मुसेवाला प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्शन; पुण्यातून 2 शार्प शुटर्सला अटक

Sidhu Moose Wala Case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वी पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला याची हत्त्या करण्यात आली. या हत्येनंतर पोलिसांकडून त्यांच्या आरोपींचा शोध घेतला जात होता. दरम्यान या हत्या प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्शन समोर आले आहे. पंजाबच्या मन्सा जिल्ह्यात 29 मे 2022 रोजी झालेल्या हल्ल्यामध्ये मुसेवालांचा मृत्यू झाला. मुसेवालांवर गोळ्या झाडणाऱ्या आठ जणांपैकी दोघे जण पुण्याचे … Read more

चार शस्त्रधारी चोर एका महिलेला घाबरले, तिचा रुद्राअवतार पाहून पळतच सुटले

women fight with four armed

इंदापूर : हॅलो महाराष्ट्र – आपल्या कुटुंबावर आलेलं संकट एका महिलेने परिणामाची कसलीच चिंता न करता पळवून (women fight with four armed thieves) लावले आहे. हि घटना पुण्यतील इंदापूर शहरात घडली आहे. विशेष म्हणजे हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. इंदापूर शहरातील पुणे-सोलापूर हायवे लगत असणाऱ्या काझी फर्निचर शेजारी सादिक … Read more

दुर्दैवी ! इंद्रायणी नदीत पाण्यात बुडून माय-लेकांचा मृत्यू

Pune Crime

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये नदी पात्रात बुडत (drawn) असलेल्या मुलाला वाचवण्यासाठी आईने पाण्यात उडी घेतली मात्र यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने माय-लेकरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मावळमधील कामशेत येथील नायगाव या ठिकाणी हि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त … Read more

शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात

Tanaji Sawant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे माजी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात झाला आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला असून पुणे-सोलापूर महामार्गावर हि घटना घडली. सुदैवाने या अपघातात तानाजी सावंत यांच्यासह कुणालाही दुखापत झालेली नाही. याबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत हे दोन दिवस आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर … Read more

राजेश टोपेची माहिती : कोरोनाबाबत केंद्राचे राज्याला “नवे” निर्देश

Rajesh Tope

पुणे | राज्यात काही ठराविक जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या वाढली आहे. आता कोरोना रूग्णसंख्येत वाढ होवू लागली, त्यामुळे केंद्राने एक पत्र दिले आहे. त्यानुसार महाराष्ट्र सरकारकडून मास्क वापरण्याचे आवाहन करत असून सक्ती नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. पुणे येथे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, राज्यातील ठाणे, पुणे, मुंबई, पालघर … Read more

बुद्धिबळाचा पट आमच्याकडे, देशी खेळात शिवसेनेसारखा पटाईत पक्षही नाही ; संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. या दरम्यान शिवसेना नेते संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला. राज्यसभेच्या निवडणुकीत घोडे कितीही उधळू द्या, मात्र जिंकणारआम्हीच आहोत, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी देवेंद्र फडवीसांच्या बुद्धिबळाच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली. “बुद्धिबळाचा पट आमच्याकडे सुद्धा आहेत. आणि देशी खेळात शिवसेनेसारखा पटाईत पक्षही नाही. … Read more

2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमची चाल चुकल्याने पराभव ; देवेंद्र फडणवीसांचे विधान

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या अनेक कारणांनी राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काल बैलगाडी शर्यतीच्या कार्यक्रमातून विरोधीपक्षनेते देवदेन्द्र फडणवीस यांनी महा विकास आघाडी सरकारला इशारा दिल्यानंतर आज त्यांनी बुद्धिबळाच्या स्पर्धेवेळी एक सूचक असे विधान केले. “बुद्धिबळाच्या चालीप्रमाणेच राजकारणातही दक्ष राहावे लागते. आम्ही सुद्धा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमची चाल चुकल्याने पराभूत झालो, असे फडणवीस … Read more

एकविरेला चाललेल्या कारने बोरघाटात घेतला पेट, व्हिडिओ आला समोर

Burn Car

पुणे : हॅलो महाराष्ट्र – मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटात एका अवघड चढणीच्या वळणावर एक निसान टेरेनो या कारने (car burn) अचानक पेट घेतला. या कारमध्ये एकाच परिवारातील सात महिला होत्या. या महिला वेळीच खाली उतरल्याने त्यांचा जीव वाचला आहे. पनवेल येथील विचुंबे या गावाहून हा परिवार कार्ल्याच्या एकविरा मातेचे दर्शन करण्यासाठी निघाला होता. या कारमध्ये … Read more

नॉनव्हेज खाल्ल्याने मंदिरात जाणे माझ्या बुद्धीला पटत नाही; पवारांनी बाहेरुनच घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन

sharad pawar dagdusheth halvai ganpati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दुपारी तीन वाजता पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. मात्र, त्यांनी गणपतीच्या मंदिरात न जाता बाहेरूनच गणपतीला दोन्ही हात जोडून गणपतीला प्रणाम केला. यामागचे कारण म्हणजे त्यांनी आज नॉनव्हेज खाल्ले असल्याने त्यांनी मंदिरात जाणे टाळले. पवार यांच्या या प्रकाराची चर्चा मात्र सोशल मीडियावर चांगलीच … Read more

शरद पवार आज पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे घेणार दर्शन

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांवरील कारवाई आणि भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. त्यामुळे राज्यातही राजकारण चांगलेच तापले आहे. अशात दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज दुपारी तीन वाजता पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेणार आहेत. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे ही उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more