22 वर्षीय तरून कार्यकर्त्याची पाकिस्तान मध्ये हत्या

आंतरराष्ट्रीय | 22 वर्षीय पाकिस्तानी ब्लॉगर, ISI आणि सैन्यावर टीका करणाऱ्या पत्रकाराची हत्या करण्यात आली.  त्याचे नाव मुहम्मद बिलाल खान असे होते. मुहम्मद बिलाल खान यांचे समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणावर चाहते होते. ट्वीटर वर सोळा हजार,फेसबुक वर बावीस मित्र आणि युटयूब वर अठ्ठेचाळीस हजार लोक त्यांना फोलो करत होते. शहरातून बाहेर निघून जाण्यासाठी त्याला एक फोन … Read more

भारत सरकार आता पाकिस्तानचे पाणी रोखणार

आंतरराष्ट्रीय| सिंधू, चिनाब आणि झेलम या भारतातून पाकिस्तानकडे वाहात जाणाऱ्या नद्यांचा प्रवाह यमुनेकडे वळविण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.काश्मिरात पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर झालेल्या भीषण हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही पावले उचलली जात आहेत, अशी माहिती केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. उत्तर प्रदेशात बागपत येथे एका कार्यक्रमात गडकरी बोलत होते. ते म्हणाले की या … Read more

टॉस जिंकून पाकिस्तान करणार प्रथम गोलंदाजी

मँचेस्टर | मागील काही दिवसापासून सुरु असणाऱ्या पाऊसाने काल विसावा घेतल्याने आज भारत पाकिस्तान सामना सुरु झाला आहे. पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत पाकिस्तान सामन्याची मोठी उत्कटता आज क्रिकेट रसिकांना पाहण्यास मिळणार असून भारतात संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या गोलंदाजीचा सामना करण्याचं … Read more

मोदींच्या शपथविधी पासून पाकिस्तानला ठेवले दूर

Untitled design

नवी दिल्ली | नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. या शपथविधीला बिम्सटेक (BIMSTEC) मधील सर्व नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. तर मोदींच्या शपथ विधी पासून पाकिस्तानला दूर ठेवण्यात आले आहे. २०१४ साली नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली होती. तेव्हा सार्क संघटनेतील सदस्य राष्ट्रांना शपथविधीसाठी बोलवण्यात आले होते. यावेळी मात्र … Read more

आमच्या सभ्यतेला आमची कमजोरी समजू नका – सचिन तेंडुलकरचा पाकिस्तानवर हल्लाबोल

मुंबई | भारतीय वायुसेनेने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यावर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. आमच्या सभ्यतेला आमची कमतरता समजू नका असे म्हणत सचिनने पाकिस्तानला सुनावले आहे. तसेच सचिन तेंडुलकर ने भारतीय वायुसेनेच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. आय सेल्युट द IAF असे ट्विट करुन सचिनने भारतीय वायुसेनेला सलाम केला आहे. Our niceness should never be … Read more

पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक एकमेव पर्याय नाही – लेफ्टनंट जनरल व्ही.जी.पाटणकर

lt genaral V. G. Patankar

पुणे प्रतिनिधी |अजय नेमाने  चौदा फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला चढवला आणि ३८ जवानांना आपला प्राण गमवावा लागला. त्यानंतर देशभरातून या घटनेचा निषेध व्यक्त होत असताना, पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकची मागणी होत आहे. त्यावर माजी लेफ्टनंट जनरल व्ही. जी. पाटणकर यांनी आज टिप्पणी केली. ते म्हणाले दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी ‘सर्जिकल स्ट्राईक’ हा एकमेव पर्याय नसून लष्करांकडे … Read more

भारताला पाक कडून ही धमकी ..

Untitled design

कराची | ‘पुरावे दिले तर आम्ही कारवाई करू, हल्ला केला तर प्रत्युत्तर देऊ’, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले.पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात भारतीय सैन्याचे ४० जावं शाहिद झाले. यानंतर पाकिस्तानवर जगभरातून टीका सुरु होती; यावर आज पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी प्रतिक्रिया दिली. भारत सरकार कोणत्याही पुराव्याविना पाकिस्तानवर आरोप करीत आहे.पाकिस्तान असे का करेल, आम्हाला याचा … Read more

व्हिएन्ना कराराच्या अटींवरून पाकिस्तानला अडचणीत आणण्याचा प्रयत्न

Untitled design

कुलभूषण जाधव यांच्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी सुरु……. हेग | पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यावर आंतराष्ट्रीय न्यालयात सुनावणी सुरु आहे. जेष्ठ वकील हरीश साळवे हे भारताच्या वतीने बाजू मांडत आहेत.पाकिस्तान जाधव यांना चुकीच्या पद्धतीने अडकवत आहे ते निर्दोष आहेत, असा युक्तिवाद साळवे यांनी केला. पाकिस्तानने जाधव यांच्या अधिकाराचे उल्लंघन केले आहे. … Read more

भारतीय सैन्यावर सर्वात मोठा अतिरेकी हल्ला, ४० जवान शहिद

pulvama attack

जम्मू वृत्तसंस्था | गुरुवारी दुपारी जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर अतेरिके आत्मघाती हल्ला करण्यात आला. सीआरपीएफ जवानांच्या गाड्यांचा ताफा जम्मूहून श्रीनगरला जात असताना हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ४३ जावंन शाहिद झाले आहेत. जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. उरी हल्ल्यानंतरच सर्वात मोठा असा हा हल्ला समजलाजातोय. शाहिद … Read more

पाकिस्तानात चीनी दूतावासाबाहेर गोळीबार, दोन ठार

Chinies Ambassy in Pakistan

कराची | पाकिस्तानमदील चीनी दूतावासाजवळ गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. कराचीतील क्लिफटन भागात काही लोकांनी चीनी दूतावासाजवळ गोळ्यांचा आवाज ऐकला. या हल्ल्यात दोन सुरक्षा कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दूतावासाजवळ उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचा-यांनी उत्तरादाखल हल्लेखोरांवर गोळ्या झाडल्या आहेत. सांगितले जात आहे की, दूतावासातील सर्व लोक सुरक्षित आहेत. दूतावासाजवळ राहत असलेल्या स्थानिक लोकांनी तेथील वृत्तवाहिन्यांना … Read more