मोदी सरकारने 130 कोटी जनतेला वाऱ्यावर सोडले; नाना पटोलेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारविरोधात आज शेतकऱयांनी भारत बंदची हाक देत आंदोलन केले. या आंदोलनास विविध पक्ष, संघटनांनी देखील पाठींबा दिला. यावेळी काँग्रेस पक्षानेहि या आंदोलनात सहभाग घेतला. अकोला येथील रॅलीदरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. “पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेलाचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत, परंतु मोदी सरकार जनतेच्या हिताचे … Read more

औरंगाबादेत साकारली नरेंद्र मोदी यांची 31 फुटाची इकोफ्रेंडली प्रतिमा

modi

औरंगाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सध्या देशभरात भाजप कार्यकर्त्यांकडून विविध प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत. 17 सप्टेंबर रोजी नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्त औरंगाबादमध्येही विविध कार्यक्रम अजूनही घेतले जात आहेत. या मालिकेत नुकताच आणखी एक आगळा वेगळा कार्यक्रम झाला. नरेंद्र मोदी यांची भव्य इकोफ्रेंडली प्रतिमा साकारण्यात आली आहे. ही प्रतिमा पाहण्यासाठी परिसरातील … Read more

उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रस्तावित हायस्पीड रेल्वे, तसेच नागपूर- मुंबई हायस्पीड रेल्वेबाबत हे पत्र लिहिलं आहे.  तसेच पुणे आणि औरंगाबाद दरम्यानही हायस्पीड मार्ग देखील असणे आवश्यक आहे. दरम्यान, या पत्रात दोन बुलेट ट्रेन्सचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांना दिला आहे. नागपूर-नाशिक-मुंबई ही … Read more

एका वर्षात पंतप्रधान मोदींची संपत्ती 22 लाख रुपयांनी वाढली, त्यांनी कुठे कुठे गुंतवणूक केली आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकूण संपत्ती 3.07 कोटी आहे. यामध्ये गेल्या वर्षी 2.85 कोटी रुपयांवरून 22 लाख रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. अधिकृत आकडेवारी आणि नवीन घोषणेनुसार, पीएम मोदींच्या संपत्तीत एका वर्षात 22 लाख रुपयांची वाढ झाली आहे. पंतप्रधान मोदींचीही अनेक मंत्र्यांप्रमाणे शेअर बाजारात कोणतीही गुंतवणूक नाही. पंतप्रधान मोदींना त्यांच्या अनेक मंत्र्यांप्रमाणे … Read more

पंतप्रधान मोदींचे ‘वर्क फ्रॉम प्लेन’; विमानातील या फोटोने वेधले जगाचे लक्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. मोदी पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून अमेरिकेसाठी रवाना झाले. यासाठी पाकिस्तान सरकारने परवानगी दिली होती. अफगाणिस्तानमधील परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे. दरम्यान, मोदींच्या विमानाने अमेरिकेच्या दिशेने उड्डाण केल्यानंतर मोदींनी एक फोटो ट्विट केला आहे. … Read more

मोदींनी 7 वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही हाच गुण आवडतो- प्रीतम मुंडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले असून, पंतप्रधान मोदी यांनी गेल्या ७ वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, हाच त्यांचा गुण मला जास्त आवडतो, असे म्हटले आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान प्रीतम मुंडे बोलत होत्या. प्रीतम मुंडे म्हणाल्या, “पंतप्रधान मोदी यांचा मला सगळ्यांत आवडणारा गुण म्हणजे​ … Read more

मोदींचा चेहरा नसेल तर भाजपमधील नाचरे मुखवटेही पराभूत होतील; शिवसेनेचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुजरात भाजपमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली असून मुख्यमंत्र्यांसहित अख्ख मंत्रिमंडळ बदलण्यात आलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या बदलावर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाष्य करत भाजपला जोरदार टोले लागवले आहेत. मोदींचा चेहरा नसेल तर भाजपमधील नाचरे मुखवटेही पराभूत होतील असा टोला शिवसेनेने लगावला आहे. मोदी हाच भारतीय जनता पक्षाचा … Read more

मोदींच्या वाढदिवशी ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ हॅशटॅग चर्चेत; काँग्रेसकडून आयडियाची अनोखी कल्पना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 71 वा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आजचा दिवस राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन विरोधकांनी केलं होतं. त्याचा परिणाम आज म्हणजेच मोदींच्या वाढदिवसानिमित्त दिसून येत असून #राष्ट्रीयबेरोजगारदिवस या हॅशटॅगवर दीड लाखांच्या आसपास ट्विट सकाळी आठ वाजेपर्यंत करण्यात आले आहेत. मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपाकडून २१ दिवसांचं सेवा … Read more

नरेंद्र मोदींच्या तोडीचा नेता देशात नाही; संजय राऊतांकडून तोंडभरून कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 71 वा वाढदिवस आहे. देशभरातून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा येत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला. नरेंद्र मोदींच्या तोडीचा नेता देशात नाही अशाशब्दांत त्यांनी पंतप्रधानांवर स्तुतीसुमने उधळली. नरेंद्र मोदी हे देशाचे मोठे नेते असून ते अनेक … Read more

21 दिवस चालणार मोदींच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन; भाजप राबवणार सेवा आणि समर्पण अभियान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 71 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने भाजपने जोरदार तयारी केली असून तब्बल 21 दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. या अभियानाला सेवा आणि समर्पणाचं नाव देण्यात आलं असून 7 ऑक्टोबर रोजी याची सांगता होणार आहे. भाजपनं यासाठी चार सदस्यीय समिती तयार केली आहे. ही समिती पक्षाच्या … Read more