पाकिस्तानकडून गझनवी क्षेपणास्त्राची चाचणी

टीम, HELLO महाराष्ट्र | पाकिस्तानने आज सकाळी गझनवी क्षेपणास्त्राची चाचणी केली. २९० किलोमीटरपर्यंत या क्षेपणास्त्राची मारक क्षमता आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी हे क्षेपणास्त्र विकसित करणाऱ्या टीमचे अभिनंदन केले आहे. गझनवी क्षेपणास्त्राच्या चाचणीमागे भारतावर दबाव टाकण्याचा तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून घेण्याच्या पाकिस्तानचा हेतू असू शकतो. या क्षेपणास्त्र चाचणीसाठी पाकिस्तानने कराची शहरातील हवाई क्षेत्राचा … Read more

तर भारताने समुद्री मार्ग बंद करावा – सुब्रमण्यम स्वामी

 टीम, HELLO महाराष्ट्र | पाकिस्तानने कराची हवाई क्षेत्रातील तिन्ही मार्गांवरुन सर्वप्रकारच्या आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीस बंदी घातल्यानंतर राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी पाकिस्तान विरोधात कारवाई करण्याचा सल्ला केंद्र सरकारला दिला आहे. जर, पाकिस्तान भारतीय विमानांसाठी त्यांच्या हवाई क्षेत्रात बंदी घालू शकतं तर भारतानेही समुद्री मार्ग बंद करावा असं स्वामी म्हणाले आहेत.   भारतानेही अरबी समुद्रातून कराची बंदराकडे … Read more

म्हणून सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षेत केली वाढ

नागपूर प्रतिनिधी |  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. जम्मू कश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्या नंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मोहन भागवत हे राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाच्या राष्ट्रीय मुख्यालयात अर्थात रेशीम बाग या या ठिकाणी राहतात. त्यांच्या राहत्या ठिकाणी आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या अंगरक्षणांच्या संख्येमध्ये … Read more

म्हणून गाजला होता पाकिस्तानमध्ये तिरंगा चित्रपट

स्वातंत्र्य दिन विशेष २०१९ | नाना पाटेकरांच्या भूमिकेने अप्रतीम कलाकृतीला उतरलेला तिरंगा जा देशभक्तीपर चित्रपट आज देखील राष्ट्रीय सणाच्या दिवशी टेलिव्हिजनवर प्रदर्शित केलाजातो. देशातील राजकारण आणि देशांतर्गत असणारे देशाचे शत्रू त्यांचा विमोड करण्यासाठी सज्ज असणारी येथील प्रशासन यांची हकीकत सांगणारा तिरंगा चित्रपट आहे. मात्र हा चित्रपट भारत जेवढा गाजला तेवढाच पाकिस्तानचा सर्वच मोठा प्रदेश असणाऱ्या बलुचिस्तानमध्ये … Read more

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना मिळणार वीर चक्र सन्मान

नवी दिल्ली |  भारतीय हवाई दलाचे विग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना त्यांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल वीर चक्र पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बालाकोट येथे भारताने घडवलेल्या एअर स्ट्राईक मध्ये दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल अभिनंदन यांना हे वीर चक्र पदक दिले जाण्याची शक्यता आहे. बालाकोट येथे जैश-ए-महम्मदच्या लष्करी तळावर भारताच्या हवाई दलाने … Read more

कुलभूषण जाधव यांच्या खटल्यात पाकिस्तानच्या विरोधात भारत जिंकला

द हेग | कुलभूषण जाधव यांच्या फाशीला द हेगच्या अंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पाकिस्तानच्या काळ्या नीतीच्या विरोधात भारताने हा अत्यंत मोठा विजय मिळवला असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानी न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा हि सर्व नियम धाब्यावर बसवून सुनावलेली शिक्षा होती असे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने म्हणले आहे. व्हिएन्ना या आंतरराष्ट्रीय कराराचे उल्लंघन करून कुलभूषण जाधव यांना … Read more

हफीज सईदच्या अटकेवर उज्वल निकम म्हणतात

मुंबई प्रतिनिधी | २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हफीज सईदला आज पाकिस्तान मध्ये अटक झाली आहे. यावर जेष्ठ विधिज्ञ आणि महाराष्ट्राचे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी आपले मत व्यक्त केले आहे. हफीज सईदला अटक करणे हे पाकिस्तानचे ढोंग असू शकते त्यामुळे भारताने सावध राहण्याची गरज आहे असे उज्वल निकम म्हणाले आहेत. Ujjwal Nikam, … Read more

विश्वचषक २०१९ | भारत ठरला ‘१ नंबर’ ; या देशांत रंगणार सेमी फायनलचे सामने

लंडन |काल शनिवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभव पत्करावा लागल्याने भारत आता १५ गुणांसह प्रथम स्थानी जाऊन बसला आहे. तर १४ गुणांसह ऑट्रेलिया दुसऱ्या स्थानी आहे. भारताचा आणि चौथ्या स्थानी असणाऱ्या न्यूजीलंडसोबत सेमी फायनलचा सामना रंगणार आहे. तर २७ वर्षांनी विश्वचषकात सेमी फायनलला पोचलेल्या इंग्लंडसोबत ऑस्ट्रेलियाचा सामना होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या होम मिनिस्टर करणार भाजपचा प्रचार विश्वचषक सामने … Read more

पाण्याप्रमाणे पाकिस्तान सेमी फायनलसाठी देखील भारतावरच अवलंबून

लंडन | भारतात उगम पावून पाकिस्तानात जाणाऱ्या नद्या पाकिस्तानची तहान भागवतात. त्याच प्रमाणे पाकिस्तना या विश्वचषकाच्या खेळात भारतावरच अवलंबून असणार आहे. कारण भारताने काल वेस्ट इंडिज संघाला पराभूत करून सेमी फायनल मधील आपली जागा पक्की केली आहे. तर पाकिस्तान ७ गुणांसह साहाव्या स्थानावर आहे. अशा अवस्थेत भारताने जर इथून पुढचे सर्व सामने जिंकले तर पाकिस्तान सेमी … Read more

पाकिस्तानच्या लष्करी रुग्णालयात स्फोट ; दहशतवादी मसूद अजहर ठार!

रावळपिंडी | पाकिस्तानच्या लष्करी रुग्णालयात भीषण स्फोट झाला असून त्यात १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर मृतांचा आकडा अद्याप समोर आला नाही. आंतराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित झालेला आणि कर्करोगाने त्रस्त असलेला मसूद अजहर याच रुग्णालयात उपचार घेत होता. त्याचा देखील याच स्फोटात मृत्यू झाल्याचे बोलले जाते आहे. रावळपिंडी येथील लष्करी रुग्णालयात अचानक स्फोट झाला. या … Read more