आरोग्य मंत्र्यावर अज्ञात पोलीस कर्मचाऱ्याने झाडल्या गोळ्या; प्रकृती चिंताजनक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा दास यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. एका अज्ञात पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्यावर गोळ्या झाडल्याची घटना झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगर येथे आज घडली. गोळ्या झाडल्यानंतर नाबा खाली कोसळले. जखमी अवस्थेतच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

खुन्नसने केला तिघांनी तरुणावर चाकूने हल्ला

Karad Police

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी खुन्नसने पाहिल्याचा कारणावरून तिघांनी एका युवकावर चाकूने वार केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास कराड बसस्थानक परिसरात घडली. या हल्ल्यात संबंधित युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्या मित्रालाही हाताने मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघाजणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदर्शन यादव, दीपक आवळे व … Read more

पाकिस्तानात इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार; चारजण जखमी

imran khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारातून इम्रान खान सुरक्षित बचावले असले तरी त्यांच्या डाव्या पायाला गोळी लागली आहे. तर गोळीबारात चारजण जखमी झाले आहेत. पाकिस्तान येथील वजिराबाद येथे आज रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हेही या रॅलीत … Read more

विद्यानगरला कोयता व विटांनी मारामारी : दोघे जखमी, चौघांवर गुन्हा

Karad Police City

कराड | येथील फार्मसी काॅलेज समोर किरकोळ कारणावरून कोयता व विटांनी मारहाण करून दोघांना जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यानगर येथे शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. या प्रकरणात सुश्मित ठोंबरे, सागर कांबळे, दीपक माने व … Read more

सातारा- पंढरपूर हायवेवर भीषण अपघात 3 जण जागीच ठार : वाहने 300 फूटावर फेकली गेली

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा- पंढरपूर महामार्गावर गोंदवले खुर्दजवळ समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात तिघे तरुण जागेवरच ठार झाले तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात इतका भीषण होता की चक्काचूर झालेली अपघातग्रस्त वाहने सुमारे तीनशे फूट अंतरापर्यंत दूरपर्यंत जाऊन पडली होती. सर्व मृत पळशी आणि दीडवाघवाडी (ता. माण) येथील असल्याने पळशी व दिडवाघवाडी … Read more

गव्याने 60 वर्षीय वृध्दाचे काळीजच फाडले : पांढरेपाणी गावाला काळ्या पाण्याची शिक्षा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मोरणा विभागातील पश्चिमेला अतिदुर्गम ठिकाणी वसलेल्या पांढरेपाणी गावातील 60 वर्षीय वृद्धावर गव्याने हल्ला करून काळीज फाडून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या वृध्दाला उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखले केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमीला जीव धोक्यात घालून वाहत्या पाण्यातून डोलीत बसवून 2 तास पळवत आणून 6 ते 7 … Read more

आंबनेळी घाटात 100 फूट खोल दरीत पर्यटक कोसळला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाबळेश्वर तालुक्यातील आंबेनळी घाटात माकडाला खायला देण्याच्या नादात एक पर्यटक 100 फूट दरीमध्ये कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पर्यटकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पावसाने नुकतीच हजेरी लावलेली असून निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. यावेळी महाबळेश्वर, प्रतापगड, पाचगणी परिसरात माकडांची संख्या मोठी … Read more

साताऱ्यात मिलिटरी कॅन्टीन येथे गाढवाच्या धडकेत महिला गंभीर जखमी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सदरबझार येथील मिल्ट्री कॅन्टीनजवळ मिल्ट्रीत हवालदार पदावर कार्यरत असणारे सागर किसन सावंत (रा. लिंब ता. सातारा) यांच्या आईला गाढवाने जोरदार धडक दिली. पुष्पा किसन सावंत (वय- 55) असे त्यांचे नाव आहे. या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी तात्काळ सरकारी रुगणालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्यांच्या … Read more

वादळी वाऱ्यासह पाऊस : मायणीत भिंत कोसळल्याने 6 जखमी, गाड्याचेंही नुकसान

सातारा | सातारा जिल्ह्याला रविवारी वादळी वाऱ्यासह झोडपले. या पावसामुळे मायणी येथे बाजार पटांगण शेजारी खाजगी मालकाच्या बंद घराची भिंत कोसळून 6 जण जखमी झाले आहेत. तर मायणीतच बसस्थानकात एक मोठे झाड कोसळल्याने अनेक दुचाकीचे नुकसा झाले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अजूनही काही दिवस सातारा जिल्ह्यात पावसा सातारा जिल्ह्यातील कराड, पाटण, खटाव, माण तालुक्याला वादळी … Read more

आयर्विन पुलावर भजनी मंडळाच्या टेम्पो आणि कारचा अपघात : दोन ठार तर 10 जण गंभीर जखमी

सांगली | सांगलीच्या आयर्विन पुलावर दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पो मधील महिला आणि कार मधील चालकाचा जागीच मृत्यू झाला. इर्शाद रफिक नदाफ (रा. कसबेडिग्रज) असे मृत चालकाचे नाव आहे. तर मृत झालेल्या महिलेचे नाव समजू शकले नाही. सदरचा अपघात बुधवार दि. 4 मे रोजी रात्री 10. 30 वाजण्याच्या सुमारास … Read more