कदाचित ‘या’ गोष्टींमुळं फडणवीसांच्या पोटात दुखत असेल; उद्धव ठाकरेंची खोचक टीका

मुंबई । ”फडणवीस दिल्लीत जाऊन काय करताहेत याची मला चिंता नाही. जनतेचा माझ्यावर विश्वास आहे तोवर मला चिंता नाही. बाकी फडणवीस हे बोलतच राहतील. कदाचित त्यांची पोटदुखी अशी असेलही की, कुठेही न जाता, न फिरता एका संस्थेने देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची निवड केली. हीसुद्धा पोटदुखी असू शकेल,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. दैनिक … Read more

.. म्हणून मी फिरत नाही घरी बसतो; उद्धव ठाकरेंचे भाजप नेत्यांना प्रत्युत्तर

मुंबई । शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची विशेष मुलाखत घेतली, याच मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी आपल्या शैलीतील फटकारे लगावले आहेत. यावेळी भाजप नेत्यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेचा चांगलाच समाचार उद्धव ठाकरेंनी यावेळी घेतला. कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नसून ते निष्क्रिय असल्याची टीका भाजप नेत्यांकडून त्यांच्यावर सतत होत … Read more

कोरोना संकटात फडणवीस आणि भाजपानं राजकारण करू नये; शरद पवारांनी विरोधकांना फटकारले

नाशिक । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूरनंतर आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक जिल्ह्यातही करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येनं झाला असून, प्रसार नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा पवारांनी आढावा घेतला. आढावा घेतल्यानंतर पवार यांनी पत्रकार परिषदेतून माध्यमांशी संवाद साधला. कोरोना संकटाच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि भाजपने राजकारण करू नये, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार … Read more

कोरोना टेस्ट कमी केल्यानं आपण काय कमावलं आणि काय गमावलं? काय म्हणते फडणवीसांची आकडेवारी

मुंबई । महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा वेळी कोरोना चाचणीवरून राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणारी आकडेवारी जरी केली आहे. महाराष्ट्रात कोरोना चाचण्या कमी केल्याने आपण काय गमावले आणि काय कमावले? असा प्रश्न उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांनी आपली एक आकडेवारी जारी केली आहे. देवेंद्र फडणवीस … Read more

सत्तेत असताना दूध दर वाढीकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजपाला आंदोलनाचा अधिकार नाही- बाळासाहेब थोरात

मुंबई । राज्यात दूध दरवाढ आंदोलनावरून राजकारण चांगलचं तापलं आहे. दूध दरांसाठी भाजपने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप सत्तेत असतानाही सलग तीन वेळा दुधाचे दर कोसळले होते. त्यावेळी शेतकरी तीन वर्षे आंदोलनही करत होते. पण, त्याकडे मात्र दुर्लक्ष केलं गेलं ही बाब अधोरेखित करत भाजपला दुधाचं … Read more

काळजी करू नका देवेंद्रजी तुमच्या हातात काही लागणार नाही; उर्जामंत्री नितीन राऊतांचा टोला

नागपूर । भाजप नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. अशा वेळी मध्य प्रदेश आणि राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस राबवलं जाणार अशी चर्चा रंगली आहे. त्याबाबत राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना विचारलं असता, ‘महाराष्ट्र सरकार मजबूत आहे. पुढची ५ वर्ष हे सरकार चालेल. मुख्यमंत्री आणि आमचे अध्यक्ष सगळ्या … Read more

फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची स्वप्नच पाहावी लागणार – गुलाबराव पाटील

मुंबई | काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांच्या कामकाजामुळे चर्चेत आहेत. तसेच त्यांचे नाव अतिशय लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत जाहीर झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय , तसेच त्यांच्या कामाची पद्धत हि जनतेला आवडली आहे.त्यामुळे प्रत्येक निर्णयात जनतेची साथ मुख्यमंत्र्यांना लाभली आहे. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी विरोधी पक्षनेते … Read more

फडणवीसांनी घेतली अमित शहांची अचानक भेट; राज्यात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चेला उधाण

नवी दिल्ली । विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. या दोघांमध्ये किमान तासभर चर्चा झाली. दरम्यान  ऑपरेशन लोटस तयार झालेलं नाही. त्याची चर्चाही झाली नाही. या भेटीतील चर्चेचे विषय महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती आणि शेतकऱ्यांना करायची मदत असे होते. यामध्ये कोणताही … Read more

आपापसात मारामाऱ्या करा, फक्त लोकांचा फायदा होईल याचा विचार करा; फडणवीसांचा टोला

नवी दिल्ली । महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून काँग्रेसनं शिवसेना-राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त केली होती. त्यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी “आपापसात मारामाऱ्या करा, पण लोकांचा फायदा होईल असं कामं करा,” असा टोला फडणवीस यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना लगावला. फडणवीस यांनी साखर उद्योगासंदर्भातील प्रश्नांसंदर्भात केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती दिली. … Read more

ग्रामपंचायतीवर थेट राजकर्त्यांनी निवड करणे चुकीचेच – विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस 

Devendra Fadanvis

मुंबई । राज्यातील मुदत संपत असलेल्या सुमारे हजार १४ हजार ग्रामपंचायतींवर पालकमंत्र्यांच्या सल्लामसलतीने प्रशासक  नेमण्याच्या  आदेशाला विरोध करत सरकारने दिलेला   आदेश तत्काळ मागे घेण्यात यावा. हा आदेश लोकशाही परंपरांवर आघात करणारा आहे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे. ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून थेट राजकीय कार्यकर्त्यांच्या नेमणुका … Read more