मुंबई । गेले तीन महिने राज्यात कोरोनाचे संकट सुरु आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहेत. राज्यात रोज नव्याने रुग्ण सातत्याने सापडत आहेत. मात्र याबरोबरच राज्यातील रुग्ण मोठ्या संख्येत कोरोना मुक्तही होत आहेत. राज्यात कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. आज राज्यातील बरे होणाऱ्या रुग्णांची रुंगणसंख्या एक लाख पार गेली आहे.
कोविड -१९ मुक्त रुग्णांच्या संख्येने आज एक लाखाचा टप्पाओलांडला असून आज एकाच दिवशी ८०१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या रुग्णसंख्येबरोबरच आता बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १ हजार १७२ इतकी झाली आहे. आज सर्वाधिक रुग्ण कोरोनामुक्त राज्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या असणाऱ्या मुंबई शहरातच झाले आहेत. आज मुंबईत ७०३३ रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.
राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ लाखाच्या पार झाली असून जुलैच्या सुरूवातीलाच एकाच दिवशी ८०१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे आता बरे झालेल्यांची संख्या १ लाख १ हजार १७२ झाली आहे. आज सर्वाधीक बरे झालेले रुग्ण मुंबई मंडळतील असून ७०३३ रुग्णांना घरी सोडण्यात आले.
— Rajesh Tope (@rajeshtope11) July 2, 2020
दरम्यान राज्यात आज ६३३० कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. आता राज्यातील एकूण रुग्णसंख्या १८६६२६ इतकी झाली आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनंतर सध्या राज्यात ७७२६० रुग्ण हे कोरोनावर उपचार घेत आहेत. राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सकारात्मक दिसून येते आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.