राज्यात दिवसभरात सापडले सर्वाधिक ३ हजार ८९० कोरोनाग्रस्त; २०८ जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | महाराष्ट्रामध्ये मागच्या २४ तासात सर्वाधिक म्हणजेच ३,८९० कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तर २०८ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यातले ७२ मृत्यू हे मागच्या ४८ तासातील आहेत, तर उरलेले १३६ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातला सध्याचा मृत्यूदर हा ४.७२ टक्के एवढा आहे.

मागच्या २४ तासांमध्ये ४,१६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ७३,७९२ कोरोना बाधित रुग्णांना सोडून देण्यात आलं आहे. यामुळे राज्यातले रुग्ण बरे व्हायचे प्रमाण ५१.६४ टक्के एवढे झाले आहे. तर राज्यातल्या एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १,४२,९०० एवढी आहे, तर ६२,३५४ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत.

राज्यात एकाच महिन्यात दहा दिवसांच्या अंतराने एकाच दिवशी ४१६१ एवढ्या विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. याआधी २९ मे रोजी एकाच दिवशी ८,३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. १५ जून रोजी ५,०७१ एवढे रुग्ण बरे होऊन एकाच घरी सोडण्यात आले. त्यानंतर आज ४ हजारपेक्षा जास्त रुग्णांना घरी सोडण्यात आलं.

आज सोडण्यात आलेल्या ४१६१ रुग्णांमध्ये मुंबई मंडळात ३५३० त्यापाठोपाठ पुणे मंडळात ३५५, नाशिक मंडळात १३९, औरंगाबाद मंडळ २१, कोल्हापूर मंडळ २४, लातूर मंडळ ७, अकोला मंडळ २६, नागपूर मंडळ ५९ रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.