हौस ठरली भारी ! लग्नात लावलेले फटाके घुसले इमारतीत; साहित्याचे मोठे नुकसान

Firecrackers karad

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड येथे रविवारी लग्नानंतर लावण्यात आलेल्या फटाक्यांमुळे लागलेल्या आगीत एका गोडाऊनसह दोन दुकानातील साहित्य जळाल्याची घटना घडली. शहरातील कोल्हापूर नाका परिसरात असलेल्या जाधव आर्केडमध्ये सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून दुकानात फटाके फुटल्याने त्यातील साहित्य जळून खाक झाले. यामध्ये साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळावरुन मिळालेली माहिती … Read more

सह्याद्री देवराई प्रकल्पा लगतच्या डोंगराला लागला वनवा; अनेक वृक्ष आगीत खाक

fire broke trees

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरा लगत असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर म्हसवे गावच्या हद्दीत सह्याद्री देवराई प्रकल्पा लगत असणाऱ्या डोंगराला शुक्रवारी रात्री वनवा लागला. अज्ञातांनी लावलेल्या वणव्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष जळून खाक झाले. सध्या डोंगराळ भागात वृक्षांना आग लावण्याच्या घटना घडत असून सातारा शहरालगत शुक्रवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास अज्ञातांकडून आग लावल्याची घटना घडली. … Read more

मुंबईतील ‘अविघ्न पार्क’ इमारतीला भीषण आग; सर्वत्र धुराचे लोट

mumbai fire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लालबागमधील ‘अविघ्न पार्क’ इमारतीमध्ये भीषण आग लागली आहे. इमारतीच्या ३५ व्या मजल्यावर ही आग लागली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग वीजवण्याचे प्रयत्न सुरु आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी घडलेली नाही. आज सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी ही आग लागली … Read more

साताऱ्यात ‘सिटी वाईन्स शॉप’च्या पाठीमागील गोदामास भीषण आग

Satarat Shop Fire

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा येथे रविवारी राधिका रोडवर असलेल्या ‘सिटी वाईन्स शॉप’च्या पाठीमागील बाजूस असलेल्या गोदामास भीषण आग लागण्याची घटना रविवारी घडली. या घटनेत गोदामातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सातारा येथे सिटी वाईन्स शॉपच्या पाठीमागील बाजूस रविवारी दुपारी आग लागण्याची घटना घडताच परिसरातील नागरिकांमध्ये गोंधळ उडून गेला. नागरिकांनी तत्काळ नगरपालिकेच्या अग्निशामक विभाग … Read more

भिवंडीत अगरबत्ती, कापूरच्या कारखान्यास भीषण आग

Bhiwandi Factory Fire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत येथे कापूर, अगरबत्तीच्या कंपनीसह कारखान्याला भीषण आग लागली आहे. भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावाच्या गोदाम पट्यातील लक्ष्मी कंपाऊंड भागात आज सकाळच्या साडे सहा वाजल्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. याबाबात अधिक माहिती अशी की, भिवंडी येथे आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास अगरबत्ती कारखान्यातून अचानकपणे धुरांचे लॉट बाहेर येताना … Read more

नवरा बायको प्रवास करत असताना अचानक दुचाकीने घेतला पेट, गोंदियातील घटना

Fire

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – गोंदियामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पती – पत्नींचा थोडक्यात जीव वाचला आहे. हे दोघे पती- पत्नी दुचाकीवरून जात असताना अचानक गाडीला आग (Fire) लागली. आग इतकी तीव्र होती की थोड्यावेळातच आगीने (Fire) रौद्र रूप धारण केले. गाडीला आग (Fire) लागल्याचे समजताच पतीने पत्नीला गाडीवरुन खाली उतरवून गाडी बाजूला … Read more

सर्वात उंच टॉवर ‘बुर्ज खलिफा’च्या जवळ असलेल्या इमारतीला लागली आग

Fire

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात उंच टॉवर म्हणून ज्याची ओळख आहे त्या ‘बुर्ज खलिफा’ जवळ असलेल्या 35 मजली इमारतीला भीषण आग (fire) लागली आहे. हि घटना काल घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ त्या ठिकाणी असलेल्या लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. तो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. दुबईत ‘बुर्ज खलिफा’ जवळ … Read more

मुंबईतील फॅशन स्ट्रीट परिसरात भीषण आग; अनेक दुकाने उध्वस्त

mumbai fasion street fire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील फॅशन स्ट्रीट येथील दुकानांना आग लागल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही आग नेमकी कशी लागली याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. Maharashtra | Information about fire in shops at Fashion Street, Mumbai received. Fire … Read more

मालेगावमध्ये भीषण आग! अनेक यंत्रमाग कारखाने आगीत जळून खाक

Fire

मालेगाव : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. दोन दिवसांआधीच आगीची आणखी एक घटना समोर आली होती. यात एका फर्निचर मॉलसह भंगार गोदामाला आग लागली होती. आग लागली त्यावेळी फर्निचर मॉलमध्ये आठ ते दहा कामगार झोपलेले होते. मात्र, त्यांना वेळीच जाग आल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, या आगीतही लाखो … Read more

नाशिकमध्ये पुन्हा अग्नितांडव! फर्निचर मॉल आगीत जळून खाक

Fire

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये पुन्हा एकदा आगीची (fire) मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये नाशिकमधील वडनेर दूमाल रोडवर एका फर्निचरच्या गोदामाला भीषण आग (fire) लागली. हि आग (fire) एवढी भीषण होती कि, या आगीमध्ये (fire) गोदामाच्या बाजूला असलेली चार ते पाच घर आणि काही वाहने पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने या आगीमध्ये (fire) कोणतीही … Read more