अमेरिकेतील मिनियापोलिसमध्ये १० जणांवर गोळीबार: पोलिस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेच्या मिनियापोलिस शहरात आतापर्यन्त किमान 10 जणांना गोळ्या घालण्यात आल्या आहेत. रविवारी पोलिसांनी ही माहिती दिली. मिनियापोलिस पोलिसांनी रात्री उशीरा एक ट्वीट केले की, ज्या लोकांना 10 गोळ्या झाडण्यात आल्या होतत्या ते सर्वजण जिवंत आहेत आणि त्यांना “वेगवेगळ्या प्रमाणात गंभीर जखम झाल्या आहेत.”

मिनियापोलिसच्या पोलीसांनी ट्विट करताना लोकांना अपटाउन मिनियापोलिस या ठिकाणी जाऊ नका सल्ला दिला आहे. सोशल मीडियावर आलेल्या छायाचित्रांमध्ये एक थिएटर आणि एका दुकानाच्या खिडक्यांना गोळी लागताना दिसत आहे .

फेसबुकवर पोस्ट केलेल्या लाइव्ह व्हिडिओंमध्ये लोकांच्या ओरडन्याचे आवाज ऐकू येतायात. तसेच काही लोक फुटपाथवर पडलेल्या पीडितांच्या बाजूला जमा झालेले दिसतात. यानंतर पोलिस अधिकारी सायकलवर येताना दिसतात.

जखमींना स्थानिक रूग्णालयात नेल्यानंतर फुटपाथवर पडलेलं रक्त दिसू शकते. हा परिसर मिनियापोलिस व्यावसायिक क्षेत्राच्या पश्चिमेला पाच किलोमीटर अंतरावर आहे जिथे 25 मे रोजी मिनियापोलिस पोलिसांच्या ताब्यात असलेल्या जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर दंगली झालेल्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.