कोविड -१९ पासून बचावासाठी अमेरिका घेणार आयुर्वेदाची मदत, लवकरच होणार औषधांची चाचणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजितसिंग संधू म्हणाले की, कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी भारत आणि अमेरिकेतील आयुर्वेदिक चिकित्सक आणि संशोधक आयुर्वेदिक औषधांची संयुक्त क्लिनिकल ट्रायल सुरू करण्याचा विचार करीत आहेत. बुधवारी प्रख्यात भारतीय-अमेरिकन शास्त्रज्ञ, विद्वान आणि डॉक्टरांच्या टीमशी झालेल्या डिजिटल संवादात संधू म्हणाले की,’ संस्थात्मक सहभागाच्या व्यापक नेटवर्कमुळे कोविड -१९ विरुद्धच्या लढाईत या दोन्ही देशातील वैज्ञानिक समुदाय एकत्र आले आहेत.

ते म्हणाले, “आमच्या संस्था संयुक्त संशोधन, अध्यापन तसेच प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून आयुर्वेदाच्या प्रमोशनसाठी एकत्र आल्या आहेत. कोविड -१९ च्या विरूद्ध बचावासाठी आयुर्वेदिक चिकित्सक आणि या दोन्ही देशांचे संशोधक आयुर्वेदिक औषधांची संयुक्त क्लिनिकल ​​ट्रायल घेण्याची योजना आखत आहेत. आमचे वैज्ञानिक या आघाडीवर आपले ज्ञान तसेच संशोधन संसाधनांची देवाणघेवाण करतील. संधू म्हणाले, “भारतीय औषधी कंपन्या परवडणारी औषधे आणि लस तयार करण्यात अग्रेसर आहेत तसेच या साथीच्या आजाराविरूद्धच्या लढ्यात त्या एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.”

अमेरिकन राजदूताच्या मते, या अमेरिका-स्थित संस्थांशी भारतीय औषध कंपन्यांची किमान तीन भागीदारी आहेत. ते म्हणाले की, याचा केवळ भारत आणि अमेरिकेलाच फायदा होणार नाही तर जगभरातील कोट्यावधी लोकांना याचा फायदा होणार आहे ज्यांना कोविड -१९ पासून बचावासाठी लसींची आवश्यकता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.