हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या या संकटात सामान्य माणसाचे जीवन कठीण झाले आहे. त्याचबरोबर आता भाजीपाल्यांच्या किंमतीही वाढू लागल्या आहेत. टोमॅटोचे दर हे आता सर्वसामान्यांच्या खिशाला भारी झालेले आहेत. टोमॅटोची विक्री ही दिल्लीत 80 ते 100 रुपयांवर होती. ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान म्हणाले की,’ या हंगामात टोमॅटो खराब होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे त्यांची किंमतही वाढली आहे.’ पासवान म्हणाले की,’ कापणीची वेळ नसल्याने टोमॅटोचे दर हे जुलै ते सप्टेंबर या कालावधीत जास्त असतात. टोमॅटोच्या नाशवंत गुणवत्तेमुळे, त्याची किंमतीत अधिक चढउतार होते. ते म्हणाले की,’ पुरवठा सुधारल्यानंतर किंमती पुन्हा सामान्य होतील.’ एका महिन्यापूर्वी ते प्रति किलो प्रती 20 रुपयांना विकत होते.
भाजीपाला का महाग होतो आहे
पावसाळ्यात पावसाने दडी मारल्याने पिकं खराब होत आहे. त्याच वेळी लॉकडाऊन आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे खर्चही वाढलेला आहे. म्हणूनच टोमॅटोसह इतर भाज्यांचे दरही वाढले आहेत. हरियाणा आणि हिमाचलमध्ये टोमॅटोचे पीक ढासळले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्येही लॉकडाऊनने टोमॅटोचे दर वाढवले आहेत.
तर उत्तर प्रदेश, राजस्थान, झारखंड, पंजाब, तामिळनाडू, केरळ, जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश हे देशातील कमी टोमॅटोचे उत्पादन करणारी राज्ये आहेत. ते टोमॅटोच्या पुरवठ्यासाठी जास्तीत जास्त उत्पादन देणार्या राज्यांवर अवलंबून असतात. सरकारी आकडेवारीनुसार, देशात दरवर्षी सुमारे 97 लाख टन टोमॅटोचे उत्पादन होते, तर सुमारे 15 लाख टनांचा वापर होतो.
भाज्यांचे नवीन दर
काही दिवसांपूर्वी दिल्लीत टोमॅटो 10-15 रुपयांना विकला जात होता. त्याचबरोबर आता ते प्रति किलो 80-100 रुपयांवर गेले आहे. इतकेच नाही तर इतर हिरव्या भाज्या आणि बटाटेदेखील त्याच प्रमाणे सुरू झाले आहेत.
गुरूग्राम, गंगटोक, सिलीगुडी आणि रायपूर येथे टोमॅटो 70-90 रुपये प्रतिकिलो विकला जात आहे, तर गोरखपूर, कोटा आणि दिमापूरमध्ये प्रतिकिलो 80 रुपये दर आहे. आकडेवारीनुसार उत्पादन करणार्या राज्यांमध्येही हैदराबादमध्ये किंमत प्रति किलो 37 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये 40 रुपये किलो तर बेंगळुरूमध्ये 46 रुपये किलो.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.