरोधी’ पक्षनेतेपदासाठी होतं का? याची चर्चा रंग धरू लागली आहे.

‘हरलो आहे, पण थांबलो नाही!’ पराभवानंतर उदयनराजेंचं ट्वीट

राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा भाजपच्या तिकिटावर लोकसभेच्या पोट निवडणुकीत उतरलेल्या उदयनराजेंना पराभवाचा सामना करावा लागला आहे. माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंच्या धक्कादायक पराभव केलाय. विधानसभे बरोबरच झालेल्या या लोकसभेच्या पोटनिवडणुकीवर सर्व राज्याचे लक्ष् लागले होते. साताऱ्यातील जनतेने उदयनराजेंना नाकारत श्रीनिवास पाटलांच्या पारड्यात वजन टाकल्यानंतर, उदयन राजेंनी ट्विटरद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्यात.

मनसेचे सर्व उमेदवार आज कृष्णकुंजवर; पराभवाचे करणार मंथन

विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल काल लागला. अपेक्षेप्रमाणे महायूतीला जोरदार यश मिळाले. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही. अशातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातर्फे लढवलेल्या सर्व उमेदवारांची एक बैठक आपल्या निवासस्थानी बोलावली आहे. आज राज ठाकरे सर्व उमेदवारांची कृष्णकुंजवर भेट घेणार आहेत. राज्याच्या निवडणुकांमध्ये मनसे सहभागी होणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती.

कर्जत-जामखेडमध्ये घडले ‘महाराष्ट्र धर्मा’चे दर्शन; राम शिंदेंनी बांधला रोहित पवारांना फेटा !

विशेष प्रतिनिधी । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले आहेत. राज्यात पुन्हा एकदा युतीचं सरकार येणार हे स्पष्ट झालं आहे. भाजपने सर्वाधिक जागा मिळवत आपले स्था कायम राखले. दरम्यान यामध्ये संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या लढतींपैकी एक लढत होती ती कर्जत जामखेडमधील राष्ट्रवादीचे रोहित पवार विरुद्ध भाजपचे राम शिंदे यांच्यातील. पहिल्यांदाच विधानसभेच्या आखाड्यात उतरलेल्या रोहित … Read more

पवारांमुळे ‘काँग्रेस’ला मिळाली ‘संजीवनी’

काल विधानसभेच्या मतमोजणीच्या निकाल लागला. अपेक्षेप्रमाणे महायुतीचे सरकार सत्ता स्थापन करणार हे ठरलेले आहे. मात्र आघाडीने यावेळेस युती ला जोरदार टक्कर दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या अस्तित्वाची लढाई असल्याने या दोन्ही पक्षांनी पाडापाडीची आपली पारंपरिक भूमिका घेतली नाही, दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकत्यांनी हातात हात घालून विधानसभेची ही निवडणूक लढविली त्यामुळे शंभरपेक्षा जास्त जागा जिंकल्या. मात्र यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचंड मेहनत घेतल्यामुळे आणि आपला राजकारणातील प्रदीर्घ अनुभव वापरल्यामुळे केवळ राष्ट्रवादी काँग्रेसने ५६ जागा जिंकल्या तर काँग्रेसला ४५ जागांसह आता छोट्या भावाच्या भूमिकेत राहावे लागेल.

चंद्रकांतदादांकडून कोथरूडच्या जागेपायी कोल्हापूरचा पालापाचोळा

कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीने ‘सेना-भाजपा’ला चितपट करत जोरदार मुसंडी मारली आहे. ‘भाजपा’चे प्रदेशाध्यक्ष आणि कोल्हापूरचे पालकमंत्री असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरचा गड सांभाळण्यात सपशेल अपयश आलं आहे. विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज पार पडली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदार संघात भाजपा- सेनेला धक्का देत काँग्रेस- राष्ट्रवादीने धक्कादायक विजय मिळवला आहे. काँग्रेस – राष्ट्रवादीच्या या विजयामुळे कोल्हापूर हा महाआघाडीचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक दिग्गज मातब्बरांना पराभव पत्करावा लागला आहे.   

सांगली जिल्ह्यात महाआघाडीची मुसंडी !!

विधानसभा निवडणुकीचे आज निकाल लागले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीने निकालात मुसंडी मारलेली आहे. सांगली जिल्ह्याचा विचार करता महाआघाडीने ८ जांगांपैकी ५ जागांवर विजय मिळवलेला आहे. तर भाजप-शिवसेना युतीला ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

विदर्भात भाजपची पीछेहाट!!

विदर्भात विधानसभेच्या एकूण ६२ जागा आहेत. २०१४ च्या निवडणुकीत भाजपला ४४ जागा मिळाल्या होत्या. यावेळी भाजपला २५ च्या आसपास जागांवर समाधान मानावे लागणार आहे. शिवसेनेला ४ जागा मिळाल्या आहेत.भाजप-शिवसेना युतीचे सरकार सलग दुसऱ्यांदा सत्तेत येत असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिथून निवडून येतात त्या विदर्भात भाजपला हा मोठा धक्का आहे.