कोल्हापूरात मुलांचे लैंगिक व्हिडीओ सोशल मीडियावर टाकणाऱ्या दोघांना अटक

कोल्हापूर प्रतीनिधी । सतेज औंधकर लहान मुलांचे लैंगिक छायाचित्रण असणारे व्हिडीओ आणि पोर्नोग्राफिक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या दोघांना कोल्हापूरच्या सायबर क्राईम विभागाची पोलिसांनी अटक केली. अमोल कुस्तास डिसोझा आणि विशाल दत्तात्रय अत्याळकर अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून मोबाईल आणि सिमकार्ड जप्त करण्यात आली आहेत. अश्लील पोर्नोग्राफी, चाईल्ड पोर्नोग्राफी असलेले व्हिडीओ तयार करून त्यांचे प्रसारण … Read more

धक्कादायक! महाराष्ट्र ‘सीआयडी’ची वेबसाइट हॅक; हॅकर्सनं दिला ‘हा’ इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वी उत्तराखंड पर्यटन विभागाची वेबसाइट हॅक केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. मुस्लिमांवर हल्ले केले तर आम्ही गप्प बसणार नाही, असा संदेश ही वेबसाइट उघडल्यावर दिसत होता. भारतातील आणखी वेबसाइट हॅक करू, असाही इशारा दिला होता.त्यानंतर आज महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची वेबसाइट हॅक केल्याचं उघड झालं आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीनं … Read more

बिट काॅईनच्या माध्यमातून दुप्पट रक्कम करण्याचे आमीष दाखवून लाखोंची फसवणूक, डाॅक्टर विरोधात गुन्हा दाखल

बिट काॅईन आभासी चलनातून पंढरपुरातील काही प्रतिष्ठीत लोकांची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पंढरपुरातील एका डाॅक्टर विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑनलाईन वस्तू मागवणे डॉक्टरला पडले महागात; लिंक फॉलो करताच खात्यातून दिड लाख लंपास

काही मिनिटांतच त्यांच्या बॅंक खात्यामधून एक लाख ४९ हजार ९९७ रुपये एवढी रक्कम दुसऱ्याच्या खात्यावर वळती झाली. आपली फसवणूक झाले असल्याचे समजताच याप्रकरणी महिला डॉक्‍टरने सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधला, पोलिसांनी संबंधित मोबाईल धारकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सला सायबर चोरट्यांचा गंडा; ३ कोटी लंपास

बँक ऑफ महाराष्ट्राच्या एकूण १२ बँक खात्यातून त्यांनी १९ खाती व आणखी एक खाते अशा २० खात्यांवर तब्बल २ कोटी ९८ लाख ४०० रुपये ट्रान्सफर केले. दरम्यान  या खात्यातून हे पैसे वेगवेगळ्या ठिकाणाहून काढून घेण्यात आले आहे. 

बनावट अकाऊंटवरून अश्लील छायाचित्र फेसबुकवर पोस्ट करणे तरुणाला पडले महागात

फेसबुक सारख्या प्रसिद्ध सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर बनावट अकाऊंट तयार करून अश्लील छायाचित्र प्रसिध्द करणे एका तरुणाच्या चांगलाच अंगलट आलं आहे. या तरुण आरोपीने एका अल्पवयीन मुलीचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून त्यावरून कृत्य केलं आहे. या प्रकरणाचा रायगड पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाने कौशल्यपूर्णरित्या छडा लावत या तरुणाला गजाआड केले आहे. राजेंद्र तेलंगे असे या तरुणाचे नाव असून त्याला २ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पोलिसांचा सोशल मीडियावर कडक बंदोबस्त !

अयोध्या खटल्याच्या निकालानंतर कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने राज्यासह देशभरातील पोलिस प्रशासन कामाला लागले आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस पहारा देत आहेत. पोलिसांचे सोशल मीडिया वर बारीक लक्ष असुन नागरिकांनी चुकीचे मेसेज पुढे पाठवले तर संबंधित व्यक्तीवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. संपूर्ण राज्यभर सायबर सेल सोशल मीडियाव लक्ष ठेवून आहेत. राममंदीरा संदर्भात कोणताही मैसेज किंवा स्टेटस दिसल्यास तत्काळ त्या व्यक्तीला फोन करून संबंधित पोस्ट हटवण्यासंदर्भात सूचना देण्यात येणार असल्याची माहिती आहे. जर सूचनेचे पालन करण्यात आले नाही तर त्या व्यक्तीवर तातडीने गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येणार आहे.

पिंपरीमधील महायुतीच्या उमेदवाराचे ‘फेसबुक अकाऊंट हॅक’; सायबर क्राईम पोलिसात तक्रार दाखल

पिंपरी मतदारसंघामधून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढाणारे विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांचे अधिकृत फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सायबर क्राईम पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे. अगोदर चाबुकस्वार यांनी फेसबुकच्या अकाऊंटशी संलग्न असणारे मोबाईल क्रमांक, मेल आयडी हॅक झाले. त्यानंतर त्यांचे अकाऊंटच डिलीट झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमागील सूत्रधार कोण आहे याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. चाबुकस्वार यांचे स्वीय सहाय्यक विजय जगताप यांनी सायबर क्राईममध्ये या घटनेची माहिती देत तक्रार दाखल केली आहे. घटनेचा तपास सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

बारामती : शरद पवार, उर्मिलाविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या विरोधात तक्रार

Untitled design

  बारामती प्रतिनिधी | लोकसभेच्या उत्तर मुंबई मतदार संघातील काँग्रेस उमेदवार सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह  पोस्ट फेसबुकवर टाकल्याबद्दल बारामती शहर पोलीस स्टेशनला धनंजय कुडतरकर या व्यक्ती विरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे. बारामती येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ही तक्रार पोलिस ठाण्यात नोंदविली आहे. या तक्रारीनंतर संबंधित पोस्ट या फेसबुकवरून डिलीट झाली … Read more

‘कॅनडात’ नोकरी लावतो असं अामिष दाखवू तरुणाला पावणे तीन लाखांना गंडा

Cyber Crime

सोलापूर | नोकरीचे आमीष दाखवून गंडा घालण्याचे प्रकार अलीकडील काही काळात मोठ्या प्रमाणावर वाढले अाहेत. असाच एक धक्कादायक प्रकार सोलापुरात घडला आहे. कॅनडा देशात नोकरी लावतो असं आमिष दाखवून भामट्यांनी तरुणाला चक्क पावणे तीन लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून नोकरी शोधणार्या तरुणांमधे एकच खळबळ उडाली आहे. इतर महत्वाचे – दिल्लीत … Read more