लसीकरणाचा टक्का घसरला ! जिल्हाधिकारी व सीईओंना विभागीय आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस

औरंगाबाद – मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत कोरोना लसीकरणाचा टक्का घसरल्यामुळे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि जि. प. सीईओंना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मागील 11 महिन्यांपासून पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी देशपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, असे असताना विभागातील सर्वच जिल्ह्यांत लसीकरणाचा वेग मंदावल्यामुळे विभागीय आयुक्तांनी काल विभागाचा आढावा घेतला. त्यात मराठवाडा विभाग पिछाडीवर … Read more

राजुरच्या गणरायाचे आता ऑनलाइन दर्शन

rajur

औरंगाबाद – येथून जवळच असलेल्या भोकरदन तालुक्यातील प्रसिद्ध राजूर येथील राजुरेश्वराचे भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी आजपासून अंगारकी चतुर्थीच्या मुहूर्तावर लाईव्ह यु ट्यूब चॅनल सुरू करण्यात आले आहे. यामुळे भाविकांना आता घर बसल्या राजुरच्या गणरायाचे ऑनलाइन दर्शन घेता येणार आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेल्या राजूर येथील राजुरेश्वर आज या मंदिरात राज्यातून तसेच राज्याबाहेरून भाविक … Read more

एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपेना; मराठवाड्यातील 395 कर्मचाऱ्यांचे निलंबन

औरंगाबाद – एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप अजूनही सुरूच आहे. सरकार सोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असताना त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात हे आंदोलन तीव्र होत आहे. बुधवारपर्यंत मराठवाड्यातील 395 कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले आहे. तर 42 कोटींच्या वर महसूल बुडाला असल्याची माहिती … Read more

‘तुला पैसे प्रिय की मी’ असे म्हणत तरुणीने प्रियकरास पाजले विष

Poision

जालना – पैशांची मागणी पूर्ण करत नसल्याचा राग येऊन प्रेयसीने ऐन दिवाळीत आपल्याच हाताने प्रियकराला विष पाजल्याची धक्कादायक घटना जालन्यात घडली आहे. विष पोटात गेल्याने चार दिवसांपासून उपचार घेत असलेल्या प्रियकराने शुद्धीवर आल्यानंतर या संदर्भात कदीम जालना पोलीस ठाण्यात प्रेयसी महिलेविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

थरारक ! राष्ट्रीय महामार्गावरील बँकेत भर दिवसा सशस्त्र दरोडा; रोख रक्कमेसह कोट्यवधींचे दागिने पळविले

Robbary

जालना – जिल्ह्यातील शहागड येथील बुलढाणा अर्बन बँकेत तीन दरोडेखोरांनी फिल्मीस्टाईलने धुडगूस घालत दरोडा टाकला. दरोडेखोरांनी बंदुकीच्या नोकेवर पंचवीस लाख रोख रक्कम; तर अंदाजे एक कोटी पेक्षा जास्त रुपयांचे सोन्याचे दागिने पळवल्याची घटना काल सायंकाळी पाच वाजेदरम्यान घडली. शहागड ( ता.अंबड ) येथील बुलढाणा अर्बन बँकेचे कामकाज सुरू असतांना गुरुवारी सायंकाळी पावने पाच वाजेदरम्यान तीन … Read more

संतापजनक ! जन्मदात्या पित्यानेच घेतला तीन महिन्याच्या चिमुकलीचा प्राण

murder (1)

जालना – कुटुंबात किरकोळ कारणावरून दुसऱ्या व्यक्तीला खूनाच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जन्मदात्या पित्यानेच आपल्या तीन महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री मंठा तालुक्यात उघडकीस आली. स्नेहा अविनाश जाधव (3 महिने) असे मृत मुलीचे नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, मंठा तालुक्यातील केहाळ वडगाव येथील दोन … Read more

पोलीस दलात खळबळ ! हजारोंची लाच घेताना सहायक पोलिस निरीक्षक रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात

Lach

जालना – गुन्ह्यात आरोपी न करता तपासात मदत करण्यासाठी एका व्यक्तीकडून 30 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह पोलीस शिपायास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रंगेहात पकडले. मागील काही दिवसापासून पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांमध्ये लाच घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, एसीबी ची कारवाई देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे पोलिस दलात सध्या खळबळीचे … Read more

जालना- औरंगाबादमध्ये आयकर विभागाची छापेमारी ! तब्बल 300 कोटींची मालमत्ता जप्त

औरंगाबाद – जालना आणि औरंगाबादमधील स्टिल कंपनी री रोलिंग मीलवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. यामध्ये 300 कोटींपेक्षा जास्त रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. जालना आणि औरंगाबादमध्ये 32 ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली. 23 सप्टेंबर रोजी आयकर विभागाने ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे औरंगाबाद आणि जालनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. … Read more

धावती एसटी बस नदीत कोसळली ! सुदैवाने 25 प्रवासी बचावले

st

जालना – चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने 25 प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस पाण्यात कोसळल्याची घटना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील श्रीष्टी गावाजवळील कसुरा नदी वर काल रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली. ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेऊन बसमधील पंचवीस प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. परतूर तालुक्यात दोन ते तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे नदी-नाल्यांना पूर आलेला आहे. … Read more

धक्कादायक ! प्रियकराच्या मदतीने आईनेच केला पोटच्या मुलाचा खून

Murder

जालना – कुठलीही आई हि आपल्या मुलांचे पालनपोषण संगोपन करते परंतु जालना जिह्यात एका आईने आई-मुलाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारे कृत्य केले आहे. प्रेमामध्ये आडकाठी ठरत असलेल्या आपल्या सहा वर्षांच्या मुलाचा जन्मदात्या आईनेच प्रियकराच्या मदतीने खून केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री उघड झाली. पोलिसांना रात्री घनसावंगी फाट्यावर मुलाचा मृतदेह हस्तगत केला आहे. या घटनेमुळे जालना … Read more