गोविंदाने फिरवली भाईजानकडे पाठ; सलमान खान आणि कमाल आर खानच्या वादात KRKला दिला पाठिंबा

KRK_Govinda_Salman

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान याचा नुकताच ‘राधे: युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट ओटिटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. यानंतर या चित्रपटाबाबत अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. इतकेच नव्हे तर अनेकांनी त्याची खिल्ली उडविली. यात सगळ्यात उपर होता तो कमाल आर खान अर्थात KRK. त्याने चित्रपटाबाबत अशी काही वादग्रस्त विधाने केली कि सलमानने … Read more

किंग खान’च्या ‘पठाण’ मध्ये भाईजान करणार ग्रँड एन्ट्री; सोशल मीडियावर चर्चांना आले उधाण

Shahrukh_Salman

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता किंग खान अर्थात शाहरूख खानच्या ‘पठाण’ या आगामी चित्रपटाची अद्यापतरी अधिकृतरित्या घोषणा झालेली नाही. मात्र, त्याचे चाहते या चित्रपटाची आ वासून प्रतीक्षा करीत आहेत. त्याचे कारण असे कि तब्बल तीन वर्षांनंतर शाहरूखने कोणतातरी एक चित्रपट करण्यासाठी स्वीकृती दिली आहे. त्यामुळे ‘पठाण’ बॉलीवूडमधील बहुप्रतीक्षित चित्रपटांच्या यादीत अगदी पहिल्या क्रमांकावर आहे. या … Read more

मुंबई पोलिसांची आयडियाची कल्पना..! कोरोनाविषयक जनजागृतीसाठी तयार केले बॉलिवूड कलाकारांचे मीम्स

Mumbai Police

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दररोज दिवसाला हजारो रुग्णांचे मृत्यू होत आहेत. अश्या ह्या भयावह परिस्थितीत लोकांमध्ये धास्तीचे वातावरण तयार झाले आहे. याकरिता मुंबई पोलिसांनी मात्र कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी लोकांचे सक्षमीकरण करण्याचा वसा घेतलेला दिसतोय. जगातील कमीतकमी ७५% लोक आपल्या आवडत्या कलाकाराला फॉलो करतात. याच … Read more

तौक्ते चक्रीवादळामूळे उडून गेला ‘टायगर ३’चा सेट; SKF प्रोडक्शनचे कोट्यवधींचे नुकसान

Tiger 3

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतेच तौक्ते चक्रीवादळामुळे संपूर्ण राज्यात मोठे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रासह, केरळ, तामिळनाडू, गोवा आणि गुजरात या राज्यांनाही चांगलाच तडाखा बसला आहे. दरम्यान संपूर्ण वाहतुक व्यवस्था, वीजपुरवठा, अनेक लोकांची घरे, मोठमोठ्या बागायती यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. इतकेच नव्हे तर या चक्रीवादळात सलमान खानच्या आगामी चित्रपटाचा कोट्यवधींचा सेट देखील उडून … Read more

सलमानच्या ‘राधे’वर मनोजचा ‘फॅमिली मॅन’ भारी; चाहते म्हणतायत ‘राधे’वरची व्हॅक्सिन आली…!

Radhe V/s The Family Man

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता मनोज बाजपेयी यांची ऍमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘द फॅमिली मॅन’ हि वेब सिरीज तुफान गाजली होती. त्यानंतर लगेचच या वेब सिरींजचा दुसरा भाग येण्याची लोक वाट पाहत होते. आता वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर आज या वेब्सिरीजचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर पाहून चाहते अगदीच भारावून गेले आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांनी … Read more

कधीकाळी रिक्षा मागे मुव्हीपोस्टर लावायचा हा बॉलिवूड अभिनेता; व्हिडीओ झाला वायरल

Amir Khan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खानला कोण ओळखत नाही? आमिर खानला परफेक्शनिस्ट व्यतिरिक्त मार्केटिंगमधील जीनियससुद्धा म्हटले जाते. तो आपल्या चित्रपटांच्या मार्केटींग कॅम्पेनमध्ये स्वतःहून सहभाग घेताना दिसतो. त्याच्या जबरदस्त आयडिया आणि कॅम्पेनमूळे त्याचे चित्रपट खूप यश मिळविण्यात नेहमीच यशस्वी होताना दिसतात.आमिर चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच नवनवीन कल्पना घेऊन येत असतो. त्याच्या … Read more

यंत्रणांना जबाबदारी घ्यावीच लागेल..; नदीत तरंगणारे मृतदेह पाहून फरहान व परिणीतीने व्यक्त केला संताप

Farhan_Parineeti

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतीच गंगा नदीत तरंगणाऱ्या मृतदेहांसंबंधित एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. गंगा आणि अन्य नद्यांत तरंगणारे हे मृतदेह पाहून कुठल्याही संवेदनशील मनाला बोचरे घाव जाणवणार हे निश्चित आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी या संदर्भात सरकारला चांगलाच खडसून जाब विचारला. तर आता अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांनीही नद्यांमधील या तरंगत्या … Read more

कोरोना लसीची सुई पाहून गोविंदाच्या भाचीला आलं रडू; व्हॅक्सिनेशनचा फोटो टाकून स्वतःच झाली ट्रोल

Arti Singh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यातही कडक निर्बंधांसहित लॉकडाऊन लावण्यात आला आहे. सोबतच राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम देखील सुरु आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी हि लस घेणे आवश्यक आहे. दरम्यान चित्रपट आणि टीव्ही सेलिब्रिटीं हे व्हॅक्सिन घेण्यासाठी लोकांना आवाहन करताना दिसत आहेत. तसेच व्हॅक्सिन घेतानाचे स्वत:चे फोटो आणि व्हिडीओ देखील ते … Read more

कोरोनाच्या भीतीपोटी हृतिकच्या कुटुंबाची खंडाळ्याकडे धाव

Hritik Roshan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनामुळे संपूर्ण देशात भीतीदायक वातावरण पसरलेले आहे. दिवसागणिक या व्हायरसचा संसर्ग वाढतानाच दिसत आहे. जोर काहीसा कमी झालेला असला तरी मृतांची संख्या पाहून कुणालाही धडकी भरेल. त्यात आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. सर्वत्र असे भयावह वातावरण पसरले असता अनेक लोक इतरत्र पलायन करताना दिसत आहेत. सध्या हृतिक रोशनचे कुटुंबही … Read more