कृष्णा बँक सुवर्णमहोत्सव सांगता : केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, ना. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी सोहळा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शेतकऱ्यांची हक्काची बँक अशी ओळख असलेल्या कृष्णा सहकारी बँकेने नोव्हेंबर 2020 मध्ये 50 व्या सुवर्णमहोत्सवी वर्षात यशस्वी पदार्पण केले होते. या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा रविवार दि. 5 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे … Read more

एड्सबाबत प्रबोधन काळाजी गरज : पितांबर ठोंबरे

कराड | एच. आय. व्ही. हा विषाणू धोकादायक आहे. यापासूनच एड्स रोगाची वाढ जगभरात झालेली आहे. इतर रोगाप्रमाणे हाही एक रोग असून त्यामुळे मानसिक सामाजिक समस्या निर्माण झाल्या. हा रोग होऊ नये याची काळजी प्रत्येक नागरिकांनी घेतली पाहिजे. शरीराला पोखरून टाकणारा हा रोग आज औषधोपचार व समुपदेशनाने बरा होऊ शकतो. एड्स बाबतचे प्रबोधन समाजातील आपण … Read more

फस्ट डिसेंबर वाहतूक कोंडीचा : कराडच्या कृष्णा पूलावर दोन तासापासून वाहन चालक अडकले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरातून महाविद्यालय परिसरात जाणाऱ्या कृष्णा पुलावर वाहतूक कोंडी झाली आहे. जवळपासू गेल्या दोन तासांपासून ही वाहतूक कोंडी झालेली असून दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. सकाळी झालेल्या वाहतूक कोंडीमुळे रहिवाशी नागरिकांच्यासह वाहन चालक त्रस्त झालेले होते. त्यामुळे फस्ट डिसेंबर वाहतूक कोडींचा ठरलेला पहायला मिळाला. आज बुधवारी दि. … Read more

पुन्हा येणकेत बिबट्या : एका बिबट्यास जेरबंद करताच दुसऱ्याच्या दर्शनाने लोकांच्यात घबराट

Leopard

कराड : तालुक्यातील येणके येथे शनिवार दिनांक 27 रोजी सकाळी 7.30 वाजता वन विभागाने एका बिबट्यास सापळ्यात जेरबंद करून ताब्यात घेतले आहे. तर त्यानंतर अवघ्या तासाभरात 8.30 वाजता याच गावात पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने लोकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वन विभागाने या गावात असणाऱ्या बिबट्याचा शोध घेण्याची मागणी ग्रामस्थांच्यातून केली आहे. येणके येथे … Read more

सहकार पॅनलमधून ऋतुजा पाटील, कांचन साळुंखे विजयी

सातारा : जिल्हा बँक निवडणुकीत सत्ताधारी सहकार पॅनलमधून वाठार (ता. कराड) येथील ऋतुजा राजेश पाटील यांनी विजय मिळवला आहे. तर त्यांच्यासोबत कांचन साळुंखे यांनीही विजय मिळवला आहे. ऋतुजा पाटील यांना १४४५ मते मिळाली आहेत तर कांचन साळुंखे यांना १२९२ मते मिळाली आहेत. सातारा जिल्हा बँकेत निवडणुकीच्या रिंगणात सत्ताधारी सहकार गटातून ऋतुजा पाटील आणि गेल्या टर्ममध्ये … Read more

भाजप -राष्ट्रवादीची गठ्ठी, उंडाळकरांची इठ्ठी : सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी

सातारा | जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी भाजपच्या डॉ. भोसले गटाच्या साथीने अखेर कराड सोसायटी गटातून विजय मिळवला आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी काँग्रेसचे अँड. उदयसिंह पाटील यांचा पराभव केला आहे. या विजयामुळे कराड तालुक्यात भाजप -राष्ट्रवादीची नवी युती उदयास आली आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना 74 तर अडवोकेट उदय … Read more

सातारा जिल्हा बँक निवडणूक : निकालाआधीच सहकारमंत्र्यांचा विजयी बॅनर; अतुल भोसलेंच्या फोटोने राजकीय वर्तुळात चर्चा

Satara DCC Election Result

कराड : राज्याचे लक्ष लागलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीच्या कराड सोसायटी गटात काल रविवारी शांततेत 100 टक्के मतदान झाले. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि अॅड. उदयसिंह पाटील यांच्यात कराड सोसायटी गटातून काटे की टक्कर पहायला मिळाली. मतदानाच्या दिवशी भाजप नेते अतुल भोसले यांनी बाळासाहेब पाटील यांना उघड पाठिंबा दिल्यामुळे उदयसिंह पाटील यांना तोटा सहन करावा … Read more

आर्किटेक्टला बेदम मारहाण; पं.स. सदस्यासह 10 जणांवर गुन्हा

Crime

कराड प्रतिनिधी । सकलेम मुलाणी आर्थिक कारणावरुन आर्किटेक्टसह अन्य दोघांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी पंचायत समिती सदस्यासह सुमारे दहाजणांवर कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत आर्किटेक्ट जितेंद्र पारसमल भंडारी (रा. कोयना कॉलनी, शनिवार पेठ, कराड ) यांनी फिर्याद दिली आहे. पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, मुकूंद पाटील, बाळासाहेब पाटील, राजू (सर्व रा. वारुंजी, … Read more

राज्यात जाणीवपूर्वक दंगे करणाऱ्या दंगलखोरांना सोडणार नाही : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्रातल्या अमरावती, नांदेड आणि मालेगाव परिसरात झालेली दंगली पोलिसांनी वेळेत नियंत्रणात आणलेल्या आहेत. येथे झालेल्या दंगली पूर्वनियोजित नसल्याचा निष्कर्ष कोणी काढला हे माहिती नाही. मात्र दंगेखोरांची ओळख पटलेली आहे. जाणिवपूर्वक दंगे करणाऱ्या दंगलखोरांना पोलिस सोडणार नाही, असा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला. कराड येथे ते पत्रकारांशी बोलत होते. शंभूराज … Read more

डॉ. कराडांच्या ‘त्या’ कृत्याचे मोदींनी केले कौतुक

karad

औरंगाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचे कौतुक केले आहे. विमान प्रवासादरम्यान रक्तदाब कमी झाल्यामुळे एक प्रवासी सीटवरुन खाली पडला होता. प्रोटोकाॅल बाजूला ठेवून कराड यांनी प्रवाशावर उपचार केले होते. त्या प्रवाशाचा जीव वाचवला. यामुळे मोदी यांनी कराड यांचे कौतुक केले आहे. मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, की माझे सहकारी डाॅ … Read more