गलवान खोऱ्यातील वीर जवानांच्या शौर्यगाथेवर येणार सिनेमा; अजय देवगण करणार निर्मिती

नवी दिल्ली । १५ जूनच्या रात्री पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. या संघर्षांत भारतीय जवानांनी चीनच्या ४० जवानांना ठार केलं होतं. तर २० भारतीय जवान धारातीर्थी पडले होते. तर काही जवान जखमीही झाले होते. गलवान खोऱ्यातील भारतीय जवानांच्या साहस आणि बलिदानाची शौर्यगाथा आता मोठ्या पडद्यावर येणार आहे. अभिनेता … Read more

वडील वीरू देवगण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अजयने शेअर केली भावनिक पोस्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजय देवगणच्या वडिलांनी २७ मे २०१९ रोजी जगाचा निरोप घेतला. अजयने त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त एक व्हिडिओ शेअर केला आहे. वीरू देवगन बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये अ‍ॅक्शन डायरेक्टर आणि स्टंट कोरियोग्राफर होते. वडिलांसोबतच्या काही आठवणी सांगत अजय देवगणने लिहिले,’ डियर डॅड तुमच्या जाण्याला १ वर्ष पूर्ण झाले आहे. मी तुम्हांला नेहमीच आमच्याबरोबर बघू शकतो. … Read more

सिंघम गाण्यावर पोलिस अधिकार्‍याचा Ak47 हातात घेऊन TikTok व्हिडिओ !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशभरात लॉकडाउन सुरु आहे.अशा काळात, यूपी पोलिस हे Corona Warrior म्हणून नावारूपाला आले आहे.वाराणसी जिल्ह्यात संसर्ग असूनही पोलिस त्यांच्या ड्यूटीचे काम चोख बजावत आहेत.मात्र संक्रमणाच्या या काळात त्याच बनारसच्या पोलिस ठाण्यात तैनात असलेल्या एका पोलिसाचा हातात एके-४७ घेतलेला एक टिकटॉकचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा … Read more

बाहुबली दिग्दर्शक राजामौली यांच्या ‘आरआरआर’ ने केली शूटिंग पूर्वीच 300 कोटींची कमाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बाहुबलीचे दिग्दर्शक एस.एस.राजामौली जेव्हा जेव्हा चित्रपट घेऊन येतात तेव्हा तेव्हा मोठा धमाका करतात. एस.एस. राजामौलीने बाहुबली 1-2 च्या माध्यमातून चित्रपट जगतात खळबळ उडवून कमाईचे नवे रेकॉर्ड तयार केले होते.आता एस.एस. राजामौलीचा पुढचा चित्रपट आरआरआर रिलीजपूर्वीच नवीन रेकॉर्ड बनवित आहे. आरआरआरमध्ये अजय देवगण, जुनिअर एनटीआर आणि राम चरण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. … Read more

‘तान्हाजी’ काढल्याच्या निषेधार्थ कराडमध्ये शिवप्रेमींकडून थिएटर बंद

सध्या अजय देवगणची भूमिका असलेला तान्हाजी चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. जगभरात दीडशे कोटीहून अधिक रकमेचा गल्ला जमवलेला तान्हाजी चित्रपट ऐतिहासिक चित्रपटांचे जुने विक्रम मोडीत काढत निघाला आहे. तानाजी मालुसरे या शिवाजी महाराजांच्या लढवय्या मावळ्याच्या जीवनावर आधारित या चित्रपटाला महाराष्ट्रासह इतर राज्यांनीही डोक्यावर घेतल्याचं पहायला मिळत आहे.

महाराष्ट्रात ‘तान्हाजी’ करमुक्त करा! फडणवीसांनी केली मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

अभिनेता अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेल्या, शूरवीर तानाजी मालुसरेंच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करा, अशी मागणी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात, “तानाजी मालुसरे हे एक वीर योद्धा होते. त्यांचे शौर्य नव्या पिढीसमोर यावे आणि त्यांच्या वीरतेच्या गाथा नव्या पिढीला कळाव्यात त्यासाठी हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पहावा यासाठी तो करमुक्त करण्यात यावा.”

उत्तर प्रदेशमध्ये ‘तान्हाजी’ टॅक्स फ्री; अजय देवगणने मानले योगी सरकारचे आभार

तान्हाजी यांचं शौर्य आणि त्यागापासून लोकांना प्रेरणा मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेता अजय देवगणने चित्रपट टॅक्स फ्री करण्याची विनंती केली होती. दरम्यान उत्तर प्रदेश सरकारकडून निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर अजय देवगणने ट्विटरच्या माध्यमातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानून त्यांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केला आहे.

मराठ्यांच्या आक्रमकतेचा ऐतिहासिक चरित्रपट – तान्हाजी

महाराष्ट्रात राहून मराठी माध्यमात शिकलेल्या प्रत्येक व्यक्तीला वरील तीन वाक्यांवरूनच प्रसंग कोणता आहे याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. शूर मराठा सरदार म्हणून प्रसिद्ध असलेल्या तानाजी मालुसरेंची गोष्ट म्हणजे ओम राऊत दिग्दर्शित ‘तान्हाजी’ चित्रपट. स्वतःच्या मुलाचं लग्न असतानाही युद्धावर जाण्याची तयारी दाखवणारा, स्वतः धारातीर्थी पडलेला असतानाही कमी सैन्याच्या जोरावर कोंढाणा किल्ला वाचवणारा सरदार म्हणून तानाजी मालुसरे परिचीत आहेत. याच तानाजी मालुसरेंचा इतिहास भव्यदिव्य स्वरूपात आज लोकांसमोर आणण्यात आला.

तान्हाजी चित्रपटा विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल

अजय देवगण आणि काजोल या स्टार जोडीचा तान्हाजी हा चित्रपट येत्या जानेवारीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तान्हाजी मालुसरे यांनी इतिहासात गाजवलेल्या शौर्याचं चित्रण या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या दृष्टिने महत्वाची बाब म्हणजे याचित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत हा मराठी माणूस आहे. ओम राऊत याने याआधी मराठीत लोकमान्यसारखा दर्जेदार चित्रपट बनविला होता. या कामिगिरीनंतर आता हिंदी चित्रपट विश्वात तान्हाजीच्या माध्यमातून ओम राऊत पदार्पण करत आहे. मात्र, आता याचित्रपटाच्या प्रदर्शनावर चिंतेचं सावट आलं आहे.

बहुचर्चित ‘तान्हाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित

मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या आणि अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेल्या तान्हाजी – द अनसंग वॉरिअर या चित्रपटामधील पहिले गाणे आज प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात सुरुवातीलाच  ‘दुश्मन को हराने से पहले दुश्मन को देखना चाहता हूं’ हा डायलॉग टीझरमध्ये दाखवण्यात आला आहे. ‘शंकरा रे शंकरा’ असे या गाण्याचे बोल असून अभिनेता अजय देवगनने इंस्टाग्रामवर हे गाणं प्रदर्शित केले आहे. तसेच युट्युब वर देखील हे गाणे पहावयास मिळत आहे.