ग्रामीण भागात ‘आनंदाचा शिधा’ पोचलाच नाही; सरकारकडून गरिबांची चेष्टा??

eknath shinde anandacha shidha

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी दिवाळीनिमित्त राज्य सरकारने अंत्योदय आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानांतून शंभर रुपयांत रवा, साखर, तेल, चणाडाळीचे किट देण्याचा निर्णय घेतला. मात्र आता दिवाळी उद्यावर येऊन ठेपली असतानाही अद्यापही अनेक गरजूना याचा लाभ मिळालेला नाही. कराड तालुक्यातील एकूण 55213 लाभार्थ्यांपैकी फक्त कराड शहरातील १० हजार लाभार्थ्यांना सरकारच्या दिवाळी आनंदाचा शिधा किटचा लाभ … Read more

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्या; रोहित पवारांची सरकारकडे मागणी

rohit pawar fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या काही दिवसांपासून धुवाधार पाऊस पडत असून शेतकऱ्यांच काढणीला आलेले पीक मातीमोल झालं आहे. हातातोंडाचा घास गेल्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला असून आर्थिक संकटात सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत म्हंटल की, … Read more

समृद्धी महामार्गानंतर सरकार आणखी 2 महामार्ग सुरु करण्याच्या तयारीत; कोणती शहरे जोडणार?

samruddhi mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१४ च्या फडणवीस सरकारच्या काळातील महत्त्वाकांशी प्रकल्प असलेला मुंबई -नागपूर समृद्धी महामार्ग उदघाटनासाठी सज्ज असतानाच आता राज्य सरकार आणखी २ महामार्ग बनवण्याच्या तयारीत आहे. पुणे ते नाशिक आणि गोवा ते नागपूर असे २ नवे महामार्ग सुरु करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. २५० किमीचा पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती मार्ग आणि 760 किमी नागपूर-गोवा शक्तीपीठ … Read more

शेतकऱ्यांना खुशखबर!! 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान 15 दिवसांत मिळणार

Paddy Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान पुढील १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. राज्यातील २८ लाख शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळेल. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने दोन लाखांची कर्जमाफी दिली. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान जाहीर केलं होत. २०१७-१८ … Read more

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदान सप्टेंबरपासून; मुख्यमंत्र्यांची माहिती

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50000/- प्रोत्साहन अनुदान वाटप सप्टेंबर महिन्यात सुरू केले जाईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच राज्यातील पूरग्रस्तांना 15 हजारांची तात्काळ मदत करणार अस आश्वासनही एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिले. ● नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५०,०००/- (रुपये पन्नास हजार मात्र) प्रोत्साहन अनुदान वाटप सप्टेंबर महिन्यात सुरू … Read more

नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून; विधानसभेत विधेयक मंजूर

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नगराध्यक्ष निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने घेतला आहे. त्यासंदर्भातील विधेयक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मंजूर करून घेतले. तसेच जनतेचं मत जाणूनच आम्ही हा निर्णय घेतला आहे असंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. या विधेकाला विरोधकांनी कडाडून विरोध केला. मात्र, सरपंच आणि नगराध्यक्ष यांची निवड जनतेतूनच व्हावी … Read more

मग मुख्यमंत्रीही जनतेतूनच निवडा; अजितदादांचा सरकारवर निशाणा

ajit pawar shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे- फडणवीस सरकारने नगराध्यक्ष आणि सरपंच निवड थेट जनतेतून होणार असल्याचा निर्णय घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. नगराध्यक्ष आणि सरपंच निवड ही थेट जनतेतून होणार असेल तर मुख्यमंत्र्यांची निवडही थेट जनतेतून का करत नाही ? असा थेट सवाल त्यांनी सभागृहात केला. तसेच या … Read more

राज्यातील ‘या’ नागरिकांना एसटी प्रवास मोफत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जेष्ठ नागरिकांना खुशखबर दिली आहे. वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस मधून मोफत प्रवास करता येईल,अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे . त्यामुळे वयोवृद्ध नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ज्या नागरिकांनी आपली वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत, … Read more

शिंदे गटाच्या नशिबात फक्त झाडी, डोंगर आणि हॉटेल; नाना पटोलेंचा टोला

eknath shinde nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे- फडणवीस सरकारने आज आपले मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर केले. खातेवाटपावर एकूण नजर फिरवली तर या संपूर्ण मंत्रिमंडळावर भाजप आणि खास करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच वरचष्मा दिसत आहे. अनेक महत्त्वाची खाती भाजपकडे असल्याने याच मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. शिंदे गटाच्या … Read more

खातेवाटपात फडणवीसांचाच बोलबाला; गृह, अर्थसह 7 खात्यांचा कारभार पाहणार

fadanvis shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे- फडणवीस सरकारने आज आपले मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर केले. दोन्ही बाजूनी एकूण 18 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानुसार आज प्रत्येकाला वेगवेगळी खाती देण्यात आली आहेत. खातेवाटपावर एकूण नजर फिरवली तर या संपूर्ण मंत्रिमंडळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच बोलबाला दिसत आहे. नगरविकास खातं वगळता शिंदे गटाकडे विशेष … Read more