शिंदे गटाचे ढाल- तलवार चिन्ह वादात; कोणी घेतलाय आक्षेप?

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिले असून त्यांना ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आलं आहे. मात्र आता हे चिन्हच वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. याच कारण म्हणजे शीख समाजातर्फे या चिन्हांबाबत आक्षेप घेण्यात आला असून सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव रणजीत सिंह कामठेकर यांनी याप्रकरणी निवडणूक आयोगाला … Read more

राष्ट्रवादीला मोठा धक्का! अजित पवार यांनी मंजूर केलेला निधी शिंदे, फडणवीस सरकारने रोखला

Eknath Shinde and ajit pawar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून मागील सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याचा धडाका सुरू केला आहे. यावरून अनेकदा विरोधकांनी शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यानंतर शिंदे, फडणवीस सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का दिला आहे. महाविकास आघाडीच्या काळात विविध विकास कामांसाठी मंजूर करण्यात आलेला 850 कोटी रुपयांचा निधी … Read more

बाळासाहेब यांचं नाव घ्यायचं आणि त्यांनाच धोका द्यायचा; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची शिंदे गटावर टीका

Eknath Shinde and Balasaheb

अकोला : हॅलो महाराष्ट्र – अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवरून (Andheri East Assembly By-Election) सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून मुरजी पटेल यांना तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके (Rituja Latke) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीत भाजपाला बाळासाहेबांच्या शिवसेनेने पाठिंबा दर्शवला आहे. मात्र आता यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात … Read more

भाजपाला एकनाथ शिंदेही नको आहे, युतीबाबत प्रकाश आंबेडकर यांचे मोठे वक्तव्य

Prakash Ambedkar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकारणावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या युतीबाबत मोठे वक्तव्य (prakash ambedkar) केले आहे. भाजपाला जसे उद्धव ठाकरे नको होते तसेच त्यांना एकनाथ शिंदे हे देखील नको आहेत, असे वक्तव्य त्यांनी (prakash ambedkar) … Read more

कटकारस्थानात अडकून पडलेल्या ‘खोके’ सरकारला… ; सामनातून निशाणा

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस असून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. यंदाचा पावसाळा हा शेतकऱ्यांच्या मुळावरच उठला आहे. पोटनिवडणुकीच्या व्यूहरचनेत आणि कटकारस्थानात अडकून पडलेल्या ‘खोके’ सरकारला शेतकऱ्यांची ही दैना दिसेल काय? असा सवाल करत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून सत्ताधारी भाजप- शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. गेले 10-12 दिवस राज्याच्या … Read more

पुण्यात शिंदे गट उभारणार सेनाभवन; जागा आणि नावंही ठरलं

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई पाठोपाठ आता पुण्यात शिंदे गटाकडून नवं सेनाभवन उभारण्यात येणार आहे. पुण्यातील सारसबाग परिसरात शिंदे गटाचे नवीन कार्यालय सुरु होणार आहे. पुण्यातील या सेनाभवनाला ‘बाळासाहेबांची शिवसेना भवन’ असं नाव देण्यात येणार आहे. साधारणपणे 5 हजार चौरस फुटाचे हे शिंदे गटाचे कार्यालय असणार आहे. कार्यालयामध्ये मिटिंग हॉल, पत्रकार परिषद हॉल, जनता दरबार … Read more

आता परफेक्ट काम झालंय; नव्या चिन्हावर शिंदेंची प्रतिक्रिया

EKNATH SHINDE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला ढाल तलवार हे चिन्ह दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ढाल तलवार ही मराठमोळी निशाणी आहे, आता परफेक्ट काम झालंय असं त्यांनी म्हंटल आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, खरं तर आम्ही सूर्य या चिन्हाला पहिली पसंती दिली होती. परंतु, … Read more

RSS च्या बाळासाहेबांची शिवसेना? नेटकऱ्यांकडून शिंदे गट ट्रोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिले आहे तर दुसरीकडे शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं आहे. मात्र या नावात ठाकरे असा कुठेही उल्लेख नसल्याने विरोधकांनी शिंदे गटाला ट्रॉल करण्यास सुरुवात केली आहे. कारण महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नाव सोडून दुसरेही … Read more

शिंदे गटाला मिळाले ‘हे’ चिन्ह; निवडणूक आयोगाचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल हे चिन्ह दिल्यांनतर आता शिंदे गाठला ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आले आहे . नव्या चिन्हासाठी शिंदे गटाने यापूर्वी दिलेले पर्याय निवडणूक आयोगाने नाकारत त्यांना नवीन चिन्हे पाठवण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर शिंदे गटाने सादर केलेल्या चिन्हांपैकी निवडणूक आयोगाने ढाल तलवार हे चिन्ह त्यांना … Read more

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; ठाकरे- शिंदे गटाला मिळाले ‘हे’ नाव

uddhav thackeray shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यांनंतर आता एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळालं आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने मशाल हे चिन्ह दिले आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला ३ चिन्हांचा पर्याय … Read more