काळज- सासवड रस्त्यावर दुचाकी अपघातात एक ठार तर एक जखमी

फलटण प्रतिनिधी | प्रभाकर करचे फलटण तालुक्यातील काळज -सासवड रस्त्यावर तांबेवस्ती जवळ दोन दुचाकीचा समोरा समोर अपघात झाला. अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. अजित हरिभाऊ पवार (वय- 42, रा. शेरेचीवाडी, ता. फलटण) असे मृत्यू झाल्याचे नांव आहे. तर सूर्यकांत गणपत भोसले (वय- 38, रा. शेरीचीवाडी, ता. फलटण) हे … Read more

ढगफुटी अतिवृष्टी : शिराळा तालुक्यातील एमआयडीसीत कंपन्यांचे पत्रे उडाले, सहाजण जखमी

शिराळा प्रतिनिधी | आनंदा सुतार सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील एमआयडीसी परिसरात सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या ढग फुटीच्या पावसात अनेक कंपन्यांच्या इमारतीचे पत्र्यांचे शेड जमीनदोस्त झाल्याची घटना घडली आहे. या वादळी वाऱ्यांच्या पावसात सहाजण जखमी झालेल्या आहेत. नुतन महादेव डांगे (वय- 23 रा. शिराळा) युवतीचे पायवर भिंत पडल्याने दोन्ही पाय मोडले असून मेघा लक्ष्मण पाटील … Read more

वादळी वाऱ्यामुळे शाळेची भिंत कोसळून चिमुकलीचा मृत्यु; आई-वडील गंभीर जखमी

नांदेड | जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून सतत मध्यम ते जोरदार स्वरूपात पावसाने हजेरी लावली आहे. नायगाव, धर्माबाद तालुक्यात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तर देगलूर तालुक्यातील शेवाळा शेकापुर पुनर्वसन गावात 29 रोजी वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या पावसात आसरा घेऊन थांबलेल्या पाच वर्ष सांची सूर्यकांत आडकूते या चिमुकलीवर जिल्हा परिषद शाळेच्या जिर्ण इमारतीची … Read more

गोटे गावच्या हद्दीत आंबे घेवून जाणाऱ्या गाडीला अपघात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील पुणे- बंगळूर महामार्गावर गोटे गावाजवळ आंबे घेवून जाणाऱ्या मालवाहतूक गाडीचा अपघात झाला. शनिवारी (दि.15 मे) सकाळी सात वाजता हा अपघात झाला. घटनास्थळी हायवे हेल्पलाइने मदत केली. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रत्नागिरी येथून पुण्याला आंबे घेवून जाणाऱ्या गाडी क्रमांक (एमएच- 08 – एपी- 2740) गाडीचा अपघात झाला. गाडी चालकांचा … Read more

आंबनेळी घाटात मधमाश्यांचा वाहनचालकांवर हल्ला ः अनेकजण जखमी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके प्रतापगड – पोलादपूर जाणाऱ्या मार्गावरील आंबनेळी घाटात आग्यामहूच्या मधमाश्यांनी अनेक वाहनचालकांना चावा घेतला आहे. आग्यामहूच्या मधमश्यांनी चावा घेतल्याने अनेकजण जखमी झाल्याची घटना घडली असून वाहनधारकांच्यात भीतीचे वातावरण आहे. आंबनेळी घाटात बुधवारी सकाळी आग्यामहूच्या मधमाशा घोघावत फिरत होत्या. यावेळी कुठेतरी घाटातील महू उठल्याने सर्वत्र मधमाशा फिरत होत्या. या घाटातून प्रवास करणाऱ्या … Read more

भीतीदायक ! सराव करताना फुटबॉल प्लेयरच्या अंगावर वीज कोसळली; व्हिडिओ पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशियामध्ये मॉस्कोजवळील ओरेखोवो-झुएवो शहराजवळ एक घटना घडली आहे जी सामान्यत: पाहिली जात नाही. इथल्या फुटबॉल मैदानावर सराव चालू असताना एका सोळा वर्षाच्या खेळाडूवर विज कोसळली. त्यानंतर या मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले ज्यामुळे त्याचा जीव तर वाचला मात्र याक्षणी तो कोमामध्ये गेला आहे. डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या मुलाच्या … Read more

पतंगाच्या नायलॉन मांज्यामुळे अनेक नागरिक जखमी; विक्रेत्यांवर पोलिसांची थातुरमातुर कारवाई

नुकताच संक्रांत हा सण साजरा झाला. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर पतंग उडवले गेले. मात्र नायलॉन व मांजा वापरण्यास बंधी असतांना पतंगबाजी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या नायलॉन व मांजा दोऱ्यामुळे शहरातील विविध भागांतील नागरीक जखमी झाले आहेत. जिवघेण्या नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असतानाही त्याची शहरात बड्या व्यापाऱ्यांनकडून विक्री होत आहे. मात्र पोलिस छोट्या व्यापाऱ्यांना लक्ष करून थातूरमातूर कारवाई करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.