‘नितीश कुमारांसोबत घात झालाय तेव्हा…’ बिहार निकालानंतर रोहित पवारांचे सूतोवाच

मुंबई । बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर  राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. बिहारच्या निवडणुकीत बलाढ्य शक्तींना एकाकी झुंज देणाऱ्या तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाचं अनेकजण कौतुक करत आहेत. बिहारच्या निकालावर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनीही भाष्य केलं आहे. यात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी तेजस्वी यादव यांचं कौतुक करत भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. या निकालावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more

… तेव्हा भाजप नेत्यांना ‘आणीबाणी’ आठवली नाही; रोहित पवारांचा पलटवार

मुंबई । भाजपलाच आता ‘आणीबाणी’ची आठवण झाली आहे, याचे आश्चर्य वाटते. यांचे सरकार होते त्यावेळी सरकारविरोधात लिहिले, त्यांना अटक केली. तेव्हा गळचेपी झालेली नाही. भाजप सरकारविरोधी लिहिणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केले गेले. त्यावेळी भाजपला ‘आणीबाणी’ आठवली नाही, असा जोरदार टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे. सरकारविरोधात लिहिले, बोलले म्हणून द वायर, … Read more

मुंबई लोकल वरून रोहित पवारांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यावर साधला निशाणा ; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई लोकल वरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात सुरू असलेल्या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी उडी घेतली आहे. रोहित पवार यांनी मुंबईतील लोकल सुरू करण्याच्या मुद्द्यावरुन थेट केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यावर निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी लोकल सुरु करण्यासंदर्भात पियुष गोयल यांना … Read more

‘पंकजा चांगले काम करतेय’; कौतुकाच्या ट्विटवर शरद पवारांचा स्ट्रेट ड्राईव्ह, तर्कवितर्कांना उधाण

नाशिक । पुण्यात राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक मंगळवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक पार पडली. या बैठकीला पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि शरद पवार होते. या बैठकीत शरद पवारांच्या उपस्थितीत यशस्वी तोडगा काढत कामगारांना १४ टक्क्यांची दरवाढ देण्याचा निर्णय झाला. या बैठकीनंतर पंकजा यांनी एक ट्विट केले. यामध्ये त्यांनी … Read more

.. म्हणून रोहित पवारांनी केलं पंकजा मुंडेंचं जाहीर कौतुक; चर्चा तर होणारचं

मुंबई । राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे मंगळवारी बैठक पार पडली. शरद पवारांच्या उपस्थितीत ऊसतोड कामगारांच्या दरवाढीच्या मागणीबाबत या बैठकीत एकमताने तोडगा काढण्यात आला. या बैठकीत भाजपा नेत्या पंकजा मुंडेही उपस्थित होत्या. यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विट करत शरद पवारांना सलाम केला होता. त्यांच्या या ट्विटवर … Read more

विजयाच्या वर्षपूर्तीनिमित्त रोहित पवारांनी कामाचं ‘रिपोर्ट कार्ड’ केलं सादर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्जत जामखेड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा तडफदार नेते रोहित पवार यांच्या प्रथम विधानसभा विजयाला आज 1 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने  आमदार रोहित पवार यांनी एका वर्षात केलेल्या कामाचं रिपोर्टकार्ड कर्जत जामखेडकरांसमोर ठेवलं आहे. “कर्जत-जामखेडवासियांनी प्रचंड विश्वासाने माझ्या अंगावर विजयाचा गुलाल टाकला, या घटनेला आज बरोबर एक वर्ष पूर्ण होतंय. … Read more

एकनाथ खडसे सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार, म्हणून राष्ट्रवादीने त्यांना फोडले – राम शिंदेंचा दावा

Ram Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर जोरदार टीका केली. एकनाथ खडसे सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार असल्यानेच त्यांना राष्ट्रवादीने फोडलं, असा गंभीर आरोप राम शिंदे यांनी केला आहे. अहमदनगरला कर्जत इथे ते पत्रकारांशी बोलत होते.या दरम्यान त्यांनी हे विधान केलं आहे. 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी सध्या … Read more

‘WelCome खडसे साहेब!’ म्हणतं रोहित पवारांनी केलं ‘हे’ सूचक वक्तव्य

मुंबई । भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहे. एकीकडे भाजपचे नेते सावधपणे प्रतिक्रिया देत असताना महाविकासआघाडीतील सर्व नेत्यांनी एकनाथ खडसेंच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. या सगळ्यात शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया अनेकांचे लक्ष वेधून … Read more

रोहित पवार अज्ञानी, त्यांनी आधी माहिती घ्यावी व मग बोलावं – भाजपची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात परतीच्या पावसाने अतिवृष्टी आली असून शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी राज्यातील मंत्री थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन देत आहेत. शेतकऱ्यांच्या मदतीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होत असून त्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदतीसाठी केंद्राने मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली होती. त्यावरून भाजपचे माजी मंत्री … Read more

दुःख वाटून घेण्याची आपली संस्कृती; केंद्राने जीएसटीचे राज्याचे थकीत २८ हजार कोटी रूपये तातडीने द्यावे – रोहित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. शेतकरी संकटात असून शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे. आर्थिक समस्येनं ग्रासलेल्या शेतकऱ्याला तातडीनं मदत करण्याची मागणी होत आहे. याच मुद्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोदी सरकारला जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. शेतकऱ्यांना मदतीचा मुद्द्यावरुन … Read more