गुड न्यूज! मान्सून १ जूनला केरळात दाखल होणार; हवामान विभागाचा अंदाज

नवी दिल्ली । शेतकरी वर्गासाठी एक खुशखबर मिळत आहे. भारतात मान्सून दाखल होण्यासाठी अतिशय अनुकूल वातावरण निर्माण असून मान्सून १ जूनला केरळ दाखल होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. याआधी हवामान विभागाने मान्सून केरळमध्ये ५ जूनला दाखल होईल, असा अंदाज वर्तवला होता. दरम्यान, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने … Read more

देशात उष्णतेची लहर; हवामान खात्याकडून ‘या’ राज्यांना रेड अलर्ट जारी

नवी दिल्ली । यंदाच्या उन्हाळ्याच्या मौसमात देशाला सध्या ऊन्हाची चांगलीच झळ बसत असून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. राजधानी दिल्लीमध्ये उन्हाच्या झळा बसत असून येथील तापमानात वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे सकाळपासून उन्हाचे चटके लागायला सुरवात होते. त्याचप्रमाणे देशातील अन्य भागांमध्ये देखील उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. उत्तर भारतात पुढील ३ दिवस तीव्र तापमानाचा अंदाज … Read more

पुढील २-३ दिवस तापमानात होणार वाढ ; २९ मे पासून पाऊस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या २ ते ३ दिवसांत हवेतील उष्णता प्रचंड वाढणार आहे. उत्तर भारतातील अनेक भागात तर पॅरा आणखीनच वाढेल. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि राजस्थानमध्ये पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार २९ मेनंतरच उन्हापासून आराम मिळण्याची शक्यता आहे. प्रादेशिक विशेष मेट्रोलॉजिकल सेंटरचे प्रमुख … Read more

काही तासातच रौद्ररूप घेऊ शकते अम्फान चक्रीवादळ; ओडिशात रेड अलर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बंगालच्या उपसागरात येणारे चक्रीवादळ अम्फान हे अनेक राज्यांमध्ये धोका निर्माण करू शकते असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. आयएमडीने याबाबत म्हटले आहे की,’ यावेळी देशात वेस्‍टर्न डिस्टरबन्स एक्टिव आहे, यामुळे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशातही हवामान खराब होऊ शकते. ओडिशा आणि बंगालमध्ये रेड … Read more

कोरोना संकटात १६ मे ला अम्फान चक्रिवादळाचे संकट; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सुचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय हवामान खात्याने १६ मे रोजी संध्याकाळी नैऋत्य आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ येण्याचा अंदाज वर्तविला आहे. आयएमडीने म्हटले आहे की दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र बनले आहे. त्यामुळे पुढील १२ तासांत ते ऍक्टिव्ह बनेल, म्हणूनच १६ मे रोजी संध्याकाळी ते चक्रीवादळात बदलण्याची शक्यता आहे. थायलंडने दिलेल्या या वादळाचे … Read more

केरळमध्ये मान्सून यायला ४ दिवस उशीर; ‘या’ कारणामुळे यंदा पाऊस होणार लेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नैऋत्य मान्सूनची प्रतीक्षा आता सुरू झाली आहे. दरम्यान, यावर्षी मान्सूनला केरळमध्ये यायला चार दिवस उशीर होऊ शकेल, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिली आहे. याबाबत माहिती देताना हवामान खात्याने शुक्रवारी सांगितले की, केरळमध्ये नैऋत्य मान्सूनची सुरूवात यंदाच्या १ जूनच्या तारखेपासून थोड्या वेळानंतर होण्याची शक्यता आहे. यावर्षी ५ जूनपासून केरळमध्ये मान्सूनला … Read more

भारताने ‘असा’ दाखवाला पाकव्याप्त काश्मीरवर आपला हक्क; पाकिस्तानचा तिळपापड

नवी दिल्ली । संपूर्ण जग कोरोनाशी मुकाबला करत आहे अशा संकटातही भारत-पाक संघर्ष अजून पेटतच आहे. दोन्ही देशांच्या सीमेवर अजूनही तणाव असून पाकच्या कुरापती याही काळात सुरु आहेतच. त्याला थेट मैदानावर भारताने चोख प्रत्युत्तर दिलंच. पण अनेकदा लढाई मैदानाच्याबाहेरही खेळली जाते. कदाचित म्हणूनच आणखी एका नव्या माध्यमातून भारताने पाकव्याप्त काश्मीरवरचा आपला दावा बळकट केला आहे. … Read more

बळीराजासाठी खुशखबर! यंदा १०० टक्के पाऊस पडणार- हवामान विभाग

नवी दिल्ली । शेतकऱ्यांसोबत संपूर्ण देशासाठी आनंदाची बातमी भारताच्या हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. यंदा सरासरीच्या १०० टक्के पाऊस पडणार असल्याचं  हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावर्षी  मान्सून सामान्य राहणार असून ५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत देशात ९६ ते १०० टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. This year we … Read more

‘वायू’ १३ जूनला गुजरात किनाऱ्याला धडकणार!

राष्ट्रीय | भारतीय हवामान खात्याने अरबी समुद्रातून येणाऱ्या ‘वायू’ चक्रीवादळामुळे गुजरातला रेड अलर्ट जारी केला आहे.  हे वायू चक्रीवादळ १३ जूनला गुजरात किनाऱ्याला धडकणार आहे. त्यामुळे जवळपास किनारपट्टीलागतच्या तीन लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. हवामान खात्याने मच्छिमार आणि  गुजरात किनारपट्टीलगतच्या लोकांना अगोदरच चक्रीवादळाच्या धोक्याचा इशारा दिला होता.