देशात करोनाग्रस्तांच्या संख्येत ४० टक्के घट – केंद्रीय आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली । देश एका बिकट परिस्थितीतून जात आहे. देशावर कोरोनाच संकट असून अशा चिंताजनक वातावरणात एक दिलासादायक माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत ही दिली. देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत ४० टक्के घट झाली असल्याचे लव अग्रवाल यांनी सांगितलं. गेल्या २४ तासात कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ७ ने … Read more

खबरदार लॉकडाऊनच्या काळात बायकोशी भांडाल तर… तुम्हाला होऊ शकते ही शिक्षा

पुणे । कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे बहुतेक पुरुष मंडळी आपल्या घरात बसून आहे. परिणामी लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागात कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळं महिलांवरील हिंसाचाराला आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेने एक वेगळा मार्ग शोधून काढला आहे. लॉकडाऊनच्या काळात नवरा-बायकोमध्ये भांडण झाल्यास सुरुवातीला समुदेशन … Read more

भारतीय लष्करातील ८ जणांना करोनाची लागण- लष्कर प्रमुख मनोज नरवणे

वृत्तसंस्था । संपूर्ण देशात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहेत. अशात भारतीय लष्करात सुद्धा कोरोनाने शिरकाव केला आहे. लष्करातील काही जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी दिली आहे. लष्कर प्रमुख नरवणे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. सीमारेषेवरील परिस्थितीचा ते आढावा घेत आहे. यावेळी एएनआयशी बोलताना त्यांनी … Read more

मुंबईत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आज प्रथमच घट; काल रात्रीपासून आढळले फक्त ६ रुग्ण

मुंबई । कोरोनाशी प्रखर लढा देणाऱ्या राज्य सरकारला दिलासा देणारी बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाची चिंता वाढवणाऱ्या मुंबईतील संसर्ग हळूहळू कमी होत असल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन किंवा तीन अंकी आकड्यांमध्ये रुग्ण वाढ नोंदवणाऱ्या मुंबईतील बाधितांच्या संख्येत आज प्रथमच घट झाली आहे. काल रात्रीपासून आतापर्यंत मुंबईत फक्त ६ नवे रुग्ण आढळले आहेत. … Read more

लॉकडाऊनमध्ये पतीने माहेरी सोडण्यास नकार दिल्याने महिलेची आत्महत्या

सांगली । राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं लॉकडाऊन लागू आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांवर गरजेच्या कामाशिवाय घराबाहेर पडण्याला मनाई आहे. तेही केवळ लोकांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून. मात्र अशा परिस्थितीतही काही लोक घराबाहेर पडण्याचा अनाठायी हट्ट करत आहे. सांगलीत अशीच एक घटना समोर आली असून नवरा माहेरी सोडण्यास नकार दिल्याने महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला … Read more

राष्ट्रपती जिनपिंग यांनी ७ दिवस शांत बसून चीनमध्ये पसरवू दिला कोरोना व्हायरस?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत चीनवर आरोप करीत आहेत की त्यांनी कोरोनाव्हायरसशी संबंधित सर्व माहिती जगाशी शेअर केली नाही.आता हे उघडकीस आले आहे की कोरोना विषाणूची माहिती मिळाल्यानंतरही चिनी सरकारनेही त्यास ७ दिवस फैलावण्यास जागा दिली. मिळालेल्या माहितीनुसार, चीन सरकारला १४ जानेवारी रोजी माहिती मिळाली होती की कोरोनाने देशात साथीच्या रोगाचे … Read more

अजित पवारांचं सर्व पालकमंत्र्यांना खरमरीत पत्र; म्हणाले…

मुंबई । उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व पालकमंत्र्यांना पत्र लिहून रेशन दुकानांमधून पुरेसं अन्नधान्य उपलब्ध केलं जात असतानाही तक्रारी वाढत असल्याकडे लक्ष वेधलं आहे. राज्यात सर्वत्र धान्यवाटप सुरु असून काही जिल्ह्यांमधून येणाऱ्या तक्रारींमुळे शिधावाटप यंत्रणेची, शासनाची नाहक बदनामी होत आहे. ही बदनामी टाळली पाहिजे. त्यासाठी आपापल्या जिल्ह्यातील शिधावाटप यंत्रणेत गैरप्रकार होणार नाहीत याची काळजी घ्यावी. … Read more

देशातील १७० ‘हॉटस्पॉट’पैकी मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील ११ जिल्हे

मुंबई । देशात सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्णांची महाराष्ट्रात आहे. तर राज्यातील एकूण रुग्णांपैकी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण मुंबईत आहेत. करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही मुंबईत सर्वाधिक आहे. तर त्या पाठोपाठ पुण्याचा क्रमांक आहे. मात्र, मुंबई पुण्याबरोबरच केंद्र सरकारनं राज्यातील ११ जिल्ह्यांचा समावेश हॉटस्पॉटच्या यादीत केला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, सांगली, अहमदनगर, यवतमाळ, औरंगाबाद, बुलडाणा, मुंबई उपनगर … Read more

गुड न्युज! लॉकडाऊनमध्येही Amazon, Flipkart ची सेवा सुरू होणार; ‘या’ वस्तू ऑर्डर करता येतील

नवी दिल्ली । करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन लागू झाल्यानंतर Amazon, Flipkart सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांना आपली सेवा बंद केली होती. मात्र, ग्राहकांसाठी एक गुड न्युज मिळत आहे. येत्या २० एप्रिल पासून ई कॉमर्स कंपन्यांना सेवा देण्याची परवानगी देण्यात आली आहे. गृह मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून याबाबत माहिती देण्यात आली. त्यामुळं आता Amazon, Flipkart ई-कॉमर्स कंपन्यांना … Read more

देशात करोनाची चिंताजनक घौडदौड; रुग्ण संख्या १३ हजारांजवळ तर ४२० रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा फैलाव अधिक प्रमाणावर होताना दिसत आहे. महाराष्ट्रासहित इतर राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वेगानं वाढत आहे. सध्या देशातील कोरोनाबाधितांची संख्या १३ हजाराच्या उंबरठ्यावर आहे. देशात करोनाच्या रुग्णांची संख्या १२ हजार ७५९ एवढी झाली आहे. अशा वेळी एक दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत १ हजार ५१४ रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. … Read more