आयर्विन पुलावर भजनी मंडळाच्या टेम्पो आणि कारचा अपघात : दोन ठार तर 10 जण गंभीर जखमी

सांगली | सांगलीच्या आयर्विन पुलावर दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पो मधील महिला आणि कार मधील चालकाचा जागीच मृत्यू झाला. इर्शाद रफिक नदाफ (रा. कसबेडिग्रज) असे मृत चालकाचे नाव आहे. तर मृत झालेल्या महिलेचे नाव समजू शकले नाही. सदरचा अपघात बुधवार दि. 4 मे रोजी रात्री 10. 30 वाजण्याच्या सुमारास … Read more

देवदर्शनाहून परतणाऱ्या तवेरा- इंडिका गाडीचा भीषण अपघात : दोनजण जागीच ठार 6 जखमी

सातारा | लोणंद-फलटण रस्त्यावर सुरवडीनजीक इंडिका व तवेरा या दोन चारचाकी वाहनांचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये इंडिका कारमधील दोघेजण जागीच ठार तर 6 जण जखमी झाले आहेत.  या अपघातात शुभम केवटे (रा. संगमनेर, जि. अहमदनगर), सचिन ऊर्फ गोट्या भारत काळेल (रा. वळई, ता. माण) या दोघांचा मृत्यू झाला असून दैवत शामराव काळेल (रा. वळई, ता. … Read more

कराडजवळ टेम्पोची रिक्षाला पाठीमागून धडक, रिक्षाचा चक्काचूर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे- बेंगलोर महामार्गावरती नांदलापूर फाटा येथे टेम्पो- रिक्षाचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला असून प्राथमिक माहितीनुसार 5 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. आज बुधवार दिनांक 4 मे रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. घटनास्थळावरून मिळालेली प्राथमिक माहिती अशी, कराडहून- कोल्हापूरच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावर … Read more

कराड- पाटण मार्गावर अपघातात स्कॉर्पिओचा चक्काचूर : टेम्पो पलटी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड – पाटण मार्गावर असलेल्या विहे गावच्या हद्दीत स्कॉर्पिओ आणि एका टेम्पोचा मोठा अपघात झाला आहे. या दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून स्कॉर्पिओ चालक गंभीर जखमी झाला आहे. तर टेम्पो पलटी तर स्कॉर्पिओचा चक्काचूर झाला असून सदरची घटना गुरूवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अपघातात जखमी स्कॉर्पिओ चालकाचे … Read more

80 फूट खोल दरीत एकजण कोसळून गंभीर जखमी

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके किल्ले पांडवगडावर फिरण्यासाठी गेलेल्या एक मुलगा तब्बल 80 फूट कड्यावरून खोल खाली दरीत कोसळ्याची घटना आज सकाळी घडली. यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील वाई येथील कु. विनायक राजपुरे हा मित्रासोबत आज सकाळी फिरण्यासाठी गेला होता. … Read more

गोपीचंद पडळकरांच्या भावाच्या गाडीला भीषण अपघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसवर वारंवार टीकास्त्र सोडण्याचे काम भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून केले जातंय. काही दिवसापूर्वी त्याच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आता त्यांच्यानंतर त्यांचे बंधू आणि सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य ब्रम्हानंद पडळकर यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघात ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह तिघे जखमी … Read more

पुणे- बंगलोर महामार्गावर टायर फुटल्याने चारचाकी- दुचाकीचा अपघात : सातजण जखमी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राष्ट्रीय महामार्गावर रात्री उशिरा चारचाकीचा टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला आहे. या अपघातात चारचाकीने दुचाकीचा जोराची धडक दिली असून सातजण जखमी झाले आहेत. तर चालकाचा ताबा सुटल्याने चारचाकी झाडावर जावून आदळली आहे. या दुर्घटनेतील तीनजण गंभीर जखमी आहेत. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड तालुक्यातील कोर्टी गावच्या हद्दीत शनिवारी … Read more

महाबळेश्वरमध्ये वीस फूट खोल विहिरीत पडला रानगवा; गंभीर दुखापत

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरपासून सुमारे सहा किमी अंतरावर असलेल्या क्षेत्र महाबळेश्वर परिसरातील एका खासगी बंगल्यालगत वीस फूट खोल कोरड्या विहिरीत एक रानगवा पडल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. यामध्ये हा रानगवा गंभीर जखमी झाला असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली. दरम्यान, नुकतीच पुण्याहून एक वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. याबाबत अधिक … Read more

बामणोली येथे शेतकऱ्यावर रानगव्याच्या हल्ला : गंभीर जखमी

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जावली तालुक्यातील पिसाडी येथील शेतकरी रानगव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. जखमी शेतकऱ्याला उपचारासाठी सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लक्ष्मण बाबुराव माने असे शेतकऱ्याचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा जिल्ह्यातील कारगाव ग्रामपंचायत हद्दीतील पिसाडी गावचे लक्ष्मण बाबुराव माने (वय- 60) हे सकाळी साडेनऊच्या सुमारास नेहमीप्रमाणे … Read more

उधारी मागितल्याने चायनीज चालकाच्या डोक्यात बाटली फोडली

सातारा : मागील उधारी दिलेले पैसे मागितल्याने चायनीज चालकाच्या डोक्यात काचेची बाटली फोडून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना साताऱ्यातील मोळाचा ओढा परिसरात घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. अजय आणि ईश्वर बापू मोरे (रा. गेंडामाळ, झोपडपट्टी, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शंकरराव रामुहरी नायक … Read more