फडणवीस साहेब तुम्ही चुकून PM ऐवजी CM म्हणालात…; रोहित पवारांनी काढला चिमटा

मुंबई । राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची कार्यकारिणीच्या बैठकीत महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली होती. यावेळी ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला’ म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांवर अन्याय केला असल्याचे म्हटलं होतं. सोयाबीन, कपाशी संपूर्ण नष्ट झाले आहे पण सरकार दिसतंय कुठे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. दरम्यान, राष्ट्रवादीचे … Read more

मराठा आरक्षणासाठी उद्या पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला स्थगिती, सुरेश पाटील यांची माहिती

मुंबई । राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा आरक्षण समितीच्या वतीनं मराठा आरक्षणासाठी उद्या, शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र ,सरकारने अनेक मागण्या मान्य केल्याने उद्याचा बंद मागे घेत असल्याची माहिती मराठा सकल महासंघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर बंद मागे घेण्याबाबत घोषणा सुरेश … Read more

MPSC परिक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात मुख्यमंत्री अनुकूल; ठाकरेंसोबतच्या बैठकिनंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया

Sambhajiraje Bhosle

मुंबई | मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत एमपीएससी परिक्षा स्थगित करावी अशी मागणी मराठा समाजातर्फे करण्यात येत आहे. आज यासंदर्भात भाजप खासदार संभाजीराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. MPSC परिक्षा स्थगित करण्यासंदर्भात मुख्यमंत्री अनुकूल असल्याचे यावेळी खासदार भोसले यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आमची बाजू शांतपणे ऐकलेली आहे. आम्ही पोझिटिव्हली मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची … Read more

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे दिल्लीत निधन

Ramvilas Pasvan

नवी दिल्ली | नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील महत्वाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (Ramvilas Pasvan) यांचे आज निधन झाले. दिल्ली येथील रुग्णालयात पासवान यांनी शेवटचा श्वास घेतला. पासवान याचे पुत्र चिराग पासवान यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे.  रामविलास पासवान यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात … Read more

महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाही- देवेंद्र फडणवीस

मुंबई । महाराष्ट्र प्रदेश भाजपची कार्यकारिणीची बैठक आज पार पडली. या बैठकीत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर मराठा आरक्षणाच्या मुद्यावर निशाणा साधला. ”महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाही. कोणी काही बोलतंय, कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. आज मराठा आरक्षणाच्या संदर्भात मोठा संताप आहे. केस दाखल केली नाही, म्हणून बेंचसमोर प्रकरण जाऊ शकत नाही आणि … Read more

मुंबई पोलिसांनी केला मोठा TRP घोटाळा उघड; रिपब्लिक टीव्हीसह अन्य २ टीव्ही चॅनल्सचा सहभाग

मुंबई । मुंबई पोलिसांनी मोठा TRP घोटाळा उघड केला आहे. या घोटाळ्यात ३ टीव्ही चॅनल्सची नाव समोर आली आहेत. अर्णब गोस्वामीच्या ‘रिपब्लिक टीव्ही’ या वृत्तवाहिनेचेही यात नाव आले आहे. या TRP घोटाळा प्रकरणात रिपब्लिक टीव्ही आणि अन्य दोन टीव्ही चॅनल्सचा सहभाग आढळल्याने त्यांचा तपास सुरु असल्याचे मुंबईच पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांनी गुरुवारी सांगितले. … Read more

रेशीम उत्पादकांसाठी खुशखबर; राज्य सरकारने वितरित केला ६२. ७४ लाख रुपयांचा निधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील रेशीम बीज  कोष उत्पादक शेतकऱ्यांनी  विक्री केलेल्या कोषाची रक्कम अदा करण्यासाठी व नवीन अंडी पूंज निर्मितीसाठी  महाराष्ट्र सरकारकडून  ६२. ७४ लाख  रुपयांचा निधी  वितरित करण्यात आला आहे. या संदर्भात राज्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री  राजेंद्र पाटील यड्रावर यांनी  सदर निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार सदर निधी नागपूर येथील रेशीम संचालनालयाचे … Read more

सोलापुरात एमआयएम-शिवसेनेला पडणार भगदाड? तौफिक पैलवान, महेश कोठे राष्ट्रवादीचं घड्याळ बांधणार

सोलापूर । सोलापूरच्या राजकारणात आता नवी घडामोड घडताना दिसत आहे.एमआयएमचे तौफिक पैलवान आणि शिवसेनेनेचे महेश कोठे राष्ट्रवादीचं घड्याळ बांधणार असल्याची प्रबळ शक्यता वर्तवली जात आहे. या दोघांनी पक्षांतर केल्यास सोलापुरात एमआयएम आणि शिवसेनेला मोठं भगदाड पडणार आहे. हे दोघेही राष्ट्रवादीच्या वाटेवर गेल्यास सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार असल्याचे बोललं जात आहे. दोघेही मूळचे काँग्रेसी, पण.. … Read more

केंद्राने हक्काचे थकीत 1500 कोटी रुपये द्यावेत अन्यथा यंदा साखर कारखाने चालवणे कठीण- शंभुराज देसाई

सातारा । सहकारी साखर कारखान्याच्या प्रश्नांबाबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केंद्र सरकारकडे कारखान्यांची थकीत रक्कम देण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारकडून राज्यातील खाजगी आणि सहकारी साखर कारखान्यांना गेल्या 2 वर्षांपासून सुमारे 1500 कोटी एवढी थकीत रक्कम येणे बाकी आहे. त्यामुळं ही रक्कम लवकरात लवकर कारखान्यांना द्यावी अशी विनंती देसाई यांनी केंद्राला केली. ”८० टक्के कारखान्यांनी … Read more

‘एक सातारकर म्हणुन उदयनराजेंना बिनडोक म्हटलेलं कदापि सहन करणार नाही’- शंभुराज देसाई

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यां  छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजी राजे भोसले यांच्यावर टीका केली. उदयनराजे आणि संभाजी राजे यांचा नामोल्लेख टाळत ”एक राजा तर बिनडोक तर दुसऱ्यांचा आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर”, असं आंबेडकर म्हणाले आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यभर याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. … Read more