सातारा जिल्ह्यात सापडले 46 नवीन कोरोनाग्रस्त; एकूण रुग्णसंख्या 1 हजार 601 वर

0
61
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

आरोग्य विभागाकडून काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील निकट सहवासित 41, सारीचे 2 आणि प्रवास करुन आलेले3 असे एकूण 46 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

कोरोना बाधित रुग्ण आढलेला तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे. कराड तालूक्यातील मलकापूर येथील 54 व 47 वर्षीय महिला, वाण्याचीवाडी येथील 62 वर्षीय महिला, बनपूरी कॉलनी येथील 53 वर्षीय पुरुष, धावरवाडी येथील 8 वर्षाचा बालक, यादववाडी येथील 43 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील निमसोड येथील 33 वर्षीय महिला, 14 वर्षीय बालक, बनपूरी येथील 38 वर्षीय पुरुष, वडूज येथील 34 वर्षीय पुरुष, निढळ येथील 18 वर्षीय तरुण, वाई तालुक्यातील व्याहळी कॉलनी येथील 45 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील जिहे येथील 19 वर्षीय तरुण, 70 वर्षीय महिला, करंडी येथील 70, 65 व 45 वर्षीय महिला, राधीका रोड येथील 39, 27, 31 व 48 वर्षीय महिला, करंजे येथील 45, 25, 23 व 56 वर्षीय महिला, भरतगाव येथील 77,15,व 51 वर्षीय पुरुष, 74,45 व 44 वर्षीय महिला,बोरगाव येथील 12 वर्षाचा बालक, 44 वर्षीय पुरुष व 40 वर्षीय महिला, गार्डन सिटी येथील 31 वर्षीय पुरुष, जावली तालुक्यातील सरताळे येथील 56 वर्षीय पुरुष, पूनवडी येथील 67 वर्षीय पुरुष, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 7 वर्षाचे बालक, 42,65,35 वर्षीय महिला, शिंदेफाटा शिरवळ येथील 25 वर्षीय पुरुष, उमाजीनाईक शिरवळ येथील 14 वर्षाचे बालक, महाबळेश्वर येथील 45 वर्षीय पुरुष, पाटण तालुक्यातील निगोडे (उमरकांचन) येथील 57 वर्षीय महिला, साईकडे येथील 24 वर्षीय महिला अशी आकडेवारी आहे.

दरम्यान, ताज्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1 हजार 601 वर पोहोचली आहे. आत्तापर्यंत 950 कोरोना बाधि बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिल्ह्यात सध्या 586 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here