श्रमिकांच्या घरवापसीसाठी पुणे विभागातून उद्या एकाच दिवशी ७ ट्रेन रवाना होणार

पुणे । लॉकडाऊनमुळे विविध राज्यांमधून मजुरांनी आपापल्या गावची वाट धरली असून पुण्यातून उद्या एकाच दिवशी सात श्रमिक विशेष गाड्या रवाना होणार आहेत. जिल्हा प्रशासनाने या गाड्यांपर्यंत मजुरांना आणण्याची चोख व्यवस्था केली आहे. लॉकडाऊनमुळे पुणे विभागातील ५ जिल्ह्यांमध्ये अडकलेल्या ३५ हजार १६३ श्रमिकांना २८ रेल्वे गाड्यांतून आपापल्या मूळ गावी पाठविण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. १५) आणखी … Read more

गुड न्यूज ! ‘कोरोना अँटिबॉडीचा’ शोध लावणारी पहिली टेस्ट किट पुण्यात तयार

पुणे | गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून भारत कोरोना व्हायरस या विषाणूजन्य आजाराशी दोन हात करत आहे. मात्र कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अस असताना एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीने पहिली स्वदेशी कोरोना अँटिबॉडी किट तयार केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली आहे. … Read more

पुण्यातील रिक्षाचालकांच्या मदतीसाठी ‘युवा स्पंदन’चा पुढाकार

पुण्यातील रिक्षाचालकांच्या मदतीसाठी युवा स्पंदनने पुढाकार घेतला आहे.

कर्वे समाज संस्थेतर्फे मजुरांसाठी समुपदेशन

लेबर रिलीफ कॅम्पमध्ये लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या कामगार व मजुरांना मानसिक आधार देण्यासाठी मानसिक समुपदेशन कार्यक्रम सुरु करण्यात आला असून याचा लाभ सुमारे तीन हजार मजुरांना होणार असल्याची माहिती कर्वे समाज सेवा संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकर पाठक व प्रभारी संचालक डॉ महेश ठाकूर यांनी दिली.

मुक्तांगण बंद होईल का ?

विचार तर कराल | मुक्ता पुणतांबेकर पु. ल. देशपांडे यांच्या आर्थिक मदतीतून १९८६ साली माझे आई – बाबा डॉ. अनिता अवचट व डॉ. अनिल अवचट यांनी मुक्तांगण ची स्थापना केली. त्यावेळी उद्घाटनाच्या भाषणात पु. ल. म्हणाले होते, ” आज मी एका व्यसनमुक्ती केंद्राचे उद्घाटन करतोय या केंद्राची भरभराट होऊ दे, अशा शुभेच्छा मी तुम्हाला देणार … Read more

रेड झोनमधील मद्यपींसाठी खुशखबर! कंटेन्मेंट क्षेत्र वगळता दारूची दुकानं खुली होणार?

मुंबई । लॉकडाऊनच्या काळात रेड झोनमध्ये कन्टेंन्मेट क्षेत्र वगळता उर्वरित भागांत स्वतंत्र दुकानांसह दारुची दुकानंही खुली होणार आहेत. राज्य सरकारनं यासंबंधी निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळं मद्यप्रेमींना दिलासा मिळाला आहे. एएन आय या वृत्तसंस्थेने यासंबंधी वृत्त दिले आहे. Maharashtra government has decided to allow standalone shops including liquor shops to open in Red … Read more

पुणे जिल्ह्यातून गावी जाण्यासाठी ‘पास’ पाहिजे? येथे करा संपर्क

पुणे । लाॅकडाऊन कालावधीत बेघर, विस्थापित कामगार, परराज्यातील अडकलेले कामगार, पर्यटक, विद्यार्थी यांना त्यांच्या मुळगावी पाठविणेबाबत आदेश आदेश जारी करण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग मंत्रालयकडून काल ३० एप्रिलला याबाबतचा आदेश दिले आहेत. सदर आदेशानुसार परराज्यातील स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या मुळ गावी जाण्याची इच्छा असल्यास महाराष्ट्र शासनाने आवश्यक त्या उपाय योजना करुन कामगारांना मुळ … Read more

इन्फोसिसच्या अभियंत्याची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

पिंपरी चिंचवड । देशात सर्वत्र लॉकडाउन असून अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम च्या सूचना दिल्या आहेत. मात्र घरात बसून बसून अनेक जण नैराश्यात जात आहेत. पुण्यातील वाकड येथील एका अभियंत्याने अशातूनच इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. वाकड परिसरात आयटी अभियंत्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सदरील घटना मंगळवारी दुपारी २ … Read more

अजित पवारांचे रेल्वे मंत्र्यांना पत्र, मजूरांना घरी जाण्यासाठी पुणे-मुंबईहून विशेष गाड्या सोडा

मुंबई | सध्या देशात सर्वत्र लाॅकडाउन आहे. पंतप्रधान मोदींनी देशातील लाॅकडाउनचा काळ ३ मे पर्यंत वाढवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र यामुळे पुणे, मुंबई सारख्या शहरांत कामानिमित्त स्थलांतरित मजूरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. हाताला काम नसल्याने खिशार पैसे नाहीत आणि पैसे नसल्याने आता खायचं काय अन् रहायचं कुठे असा प्रश्न या मजूरांच्या समोर उभा ठाकला आहे. … Read more

कोरोनात मदतकार्य करणार्‍यांचा गुणाकार करण्यासाठी पुण्यातील तरुणांची भन्नाट आयडिया | रिलीफ पुणे

पुणे | जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलेलं असताना हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना या सर्व परिस्थितीत अनेक आव्हांनाना तोंड द्यावे लागत आहे. हीच परिस्थिती लक्षात घेऊन पुण्यात तरुण इंजिनिअर्स आणि डॉक्टर्सने पुढाकार घेतला आहे. एकिकडे कोरोना विषाणू संसर्गाचा गुणाकार करण्याचा प्रयत्न करत असताना हे तरुण गरिब कुटुंबांसाठी मदतीचा आणि प्रेमाचा गुणाकार करत आहेत. या कुटुंबांना जीवनावश्यक … Read more