महाराष्ट्रात ठाकरे-पवार पॅटर्नचाच बोलबाला – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडीबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुणे येथे महत्वपूर्ण विधान केले. यावेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. महाराष्ट्रात आतापर्यंत अनेक पॅटर्न होऊन गेले असले तरी सध्या महाराष्ट्रात ठाकरे-पवार पॅटर्नचाच बोलबाला आहे. ठाकरे व पवार हे एकत्र आले तर काय होऊ शकते हे महाराष्ट्राने पाहिले आहे, असे महत्वपूर्ण विधान शिवसेना खासदार … Read more

सीमेवर तणाव, रक्तपात वाढला असताना सरकार मात्र मस्त आणि सुस्त; संजय राऊतांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कश्मीर खोऱ्यांतील पूंछमध्ये अतिरेक्यांशी लढताना पाच जवान शहीद झाल्याची घटना घडली आहे. या घटनेवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. भारताच्या सीमांवर अशांतता आहे. एका बाजूला चीन तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानची शिरजोरी सुरूच आहे. पण सरकार मस्त किंवा सुस्त आहे,अशी टीका राऊत यांनी केली आहे. खासदार संजय … Read more

लखीमपूरचा हिंसाचार यूपी सरकार पुरस्कृतच; राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी सरकारच्यावतीने आज महाराष्ट्र बंद आंदोलन केले. या बंदवरून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. त्यांच्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “लखीमपूरचा हिंसाचार यूपी सरकार पुरस्कृतच होते. शिवसेना ज्या बंदमध्ये सहभागी असते तो बंद लादावा लागत नाही, … Read more

..तर भाजप कार्यकर्तेही गप्प बसणार नाहीत; नितेश राणेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ आज ‘महाराष्ट्र बंद’ पुकारण्यात आलेला आहे. या बंदमध्ये व्यपाऱयांनीही सहभागी व्हावे असे आवाहन महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आलेले आहे. मात्र, या बंद विरोधात भाजप नेते नितेश राणे यांनी दंड थोपटले आहे. भाजप कार्यकर्ते तसेच व्यापाऱ्याना बंदमध्ये सहभागी होण्यासाठी जबरदस्ती केल्यास भाजप कार्यकर्ते गप्प बसणार … Read more

भाजप आणि मोदी सरकारच्या मग्रुरीविरोधात बंद; प्रणिती शिंदेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ आज ‘महाराष्ट्र बंद’ पुकारण्यात आलेला आहे. या बंदमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाली आहे. याबाबत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. “भाजप सरकार देशातील लोकांचा अंत पाहत आहे. आजचा हा बंद हा भाजप आणि मोदी सरकारच्या मग्रुरीविरोधात  पुकारण्यात आलेला आहे. … Read more

बंद मोडून काढण्याची भाषा करणारे मूर्ख ; संजय राऊतांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने आज ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. या बंदमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाली आहे. याबाबात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. “बंद मोडून काढण्याची भाषा करणारे मूर्ख आहे. देशातील शेतकऱ्यांची लढाई महारासहत्र लढतो आहे, असे राऊत यांनी म्हंटले आहे. महाराष्ट्र … Read more

लांबलांब जीभा काढून बडबड करण्याची काही लोकांना सवय लागलीय; मुख्यमंत्री ठाकरेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ठाणे येथील एका कार्यक्रम प्रसंगी भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. “हल्लीच्या काळात राजकारण केले जात आहे. मात्र आजच्या राजकारणात नवी कीड लागली आहे. लांबलांब जीभा काढून बडबड करण्याची काही लोकांना सवय लागली आहे, असा टोला मुख्यमंत्री ठाकरे … Read more

तर मग शिवसैनिक गद्दारांचा मुडदा पाडल्याशिवाय राहणार नाही; अब्दुल सत्तारांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देगलूर विधानसभा पोटनिवडणुक लागली असल्याने त्याचा जोरदार प्रचार सुरु आहे. या प्रचारावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विरोधकांना इशारा दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाषा आणि बंदुकीची गोळी एक सारखीच आहे. उद्धवजींचा आदेश आला की शिवसैनिक शांत बसणार नाही. पोटनिवडणुकीत शिवसैनिक गद्दारांचा मुडदा पाडल्याशिवाय राहणार नाही, असे सत्तार यांनी म्हंटले आहे देगलूर … Read more

शिवसेनेने आघाडीसोबत जाणे म्हणजे राजकीय आत्महत्याच; मुनगंटीवाची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकत्याच जिल्हा परिषदा व पंचायत समितींच्या पोट निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष पहायला मिळाले. दरम्यान आज भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आघाडी सरकार घणाघाती टीका केली आहे. “काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत केलेल्या आघाडीचा शिवसेनेला पश्चात्ताप होणार आहे. शिवसेनेने आघाडी सोबत जाणे म्हणजे … Read more

अकोल्यात ‘वंचित’च्या उमेदवारांनी मारली बाजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी मोठी लढत होत असताना अकोला जिल्हा परिषद पोट निवडणुकीत वंचीत बहुजन आघाडीने आपली सत्ता अबाधित ठेवली आहे. या ठिकाणी वंचित बहुजनच्या 6 जागा निवडून आल्या आहेत तर राष्ट्रवादीच्या 2 आणि शिवसेना व भाजपला 1 जागेवर समाधान मानावे लागले आहे. … Read more